जिल्हा :- सातारा
फलटण हे हिंदुस्थानातील एक संस्थान असून नाईक-निंबाळकर हे संस्थानचे राजे होते.
फलटण हे भारतातील एक पुरातन शहर असून महानुभाव साहित्यात या नगरीचा पालेठाण असा उल्लेख आढळतो.
मराठा इतिहासातील मानाचे स्थान असनारे फलटणचे राजे नाईक निंबाळकर घराणे इ स ७५० ते ८०० वर्षापूर्विचे प्राचीन घराणे आहे.
मालोजी राजे भोसले यांचा पत्नी मातोश्री दिपाबाई आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई महाराणी सईबाई याच फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील. हिंदवी स्वराज्याशी जवळचे नातेसंबंध असलेले हे नाईक निंबाळकर घराणे आहे. फलटण शहरात नाईक निंबाळकर राजे यांचा खूपच सुंदर आणि वैभव संपन्न मुधोजी मनमोहन राजवाडा असून या राजवाड्याच्या बाजूलाच अप्रतिम लाकडी शिल्पकलेने नटलेले श्रीराम मंदिर आहे .
फलटणचे श्रीराम मंदिर २२५ वर्षापूर्विचे आहे. मंदिराभोवती उंच आणि मजबूत दगडी तटबंदी आहे. भव्य प्रवेशव्दारातून आत गेल्यावर डाव्या बाजूला राजवाडा तर उजव्या बाजूला श्रीरामाचे मंदिर आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर तीन दिपमाळा आहेत. मंदिराचे सभामंडप शिसवी खांबांवर उभारले आहे. खांबांना वरच्या बाजूस लाकडी कमानी आहेत. मंदिराच्या बाजूने ३ ते ४ फूट उंचीचे अप्रतिम कोरीव काम केलेल्या लाकडी जाळ्या बसवलेल्या आहेत. प्रत्येक जाळीवर वेगवेगळे नक्षीकाम केलेल आहे.
गाभार्यातील राम लक्ष्मण व सीता यांच्या मुर्ती खूपच सुंदर आहेत. श्रीराम मंदिराला लागूनच राधाकृष्ण, एकमुखी दत्त व गरुड यांची मंदिरे आहेत.
साभार जीवन कवडे
No comments:
Post a Comment