विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 13 February 2024

श्रीमंतराजे वणंगपाळ तथा श्रीमंत राजे वणगोजी नाईक निंबाळकर.

 

फलटण संस्थानचे अधिपती महापराक्रमी, परंप्रतापी बारा वजीरांचा काळ श्रीमंत राजे वणंगपाळ तथा श्रीमंत राजे वणगोजी नाईक निंबाळकर..
लेखक :पाटील जय


नाईक-निंबाळकर घराण्याचे मूळ इतिहासात नवव्या शतकात सापडते. तेव्हा मध्य भारतातील धार येथे परमार वंशाच्या राजपूत राजाने त्याचे राज्य स्थापन केले होते. नंतरच्या काळात दिल्लीच्या सुलतानांनी सतत हल्ले करून त्यांना राज्य चालवणे मुश्किल करून टाकले. त्या हल्ल्यांना कंटाळून काही राजपूत घराणी मध्य प्रांतातून दक्षिण भारतात आली, त्यांपैकी नाईक-निंबाळकर हे घराणे होय. त्यावेळी ते ‘पवार’ होते..
त्यांना ‘निंबाळकर’ हे आडनाव मिळाले त्याची कहाणी आहे. इसवी सन १२७० च्या सुमारास त्या घराण्याचा पुरुष निंबराज परमार याने फलटणजवळच्या शंभू महादेवाच्या जंगलात मुक्काम ठोकला. ‘निंबराज’ या नावावरून त्या जंगलाला आणि त्या परिसराला लोक ‘निंबळक’ असे म्हणू लागले. त्यावरून घराण्याला आडनाव मिळाले ‘निंबाळकर’ असे. निंबराजाने त्याची अकरा वर्षांची कारकीर्द चांगल्या पद्धतीने घडवली. त्याने फलटण संस्थानाची स्थापना १२८४ मध्ये केली. तो सुलतान महंमद तुघलक याच्या पदरी होता. निंबराजाचा पराक्रमी मुलगा पोडखल जगदेवराव. तो युद्धात मारला गेला. महंमद तुघलकाने त्याच्या मुलाला म्हणजे दुसऱ्या निंबराजाला सरदारकीची वस्त्रे, फलटणची जहागिरी; तसेच, नाईक हा सन्मानाचा किताब बहाल केला. त्याला सोन्याचा तोडा दिलाच, पण मस्तकावर ‘मोरचेल’ वापरण्याचा हक्क देऊन एक प्रकारे ‘राजे’ म्हणून त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाला मान्यता दिली..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांना नाईक-निंबाळकर घराण्याने सहकार्य केले आणि त्यांच्या बरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भोसले घराण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्या संबंधातील हकिगत अशी १५७० ते १६३० या काळात जगपाळराव ऊर्फ राजे वणगोजी दुसरे हे फलटणच्या गादीचे अधिपती होते. हिंगणी बेरडीचे भोसले सरदार शंभू महादेवाच्या यात्रेला दरवर्षी चैत्र महिन्यात येत तेव्हा ते फलटणला नाईक-निंबाळकर यांच्याकडे मुक्काम करत असत. एकदा काही कामाच्या निमित्ताने बाबाजी भोसले फलटणला जगपाळराव यांच्याकडे आले असताना, त्यांनी सोबत मालोजी आणि विठोजी या त्यांच्या दोन्ही पुत्रांना आणले. ते दोघेही तडफेचे जवान मुलगे होते. जगपाळरावांनी त्या दोघांना बाराशे होनांची आसामी देऊन स्वत:च्या पदरी ठेवले. त्या दोघांची फलटण संस्थानाचा विस्तार वाढवण्याच्या कामी जगपाळरावांना मदत झाली. दोन्ही घराण्यांचे मैत्र असे वाढीस लागले..
――――――――――――
चित्रकार : विश्वनाथ खिल्लारी ♥️🔥

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...