मौजे मुखई तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील पाटील घराण्यातील बाळोजीराव पलांडे
lekhan :santosh zipare
एक उत्तर भारतीय इतिहासकार यांनी लिहिले की
" जिनका हात मे दिल्ली का कब्जा होगा उनको हात मे हिंदुस्तान का कब्जा होगा उसको राज हिंदुस्तान पर चलेगा पर जिनके हाथ में दिल्ली का लाल किला होगा उनिका दिल्ली पर कब्जा होगा यह भी सत्य है"
अरब राष्ट्रांतून आलेल्या मुस्लिम लुटेरे लोकांना जेव्हा जेव्हा भारतात आले तेव्हा तेव्हा त्यांनी तत्कालीन भारताचं मध्यवर्ती स्थान असलेल्या दिल्लीवर सर्वात प्रथम आक्रमण करून ताबा मिळवला आणि तत्कालीन काळात ही दिल्लीच लाल किल्ला हिंदुस्थानाची राजधानी म्हणून ओळखले जात असे त्याच्याच महत्व पुढेही कायम राहिलं दिल्लीच्या संरक्षणासाठी दिल्लीत असलेल्या व राजधानीचं राज्य आणि बादशाह यांच्या राहण्याचे ठिकाण असलेले लाल किल्ला हा ताब्यात येणे महत्त्वाचा आणि गरजेचे असे त्याशिवाय दिल्ली शहराचे संरक्षण करणे अशक्य होतं खरं तर मराठ्यांच्या इतिहासात दिल्ली अनेक वर्ष मराठ्यांचे ताब्यात राहिली आणि दिल्लीच्या बादशाही नामधारी होऊन राहिला पण पानिपत लढायच्या अगोदर अहमद शाहा अब्दालीने आक्रमण करून दिल्लीवर आपला ताबा मिळवला पण नंतर मराठ्यांनी या शहराचा व लाल किल्ल्याचा ताबा घेतला यामुळे आहे माझ्या प्रचंड फौजींनी हिंदुस्थानात असतानाही हिंदुस्थानावर सत्ता ही मराठ्यांचीच होती हे सिद्ध करण्यास कोण्या मांत्रिकाची गरज नाही कारण दिल्ली शहर व लाल किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता आणि या किल्ल्यावर किल्लेदार होते मौजे मुखई तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील पाटील घराण्यातील बाळोजीराव पलांडे हे होय.
बाळोजी पलांडे हा लाल किल्ल्याचा किल्लेदार होते. दिल्ली शहर व परगण्याचा सुभेदार म्हणून नारो शंकर दाणी हे कारभार पाहात होते.
मराठ्यांच्या ताब्यात दिली व लाल किल्ला असताना तेथे अनेक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या, अब्दालीच्या स्वारीमुळे परागंदा झालेला दिवशीया
बादशहा शहाअलम याचे सर्व राजकुटुंब त्यामध्ये त्याची राजमाता बेगम जिनत महल, त्याचे शहाजादे, त्याच्या बेगमा तसेच माजी पातशहा शाहा नाहासानी हे देखील होते. या सगळ्यांची मराठ्यांनी लावून दिलेली व्यवस्था, त्यांच्या नित्य नियमानुसार दिनक्रम लावले
मराठ्यांनी जिंकलेले दिली शहर आणि लाल किल्ल्यावर २ ऑगस्ट १७६० या दिवशी मराठ्यांनी अब्दालीच्या ताब्यातून दिल्ली शहर, तर १० ऑगस्ट १७६० या दिवशी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून घेतला. तेव्हापासून पानिपतात मराठे हरल्याची बातमी १५ जानेवारीला समजेपर्यंत मराठ्यांनी दिल्ली शहराच्या रक्षणा केले यावेळी या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून मुखई येथील बाळोजी पलांडे होते. आणि प्रशासनावर १४ लाख ७१ हजार ३२६ रुपये खर्च झाले आहे १७ जानेवारी १७६१ पर्यंत बाळोजी पलांडे हे लाल किल्ला वर किल्लेदार म्हणून होते हे महत्त्वाचे इतिहास, मुखई, सह महाराष्ट्रातील लोकांना समजले पाहिजे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा कुटुंबतील महाराणी येसूबाई साहेब प्राणी सरकार मातोश्री सकवार बाईसाहेब प्राणी सरकार मराठ्यांचा युवराज छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान नंतर औरंगजेब यांची निधनानंतर शहा आलम यांनी याच लाल किल्ला मध्ये आपल्या कैदेत ठेवला होता त्याच औरंगजेब बादशहाच्या पूर्ण वंश त्यांच्या पूर्ण कुटुंब कबीला शहजादा बादशाह व पानिपतच्या अगोदर झालेल्या पातशहा सह संपूर्ण औरंगजेबाचा वंशातला कुटुंबकबिला लाल किल्ल्यावर मराठ्यांच्या कैदेत होता आणि याच लाल किल्ल्यावर महारणी येसूबाई सह महाराणी सकवार बाई या पण कैदेत होते नीतीच्या फेऱ्यातून छत्रपतींच्या कुटुंबकबिला गेला त्याच किल्ल्यावर औरंगजेबाच्या ही वंशाचा कुटुंब कबीला मराठ्यांच्या ताब्यात कैदेत पडला होता निसर्गाचा नियम आहे ती वेळ आली की निसर्ग आपला हिशोब व्याजासहित चुकता करतो तसं मराठ्यांनी औरंगजेबाचा आणि त्याच्या वंशाचा हिशोब ही त्याचा कुटुंबकबिला लाल किल्ल्यावर कैद ठेवून व्याजासहित परतफेड केला होता यामुळे ही गोष्ट मराठ्यांच्या इतिहासात अद्वितीय असून त्यावेळी या लाल किल्ल्यावरील किल्लेदार असणारे सरदार बाळोजीराव पलांडे यांचे नाव मुखाई येथील पाबळ ते शिक्रापूर व शिक्रापूर ते पाबळ हवेचा चौक जातो तिथे देण्याची मागणी तील भारतीय मराठा महासंग्रह इतिहास परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने करण्यात आली आहे
सदर मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्याच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संतोष झिपरे यांच्या नेतृत्वाखाली मौजे मुखई गावातील सरपंच सौ. संयोगिताताई तानाजी पलांडे, पलांडे घराण्यातील जेष्ठ व्यक्तिमत्व मा. श्री.खुशालराव चंद्रराव पलांडे पाटील मा.श्री.हर्षद प्रताप पलांडे मा. श्री. धीरज नेताजीराव पलांडे मा. श्री.मनोज पलांडे मा. श्री.सोमनाथ पलांडे आदी मान्यवर उपस्थित होते
No comments:
Post a Comment