विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 28 April 2024

झाबितखान आणि महादजी शिंदे

 

नजिबखान पासुन साठलेली अमाप संपत्ती

झाबितखानाकडे होती . आपला पैसाअडका , कुटुंब कबीला अन्य ��रोहिला सरदारांची कुटुंबिय मंडळी यांना त्याने मराठ्यांच्या पासुन सुरक्षिततेसाठी पथ्थरगड येथील किल्ल्यावर ठेवले व त्या नंतर आपल्या चार हजार सैनिकाच्या सह त्याने शुक्रताल येथे गंगा नदीच्या पूर्वेकडील किल्ल्यात तळ ठोकला .महादजी शिंदे यांच्या फौजेने किल्ल्यावर तोफेचा मारा केला . किल्लेदार फौजुल्लाखान हा झाबितखानचा मेहुणा .. त्याने झाबितखानला कसलीही मदत न देता आपला कुटुंब कबीला व धन दौलत यासह तराई जंगल गाठले . या पराभवाने झाबितखानची अवस्था अत्यंत दयनीय झाली . त्याने त्याच रात्री शुक्रताल सोडले , एका हत्तीवर बसून रात्री अंधारात काही सोबत्यांना घेऊन ��तो उत्तर टेकड्याकडे निघून गेला . पराभवाचा धसका घेऊन रोहिला सैन्य गंगेच्या तीरावरून पळत सुटले . त्यांचा त्याच वेगाने पाठलाग करत मराठा फौजेने पथ्थरगड ला वेढा घातला . नजीबखान रोहिल्याने बांधलेला हा किल्ला नजीबाबाद या त्याच्या राजधानी शहराच्या पुर्वेस एक मैल अंतरावर आहे . हा किल्ला चांगला दणकट व त्यात तोफा दारूगोळा याचा साठाही भरपूर होता . पण अन्नधान्य पुरेसा नव्हता . मराठे व अफगाण सैन्य यांच्यात पंधरा दिवस गोळा गोळी झाली . वृद्ध किल्लेदार सुलतान खान शरण आला . किल्ल्यातील स्त्रिया व मुले यांना धोका पोचू न देता व अब्रुला धक्का लागू नये या अटीवर किल्लेदाराने किल्ला मराठ्यांकडे दिला .
मराठ्यांनी आपला शब्द पाळला . मराठ्यांनी अफगाण सरदारांच्या स्त्रियांना हातही लावला नाही . तेथे पुरुन ठेवलेली मालमत्ता खणून काढण्यासाठी व तिथे असलेली अन् मिळकत ताब्यात घेण्यासाठी किल्ल्यावर मराठे वीस दिवस वास्तव्य करुन होते .
पथ्थरगडावर नजीबखानाने साठवलेली अपार संपत्ती होती . हिरे , माणके , मोती , सोने नाणे मराठ्यांच्या हाती लागू नये म्हणून किल्ल्यातील लोकांनी ही अफाट संपत्ती किल्ल्याच्या खंदकात फेकून दिली . ही बातमी मराठ्यांना त्यांच्या हेरांकरवी समजली . खंदक खूप खोल असल्याने त्यातील पाणी वाहून जाण्यासाठी खंदकातून पाण्याचा पाट काढला आणि तो शेजारच्या प्रवाहात सोडून दिला .
मराठ्यांनी खंदकात मिळालेली संपत्ती जमा केली . त्यात सोन्याच्या मोहरा मिळाल्या . 12855 तोळे सोने मिळाले . रूपे , चांदी मौल्यवान वस्तू , 17 रूप्याचे पलंग अशा जिनसा मिळाल्या . सोन्याचा भाव त्या काळी 17 रूपये तोळा असा त्यात नमूद झाला आहे .
आजच्या बाजार भावाने या सर्वांची किंमत तीस हजार कोटी रूपयांच्या पेक्षा जास्तच होती .
पथ्थरगड किल्ल्यातील संपत्ती पेक्षाही अधिक मोलाचे कार्य मराठा फौजांनी केले

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...