विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 15 February 2024

साहेबगड-श्रीमंत महादजी बाबांची दक्षिणेतील राजधानी

 








साहेबगड-श्रीमंत महादजी बाबांची दक्षिणेतील राजधानी
लेखन :शेखर शिंदे सरकार
छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या कालखंडात मराठ्यांची सत्ता स्थिर स्थावर झाल्यावर मराठे डोंगर दर्यातून,किल्ल्यावरून सपाट भु भागावर वस्ती करून राहिले,या वेळी त्यांनी,प्रशस्त, सुरक्षित भुईकोट किल्ले उभे केले,काही भुईकोट एवढे प्रचंड बांधले की त्यात गाव वसावेल,
अशाच प्रकारचा हा जामगावचा भुईकोट किल्ला,नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात जामगाव या ठिकाणी श्रीमंत महादजी शिंदे सरकार यांनी हा भुईकोट साधारण१७८० साली बांधला,या भुईकोटास साहेब गड असे नाव होते,हा भुईकोट बांधण्यासाठी तत्कालीन ७ लाख रुपये खर्चा आला होता,
या भुईकोटाचे बलाढ्या रूप सहसा डोळ्यात सामावेत नाही,१९ बुरुंज असलेल्या या भुईकोटास दगडी तट बंधी आहे,पूर्व दक्षिण उत्तर असे या गढीस दरवाजे आहेत,मुख्य प्रवेश द्वार आज ही पाटील बाबांचा इतिहास उरात बाळगून मोठ्या दिमाखात खडे आहे,वाड्यातून प्रवेश करताच घरांचे अवशेष पहायला मिळतात,
मुख्य प्रवेश द्वारा समोरून दिसतो तो दुहेरी बुराजात उभे असलेले वाड्याचे महाकाय प्रवेश द्वार,या प्रवेश द्वारावर शिंदे घराण्याचे राज चिन्ह आहे,या वाड्याच्या समोर दुतर्फा दगडी तट बंधी आहे,वाड्यात प्रवेश करताच समोर दिसतो तो दुचौकी दुमजली वाडा, या वाड्याचे नाव माधवविलास होय,वाड्याचे बांधकाम हे पूर्णतः सागवाना मध्ये केले आहे,सुंदर नक्षी काम कलाकुसरीने बांधलेले मच्छिमहल आंबेमहल लक्ष वेधून घेतो,वाड्यात तळ एक घर आहे,धान्य साठवण्यासाठी कोठारे आज ही सुस्थितीत आहेत,या वाड्यात शिव मंदिर असून या ठिकाणी महादजी शिंदे यांच तख्त आहे,वाड्यात पीर बाबाच स्थान देखील आहे
या वाड्याच्या तटबंधी सह नैसर्गिक रक्षण म्हणून पाठीमाघून डोंगराची तटबंदी आहे,या भोईकोट किल्ल्यात श्रीराम,विठ्ठल आणि हुनमान यांची सुंदर मंदिरे आहेत,वाड्यालगत ४६८ एकर क्षेत्रात,आंबा व चिंचेचा,मोतीबाग,जुनाबाग,नळबाग, व हिरा बागा होत्या, या बागांच्या पाण्याकरिता वाड्याच्या सोमर बारा मोटाची विहीर बांधण्यात आली होती आज ही त्या विहिरीत दुष्काळात देखील पाणी आहे,
महादजी शिंद्यांनी या गढीस राजधानीच स्वरूप दिले होत ग्वाल्हेर ही उत्तरेतील राजधानी तर दक्षिणेतील जामगावाची गढी होय!
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे महाराष्ट्रातील शैक्षणिक कार्य पाहून,जीवजीराव महाराजांनी १९५५ ला वाडा व बाजूचे सर्व क्षेत्र रयत शिक्षण संस्थेस बक्षीस केले,विशेष म्हणजे स्वखर्चातून हा वाडा बक्षीस करून दिला!
सध्या त्याठिकाणी रयतशिक्षण संस्थेचे डीएड कॉलेज सुरू आहे,नुकताच लग्ना निमित्त नगरला जाण्याचा योग आला तेव्हा या वाड्याचे वास्तूरंग अनुभवता आले.!
-

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...