मराठशाहीच्या इतिहासात भोसले घराण्यात अनेक कर्तुत्ववान स्त्रिया होऊन गेल्या आहेत यात राजमाता जिजाऊ, महाराणी सोयराबाई साहेब, राजकन्या राजकुंवर, महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई, महाराणी राजसाबाई, महाराणी जिजाबाई, महाराणी सईबाई उर्फ दिवाणसाहेब, महाराणी आनंदीबाई, महाराणी सुजनाबाई, महाराणी कामाक्षीबाई, राजकन्या मुक्तांबा इत्यादी भोसले घराण्यातील अनेक स्त्रियांनी राजकीय डावपेच व मुत्सद्दीपना दाखवून बरेच कर्तुत्व गाजवले आहे
यातच आणि एक नाव म्हणजे महाराणी अंबिकाबाई होय या सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या कन्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई होत्या छत्रपती राजाराम महाराज यांची चार लग्ने झाली होती पहिला विवाह सरसेनापती प्रतापराव गुजर यांची कन्या जानकीबाई यांच्या सोबत झाला होता संसारिक वृत्तीच्या महाराणी जानकीबाई या काही काळातच अल्पशा आजाराने निधन पावल्या दुसरा विवाह सरसेनापती हंबीरराव मोहितेंची कन्या ताराबाई यांच्या सोबत झाला महाराणी ताराबाई या अष्ठपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या धाडसी आणि निर्णायक वृत्तीच्या जहाल रणरागिणी होत्या तिसरा विवाह कोल्हापूरच्या कागलकर सर्जेराव घाटगे घराण्यातील राजसाबाई यांच्यासोबत झाला होता महाराणी राजसाबाई या कुटील डावपेच खेळणाऱ्या व राजकीय महत्त्वाकांक्षी ठेऊन असणाऱ्यातील होत्या राजसाबाई साहेबांनीच महाराणी ताराबाई व छत्रपती दुसरे शिवाजी महाराज यांची उचलबांगडी करून कोल्हापूर गादीवर आपला मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांची स्थापना केली होती
चौथा विवाह सरसेनापती प्रतापराव गुजर यांची सर्वात धाकटी मुलगी असलेल्या अंबिकाबाई यांच्यासोबत झाला होता सरसेनापती प्रतापराव गुजर यांना राजकन्या जानकीबाई, खंडोजी गुजर, सिधोजी गुजर, जगजीवन गुजर व राजकन्या अंबिकाबाई अशी पाच अपत्ये होती यातील खंडोजी गुजर व जगजीवन गुजर ही दोन मुले औरंगजेब बादशहाच्या छावणीत छत्रपती शाहू महाराज यांच्या बदल्यात मुसलमान बनली होती सिधोजी गुजर हे मराठ्यांच्या आरमार सैन्यात प्रमुख सरदार होते
महाराणी जानकीबाई यांच्या अल्पशा निधनानंतर त्यांची पोकळी भरून काढण्यासाठी गुजर मंडळींनी राजकन्या अंबिकाबाई यांचा विवाह छत्रपती राजाराम महाराज यांच्यासोबत लावून दिला होता त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून गेले होते राजकीय उलथापालथ व विश्वासघातक्यांमुळे सर्वजन एकमेकांच्या जिवावर उठले होते परंतु सोज्वळ मनाच्या व धार्मिक वृत्तीच्या महाराणी अंबिकाबाई साहेबांनी कोणत्याही राजकीय गोष्टीत भाग घेतला नाही त्यांचा सततचा राबता देवघर व स्वयंपाकघर एवढ्यापुरताच मर्यादित राहिला त्यांनी राजवाड्यातील धार्मिक व संस्कारयुक्त वातावरणावर बराच भर दिला होता राजपुत्र शिवाजी, राजपुत्र संभाजी, राजकन्या सोयराबाई, राजकन्या भवानीबाई या भावी पिढीला घडवण्याच महत्वपूर्ण काम महाराणी अंबिकाबाई साहेबांनी केल होत जणू राजपुत्रांवर संस्कारांचा राज्याभिषेकच महाराणी अंबिकाबाई यांनी केला हे काम राजमाता जिजाऊ आईसाहेबांच्यापाठीमागे महाराणी अंबिकाबाई साहेबांनी केलं होत त्यांचे राजकीय योगदान काहीही नसल्यामुळे इतिहासकार व इतिहास दोघेही त्यांच्याबद्दल एक शब्दही लिहीत नाहीत
महाराणी अंबिकाबाई साहेबांचे छत्रपती राजाराम महाराज यांच्यावर खूप प्रेम होत सिंहगडावर छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर तिन दिवसांनी विशाळगड येथे त्या पागोट्यासह सती गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर महाराणी पुतळाबाई साहेब पागोट्यासह सती गेल्या होत्या तोच आदर्श महाराणी अंबिकाबाई साहेबांनी घडवला होता विशाळगडावर त्यांची सतीशिळा होती तिथे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांचा मुलगा छत्रपती राजाराम महाराज यांनी जिर्णोद्धार करून समाधी बांधली आहे
©Zunjar babar
No comments:
Post a Comment