विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 1 February 2024

ग्वालियर हत्तीवाले सरदार कदम साहब का बाडा (वाडा) यांचा एक अपरिचित इतिहास

 








ग्वालियर हत्तीवाले सरदार कदम साहब का बाडा (वाडा) यांचा एक अपरिचित इतिहास
मराठ्यांनी दिल्लीवर भगवा फडकवला छत्रपती शाहू महाराजाच्या काळात अखंड हिंदुस्तानात मराठा साम्राज्य पसरत गेले
बाजीराव पेशवे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर यांच्या बरोबर त्याकाळी अनेक मराठा सरदार पानिपतच्या युद्धच्या वेळी गेले होते पुढे ते सरदार तिथेच दिल्लीवर राज्य करण्यासाठी सरदार तिथेच राहिले. पवार, भोईटे, शितोळे, शिर्के, गायकवाड, कदम अशे अनेक सरदारांचे मध्यप्रदेश मध्ये मोठे वाडे बांधले गेले
त्यापैकी अनेक मराठा सरदारांपैकी एक म्हणजे ग्वालियरचे हत्तीवाले सरदार कदम साहब का बाडा (वाडा) ग्वालियर मध्ये कदम साहब का वाडा आहे जनकगंज (लष्कर) या एरियामध्ये असणारा वाडा या वाड्याला चार मोठे चौक होते. वाड्यामध्ये पूर्वी सरदार कदम साहब यांचे हत्ती असायचे सरदार कदम साहब यांच्या पुढच्या वंशजांनी वाड्यातील वाटणी विकून ते महाराष्ट्रात परत आले ग्वालियर च्या वाड्यातून ते सरदार परागंदा झाले. पुढे ते कुठे गेले असा प्रश्न पडतो
तर ग्वालियरच्या सरदार कदम साहब वाड्यातील एक सरदार महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये राहत आहे. तर दुसरे सरदार सत्येंद्रसिंह जयसिंगराव कदम साहब पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पणदरे गावचे मावसबंधू राजेंद्र भानुदास जगताप, नरेंद्र भानुदास जगताप,ॲड. संजय भानुदास जगताप यांच्या मदतीने पणदरे गावच्या जवळ असणारे माळेगाव येथे 1995 साली स्थायिक झाले. सरदार सत्येंद्रसिंह जयसिंगराव कदम साहब त्यांच्या परिवारासह राहत आहे
फोटोत आहेत ते सरदार सत्येंद्रसिंह जयसिंगराव कदम साहब त्यांचे चिरंजीव चेतनसिंह सत्येंद्रसिंह कदम साहब
सरदार सत्येंद्रसिंह जयसिंगराव कदम साहब यांच्या मातोश्री चंद्राबाई जयसिंगराव कदम या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे गावच्या बुवासाहेब पिसाळ देशमुख यांच्या कन्या होत्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्या रणुआकाचा असणार भुईंजचा जाधवराव इनामदार वाड्यामध्ये ग्वालियर चे सरदार कदम साहेब बाडा (वाड्याचे) फोटो आहेत.
सरदार कदम साहब (बाडा) वाड्याचे महाराष्ट्रात असणारे नातेसंबंध जाधवराव इनामदार भुईंज(वाई) पिसाळ देशमुख ओझर्डे(वाई) बाजी मोहिते तळबीड (कराड) शिंदे देशमुख हुमगाव (जावळी) जगताप पाटील पणदरे(बारामती) राजे जाधवराव माळेगाव (बारामती)
 
सरदार हत्तीवाले कदम ह्यांचे मूळ गावं ' गिरवी ' तालुका फलटण जिल्हा सातारा हे आहे .
सरदार कदम साहेब का बडा हा एकूण ७ एकर मध्ये बांधला गेला होता
सरदार जयसिंगराव कदम ह्यांचे थोरले पुत्र सरदार प्रतापसिंग जयसिंगराव कदम हे होते .
सरदार जयसिंगराव कदम ह्यांना ब्रिटिशांच्या काळात दरबारातून CENTRAL EXCISE मध्ये लावण्यात आल
सुपुत्र सरदार प्रतापसिंग जयसिंगराव कदम ह्यांना Bharat Heavy Electricals Limited (BHEL) भोपाळ येथे कार्य करायची संधी प्राप्त झाली , या संस्थे मध्ये कार्यरत असताना पुढे कुटुंबाच्या जवाबदारी मुळे तिथून पुढे सरदार प्रतापसिंग जयसिंगराव कदम मध्य प्रदेश मधून स्थलांतर झाले . आज कदम कुटुंबीय धायरी पुणे येथे स्थावर आहेत
 

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...