विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 20 February 2024

मराठा #दोरगे पाटील #सरदार

 


मराठा #दोरगे पाटील #सरदार
#सदरील_पत्राबाबत जे १६४२सालचे आहे याचे लेखन राजवाडे यांनी संशोधन करून लिखान केले आहे, यामधे उल्लेख आलेले मोख्तसर लोक म्हणजे महत्त्वाचे लोक जे या निवाडे साठी उपस्थित होते यामधे सोमाजी दोरगे व नागोजी दोरगे यांचा उल्लेख केला आहे. १६२४ सालच्या शरीफजीराजे भोसले यांच्या रोजनिशी च्या नोंद मधे नागोजी दोरगे सरदार व सोनजी बीन कावजी गरूड सरदार बेलसर यास सोबत दरबारी अधिकारी यांना दिंडोरी परगना सैन्य सह पाठवले असा उल्लेख केला आहे
-: राहुल दोरगे.
दस्त (महजर).
मौजे-मळद तर्फ-पाटस(तालुका:दौंड)येथील पाटीलकी विषयी (मोकदमी) रणनवरे/रणवरे भावकी मधील वाद राजश्री दादोजी कोंडदेव यांच्या उपस्थितीत गोतसभेमध्ये मिटवण्यात आला,
सरदार बकाजी रणनवरे मोकदम(पाटील) हे मळदकर रणनवरे घराण्याचे मुळपुरूष.
त्यांना दोन मुले
थोरला मुलगा सिदोजी
त्याचा मुलगा येसाजी.
त्यांना संतान नाही
ते मृत्यू पावले.
धाकटा बाणजी
त्यांचा मुलगा बाजी
येसाजी यांची बायको पुताई रणनवरे हिने कृष्णाजी फडतरे याला दत्तक घेतले,आणि अर्धी पाटीलकी कृष्णाजी ह्याला मिळाली,कृष्णाजी रणनवरे यांच्या दत्तक विधानाला आणि अर्ध्या पाटीलकीला,मळदचे निमे पाटील बाजी बजाजी रणनवरे मुजराईला आले.
त्यावर पूताई रणनवरे ह्यांनी पुणे येथे सुभेदार राजश्री दादोजी कोंडदेव यांच्याकडेच तक्रार दाखल केली,त्यावर गोतांच्या उपस्थितीत निवडा करण्यात आला, कृष्णाजीचे दत्तक विधान कायम करण्यात आले,आणि अर्धी पाटीलकी त्यांना कायम करण्यात आली.
निवाड्यात उपस्थित असलेले गोत:
1.काजी अब्दुल काजी अहमद हकिमशरा.
2.काजी सदर काजी इस्माईल नेम.
(हकिमशरा परगणे पुणे)
3.सुभेदार राजश्री दादोजी कोंडदेव.परगणे पुणे
4.बापूजी मुदगल हवालदार
5.सुंदर हरी मुजुमदार
(हवालदार,मुजुमदार परगणे पुणे)
6.मालोजी नरसिंहराव शितोळे
7.विठोजी शितोळे
(देशमुख पुणे परगणे)
8.रामाजी शितोळे पाटील कुरकुंभ.
9.मौजे वढाने येथील भापकर पाटील.
10.बाबाजी दिवेकर पाटील मौजे वरवंड.
11.मौजे राजेगाव येथील राजेभोसले पाटील.
तसेच ह्या निवाड्यावेळेस काही महत्त्वाचे लोक (मोख्तसर लोक ) आणि त्यावेळी गावातील बलुतेदारांची साक्ष घेतली गेली त्यांची नावे.
मोख्तसर लोक:-
चांगोजी चोरघडे,
नागोजी दोरगे,
सोमाजी दोरगे,
सोनजी जेधे.
बलुतेदार:-
नाना जोशी आणि कुलकर्णी
लखमा चांभार
माया महार.
दत्तक विधान मंजूर केले असे.शके १५६४,इसवी सन १६४२,शिवकालीन -आदिलशाही दस्त.
साभार राहुल दोरगे पाटील
संदर्भ:मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखक:विश्वनाथ काशिनाथ राजवाडे

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...