हिंदुराव, ममलकतमदार, मराठा सेनापती मुरारराव घोरपडे
_____
मित्रांनो मराठ्यांच्या इतिहासा त छत्रपती संभाजी महाराज सरसेनापती संताजी राव घोरपडे मराठ्यांची शेवटची सेनापती बाप्पू गोखले यांच्या बलिदान आणि जसं मनाला चुटक लावून जातं तसेच तसंच सरसेनापती संताजी बाबा घोरपडे यांचे नातू असलेले व गुत्ती येथील सेनापती मुरारराव घोरपडे यांच्या बलिदानाची ही हे प्रत्येक मराठ्यांच्या मनाला पिळून टाकतं एका अजिंक्य युद्धाची खालील क्रूरकर्मी शेवट शेवट व हैदर आलेली टिपू सुलतान तिचा पत्रांनी त्यांचे केलेले हाल मनाला वेदना देऊन जाते खरंतर ते तुम्हाला टिपू सुलतान सांगतील तुम्ही फक्त सेनापती मुरारराव घोरपडे सांगा कारण इतिहासच्या दोन्ही अंगाने अभ्यास करताना करताना एखाद्याच्या पराक्रमासोबतच त्याच्या कुकर्माचाही पेढे वाचले गेले पाहिजे आणि तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याच्यासमोर एक मराठा इतिहास पूर्वी अभ्यासक म्हणून आम्ही नतमस्तक कारण मराठ्यांच्या चिरी पटक्या खाली लढणारा प्रत्येक जाती धर्माचा मावळा सरदार सेनापती हा मराठाच होता हीच आमची भावना आहे पण ज्यांनी ज्यांना इतिहास एकाच नजरेतून दिसतो व दुसरी नजर ही कुरकुर्माच्या समर्थनासाठी उभी राहते त्या आजच्या मराठ्यांनी सेनापती मुरारराव घोरपडी समजणार नाहीत शेवटी ज्या हैदरअलीला उभ्या कर्नाटकात सेनापती मुरारराव घोरपडीने 20 वर्ष पळवलं त्या सेनापतीचे दुर्दैवी अंत आणि झालेल्या शेवट मराठ्यांच्या काही पिढ्यांनी मराठ्यांच्या बलिदानाची त्यागाची आणि पराक्रमाची साक्षी देणार आहे एवढंच लक्षात ठेवा शेवटी म्हणत्यात ना बाप तो बाप ही रहेगा
जय सेनापती मुरारराव घोरपडे
इ. स. १७३० मध्ये सिधोजीराव घोरपडे पुत्र मुरारराव घोरपडे हे दक्षिणेस मराठ्याच्या वतीने कारभार पहात म्हैसूर आणि हैदराबादहून दरवर्षी सात लाख रुपये महसुल मिळत असत. अर्काटच्या नबाबाशी संबंधित इंग्रज-फ्रेंच युद्धातही त्यांनी भाग व १७४१-४५ मध्ये त्रिचन्नापल्ली (तिरुचिरापल्ली) येथील संपूर्ण प्रदेशात मराठ्यांच्या अंमलाखाली आणले १७५० नंतर कर्नाटकात त्यांनी अनेक स्वाऱ्या केल्या व अनेक स्थानिक सत्ताधीशांना पराभूत केले. कर्नाटकवरील स्वामित्वाकरिता हैदरअलीची त्यांना कडवी स्पर्धा होती. पुढे प्रसंगोपात पेशव्यांशीही त्यांचा संघर्ष झाला. थोरल्या माधवराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे कर्नाटकाकडे दुर्लक्ष झाले व त्यातच हैदरने गुत्तीवर मोठ्या सैन्यानिशी हल्ला केला (१७७५). चार महिने मुराररावांनी कडवी झुंज दिली; मात्र किल्ल्यातील रसद, दारुगोळा इ. संपल्यानंतर त्यांना शरणागती पतकरावी लागली. श्रीरंगपट्टणच्या किल्ल्यात हैदरने मुराररावांना कैद करून ठेवले. तेथेच १७७८ मध्ये त्यांचा मृत्यू झाला हैदर अलीच्या मनात सेनापती मुरारराव
घोरपड्यांबद्दल
मनात
आत्यंतिक तीव्र राग होता. त्याने
त्याचा पुरेपूर बदला घेतला. हत्तीच्या
पायाला बांधतात अशा जाडसर
साखळ्या बांधून मुराररावांची धिंड
श्रीरंगपट्टणम मधून काढण्यात आली.
कपाळदुर्ग च्या अंधारकोठडीत
मुराररावांना आणि दोन चारशे
मराठ्यांना डांबण्यात आले. दहा बारा
दिवस रोज मुराररावांवर व मराठा सैन्यावर अनन्वित
अत्याचार होत होते.यावेळी सदर हैदर अलीच्या पुत्राने मराठ्यांनी अन्न पाणी बंद करून
धड प्यायला पाणीही देण्यात आलं
नाही.
उपासमारीने आणि
अत्याचारांनी मुराररावांची प्रकृती
खूपच खालावली. त्यातच त्यांचा
मृत्यू झाला. दोन चारशे मराठ्यांची
अमानुष कत्तल करण्यात आली
लेख व माहिती संकलित
अखिल भारतीय मराठा महासंघ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संतोष झिप
No comments:
Post a Comment