विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 1 April 2024

#श्रीमंत_शिवराव_पवार (दुसरे) #सेनाबारासहस्री, #जहागीरदार_नगरदेवळे ...

 


#श्रीमंत_शिवराव_पवार
(दुसरे)
यांना पुण्यतिथी निमित्त #विनम्र_अभिवादन !
नगरदेवळा ( जिल्हा जळगाव , ता.पाचोरा) चे जहागीरदार श्रीमंत रामचंद्रराव यांचे देहवासन झाल्यानंतर श्रीमंत शिवराव पवार हे गादीवर बसले. श्रीमंत शिवराव पवारांनी मराठेशाहीच्या पडत्या काळातही पराक्रम गाजवला. राघोबा दादा चा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी आनंदीबाई , पुत्र बाजीराव ही मंडळी कोपरगावात कचेश्वर येथे राहत होती. त्यांच्या बंदोबस्ताचे कामगिरीत श्रीमंत शिवराव पवार हे आपल्या दिडशे स्वारांनिशी हजर होते . 1795 मध्ये मराठ्यांची निजामा बरोबर खडर्याला जी लढाई झाली होती त्या लढाईतही श्रीमंत शिवराव पवारांनी निजामाचा पुढच्या तोंडी असलेल्या फौजेवर हल्ला करून बरीच फौज कापून काढली होती. १८०२ नंतर दुसऱ्या बाजीराव इंग्रजांच्या आश्रयास गेल्यानंतर चतुरसिंग भोसले व यशवंतराव होळकर यांनी पेशव्या विरुद्ध ज्या लढाया केल्या त्यात श्रीमंत शिवराव पवार जातीने हजर होते. मराठेशाहीतील 1812 सालाच्या सरंजामी सरदारांचे यादीत श्रीमंत शिवराव पवारांचा उल्लेख आहे .
मराठीशाहीच्या अंतानंतर कंपनी सरकारने श्रीमंत शिवराव पवार, विश्वासराव यांना त्यांच्याकडे पूर्वीपासून सरंजाम असलेले नगरदेवळे हे गाव वंशपरंपरेने चालवण्यासाठी जहागीरी दि. 04/05/1819 रोजी दिली.
श्रीमंत शिवराव पवारांना भडगाव परगण्यातील सोळा आणि बहाळ परगण्याची 14 गाव अश्या एकूण तीस गावांची जहागिरी मोकासा ,बाबती व सरदेशमुखी हे हक्क सुद्धा मिळाले होते.
श्रीमंत शिवराव पवार यांचा विवाह गजेंद्रगड चे दौलतराव घोरपडे (अमीर-उल्-उमराव) यांच्या भगिनी चंद्राबाई यांच्याबरोबरच झाला होता. श्रीमंत शिवराव पवार यांना दोन कन्या होत्या त्यांची नावे कोंडवाबाई व काशीबाई अशी होती.कोंडवाबाईंचा विवाह बडोद्याचे घोरपडे यांच्या बरोबर तर काशीबाई यांचा विवाह पिलीवकर भोसले यांच्याबरोबर झाला होता. श्रीमंत शिवराव पवारांना पुत्रसंतती नसल्यामुळे त्यांनी खंडेराव मानाजी पवार पाथरेकर यांचे कनिष्ठ पुत्र कृष्णाजी यांना दत्तक घेतले होते.
श्रीमंत शिवराव पवार यांचा मृत्यू दिनांक 30-03-1820 रोजी झाला .
आज पुण्यतिथी निमित्त त्यांना
महेश पवार
७३५०२८८९५३

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...