आग्रा या किल्ल्याने एकेकाळी मराठ्यांचा राज्याचा अस्त करण्याचे स्वप्न पाहिले पण नंतरच्या काळात मराठ्यांनी तो किल्ला आपला गुलाम केला.
शहाआलम शिंद्याचे स्वागतास आग्रा येथे:- १७८४ च्या ऑक्टोबर माहिन्यात, ग्वाल्हेरहून आग्रा येथे आला अग्र्याच्या मोगल अधिकारी अफरासियाब खान याने त्यांचे वीरोचित स्वागत केले. पण हे मुहम्मद बेग हमदानी याला आजिबात सहन झाले नाही. त्यांनी ३ नोव्हेंबर १७८४ रोजी अफरासियाब खान याची हत्या घड़वुन आणली तथापि या हत्येचा शिंद्याची राजकीय प्रगती वर कुठलाच विपरीत परिणाम झाला नाही. उलट यामुळे मराठे सावध झाले. शिंद्याच्या सरदार अंबुजी इंगळे याने हमदानीवर आक्रमण केले. त्याला पकड़ून आग्रच्या किल्लात अतिशय कड़क बंदोबस्त कैदेत ड़ांबले. महादजींच्या आग्रा आगमनाचे वृत्त कळताच, मोगल सम्राट शहाआलम खुद्द जातीने दिल्लीहून आग्रा येथे आला. शहाआलम आणि महादजी शिंदे यांची फत्तेपूर सिक्री येथे १४ नोव्हेंबर १७८४ रोजी थाटात भेट झाली महादजी शिंदे यांनी देखील शहाआलम यांची अतिशय आदराने भेट घेतली. त्याला १२१ सुवर्ण मोहरा नजर केल्या काही दिवसांनंतर शहाआलम आणि महादजी शिंदे राजधानी दिल्लीत वापस आले.
बादशहाने महादजी शिंदेंना वकील -इ -मुतालीक (साम्रज्याचा सर्व क्षेष्ठ प्रशासकीय अधिकारी )या पदावी बहाल केली.
आता दिल्लीच्या लाल किल्ल्यावर मराठ्यांचा भगवा झेंडा मोठ्या दिमाखात फड़कू लागला २६ मार्च १७८४ पासुन ड़िसेबर १८०३ पर्यत दिल्ली आग्रा हा प्रदेश शिंद्याच्याच अमला खाली आला. शहाआलमने महादजी शिंद्याना नालखी, नगारा, चौघड़ा, घोडे, हत्ती, व मानाची वस्त्रे दिल्लीत वकील इ मुतलक या पदाची वस्ञे फर्मान व अधिकार चिन्ह बहाल केली.
वानवडी पुणे येथे महादजी शिंदे यांचे निधन झाले ती तारीख होती-12 फेब्रुवारी 1794
No comments:
Post a Comment