#नागपूर- नागपूरकर भोसले राज परिवाराचें आद्यमहापुरूष सेनासाहेबसुभा महाराजा #श्रीमंत_राजे_रघूजी_महाराज_भोंसले (#प्रथम) यांच्या जयंती च्या #हार्दिक_शुभेच्छा व
पुण्यतिथी निमीत्तानें #विनम्र_अभिवादन. #रघुजी_महाराजांचें वैशिष्टय म्हणजे #जन्मतारीख 14 फ्रेंब्रुवारी व #मृत्युतारीख ही 14 फ्रेंब्रुवारी आहे.
राजे रघूजी महाराज (प्रथम) यांचा जन्म १४ फेब्रुवारी १६९५ मध्ये साताऱ्यात झाला. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतणे होते. राजे रघूजी हे फार शूर व पराक्रमी असल्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यु नंतर त्यांनी आपला मोर्चा मध्यप्रदेशाकडे वळवला. त्यांनी मध्यप्रदेशातील ३६ दिवसात ३६ किल्ले जिंकले व छत्तीसगढची स्थापना केली. तेथील सर्व राजे मांडलिक झाले व खंडणी देऊ लागले. राजे रघूजींचा पराक्रम ऐकून देवगढची राणी रतन कुंवर यांनी दासी पुत्र चांदशाहच्या कैदेतून मदत मागीतली राणीला मदत करण्याकरिता त्यांनी देवगढवर स्वारी करुन राणी रतन कुंवर व तिच्या दोन पुत्रांची सुटका केली. राजे रघूजी महाराज हे पंचहत्यारी होते. (तलवार, दानपट्टा, कट्यार, बिछवा, धनुष्यबाण)
त्यांनी रामटेक येथील भग्न अवस्थेतील मंदिराचा जिर्णउध्दार करुन अंबाळा तलावातील श्री रामचंद्र स्वामी, श्री लक्ष्मण स्वामी व सीता मातांच्या मुर्त्या काढून त्यांची मंदिरात स्थापना केली. त्यांनी अटक ते कटक पर्यंत नागपूरकर भोसल्याचा भगवा झेंडा रोवला.
इ.स. १७३६ मध्ये महाराजांनी नागपूर राज्याची स्थापना केली. व इ.स. १७३८ मध्ये त्यांच्या ह्या विशाल पराक्रमाचा गौरव करण्याकरिता जनतेने त्यांचा राज्याभिषेक केला व ते राजे झाले. त्यांच्यावर छत्रधरण्यात आले. चवरी मोरचल धरण्यात आले. व पायात हीरेजडीत सोन्याचा तोडा घालण्यात आला. अश्या पराक्रमी महाराजांचे निधन १४ फेब्रुवारी १७५५ मध्ये नागपूर मुक्कामी झाले.
No comments:
Post a Comment