विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 February 2024

निंबाळकर गडी

 

निंबाळकर गडी
फलटणच्या निंबाळकर घराण्याची शाखा असलेले हे भाळवणी ता.पंढरपूर यांची उपशाखा ही भाळवणी बीड येथील निंबाळकर घराणे. जगदेवराव मुधोजीराव नाईक निंबाळकर हे या घराण्याचे मूळ पुरूष होत. सईबाईसाहेब ह्यांना ३ भाऊ होते यातले सर्वात मोठे वैराग बार्शीजवळ होते दुसरे भाळवणी ता. पंढरपूर तर तिसरे फलटण असे हे इतिहाससंपन्न घराणे
गावं.भाळवणी ता.आष्टी जि.बीड
 
इतिहास कालीन भाळवणी, ता. पंढरपूर येथील नाईक निंबाळकर हे मराठ्यांच्या इतिहासात एक शूर व पराक्रमी घराणे म्हणून प्रसिद्ध आहे. फलटण संस्थान चे अधिपती दुसरे मुधोजी नाईक निंबाळकर यांच्या प्रथम पत्नी मैनाबाई, या जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्या कन्या, त्यांना जगदेवराव व साबाजी ही दोन मुले. इ.स. १६४२ मध्ये फलटण संस्थान चे विभाजन होऊन भाळवणी(ता. पंढरपूर) परगणेचा कारभार जगदेवराव निंबाळकर पाहू लागले.द्वितीयपुत्र साबाजी हे दहिगाव परगणेचा कारभार पाहू लागले. मुधोजी निंबाळकराच्या दुसऱ्या पत्नीपासून बजाजी व मुलगी सईबाई.बजाजी फलटण संस्थान चार कारभार पाहू लागले ,तर सईबाई यांचा विवाह छत्रपती शिवरायांशी झाला.
इ. स. 1730 च्या दरम्यान भाळवणीचे (ता. पंढरपूर) सरलष्कर सुलतानजी नाईक निंबाळकर यांचे बद्दल सातारचे शाहू महाराज यांच्या मनात संदेह निर्माण झाला व शाहू महाराजांनी त्यांना एका मोहिमेवर जाण्यापासून रोखले, त्यावेळी सरलष्कर सुलतानजी नाईक निंबाळकर हे निजामास जाऊन मिळाले, निजामाने त्यांना बीड, अंबड, धारूर व पाथरी येथे जहागीर दिली. पुढे जाऊन सुलतान जी नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अप्पासाहेब निंबाळकर हे भाळवणी (आष्टी) येथे स्थायिक झाले. सुलतानजी नाईक निंबाळकर हे भाळवणी (आष्टी) या शाखेचे मूळपुरुष होत.
ऋषिकेश नाईक निंबाळकर
भाळवणी, ता. पंढरपूर
9730150523.











No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...