विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 2 May 2024

#तंजावरचं_मराठा_साम्राज्य_कायम_राखण्यात_मानाजीराव_जगतापांनी_मोठा_पराक्रम_गाजवलेला

 


#तंजावरचं_मराठा_साम्राज्य_कायम_राखण्यात_मानाजीराव_जगतापांनी_मोठा_पराक्रम_गाजवलेला
मराठेशाही साम्राज्य हे एकेकाळी प्रचंड पसरलेलं साम्राज्य होत. पण नंतर मुघलांचे आक्रमण, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता यामुळे हे साम्राज्य हळू- हळू कमी होत गेलं. या मराठेशाही साम्राज्यात अनेक संस्थान, अनेक प्रदेश सामील होते. त्यातलचं एक म्हणजे तंजावर संस्थान.
सध्या तंजावर तमिळनाडू राज्यातला एक प्रदेश आहे. पण त्याच्या कित्येक वर्ष आधी तो मराठा साम्राज्याचा भाग होता. मराठ्यांच्या शौर्याचं आणि अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या संस्थानापैकी तो एक होता. सतराव्या शतकाच्या सुरुवातीला येथे नायिकांची सत्ता होती. नंतर शहाजीराजांना हा भाग जहागीर म्हणून मिळाल्याने कालांतराने येथे मराठा सत्ता दृढ झाली.
त्यानंतर प्रचंड परसलेल्या साम्राज्यात वेगवगेळी संस्थान सरदारांना चालवण्यासाठी देण्यात आली. अश्या पद्धतीनं तंजावरच्या या मराठ्यांच्या गादीवर सुद्धा प्रतापसिंह महाराज सत्ताधारी झाले.
संस्थानाचा सगळा कारभार सुरळीत सुरु असतानाच, प्रतापसिंह महाराज यांचा इंग्रज अर्काटचे नवाब चंदासाहेब यांच्याशी मोठा संघर्ष सुरु झाला. कारण या दरम्यान ब्रिटिश सरकार हळू- हळू आपले हातपाय पसरत होतं. आणि इंग्रज अधिकाऱ्यांना तंजावरचा मध्यप्रदेशात सामावेश करायचा होता.
पण मराठा साम्राज्यातले सरदारही काही गप्प बसणारे नव्हते. त्यांनी इंग्रज अर्काटच्या नवाबासोबत युद्ध पुकारलं. या युद्धात रघुजी भोसले आणि फत्तेसिंह भोसले या मराठा वीरांनी चंदा साहेबाचा पराभव केला आणि त्याला कैद केले.
कित्येक दिवस हा नवाब मराठ्यांच्या नजरकैदेत होता. पण पुढे १७४८ मध्ये तंजावर मराठी साम्राज्यात हस्तक्षेप करणार नाही, या अटीवर सातरकर छत्रपतींनी चंदा साहेबांची कैदेतून सूटका केली. पण चंदासाहेबची सुटका ही तंजावरच्या मराठेशाही साम्राज्यासाठी धोक्याची घंटा ठरली.
कैदेतून सुटल्यानंतर चंदासाहेब आणखीनचं चवताळला. त्याने कर्नाटकात विध्वंस करायला सुरुवात केली. अर्काटचा नवाब अनवरुद्दीनचा पराभव केला. ज्यानंतर चंदासाहेबने तंजावरच्या प्रतापसिंह महाराजांना आव्हान दिलं. त्याने प्रतापसिंह यांना पैशांची मागणी केली, जी प्रतापसिंह महाराजांनी नाकारली.
तंजावरावर स्वारी करूनही चंदासाहेबला अपयश आलं. कारण यावेळी प्रतापसिंह महाराजांनी निजामचा मुलगा नासीरजंग आणि अर्काटचा नवाब अनवरुद्दीन खानाचा मुलगा नवाब मोहम्मद अली यांची मदत घेतली.
पुढे काय भडकलेल्या चंदासाहेबने आधी मदत करणाऱ्यांविरुद्ध युद्ध पुकारलं. त्याने फ्रेंचांची मदत घेऊन मोहम्मद अली विरुद्ध युद्ध पुकारले. पण दुसरीकडे मोहम्मद अलीने इंग्रजांची मदत घेतली. सोबतच आपल्याला साम्राज्याच्या मदतीला आले म्ह्णून छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी सुद्धा मोहम्मद अली यांची मदत करण्याचं ठरवलं.
छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी आपले सरदार मानाजी जगताप यांना मोहम्मद अली यांच्या मदतीला पाठवले.
मोहम्मद अली आणि चंदासाहेब यांच्यातला संघर्ष वाढतचं होता, याचाचं परिणाम म्हणून १७५२ च्या जून महिन्यात यांच्यात मोठे युद्ध झाले. यात मराठे सरदार मानाजी जगताप आणि चंदासाहेब यांच्यात लढाई झाली. आता चंदासाहेब कितीही खटाटोपी असला तरी मानाजी जगताप यांच्या शौर्यापुढे त्याच एक चाललं नाही. मानाजी जगताप यांनी चंदासाहेबचा पराभव केला आणि पकडून ठार मारले.
मानाजी जगताप यांच्या शौर्याची कथा प्रतापसिंह महाराज आणि मोहम्मद अली यांच्यापर्यंत पोहोचली. लढाईतल्या विजयामुळे मोहम्मद अली खुश झाला. त्याने तंजावर भागास १० वर्षांची खंडणी माफ केली. सोबतच कोईलाडू आणि यलंगाडू या दोन परगण्याची मानाजी राव जगताप यांना जहागीर दिली.
दरम्यान, मोहम्मद अली यांना या लढाईत मुरारराव घोरपडे आणि म्हैसूरचे नंदराज दलवाई यांनी देखील मदत केली होती. त्यामुळे मानाजी जगताप यांच्याप्रमाण आपल्याला देखील जहागिरी मिळायला हव्यात असं म्हणत घोरपडे यांनी त्रिचनापल्ली आणि नंदराज दलवाई यांनी श्रीरंगम ही दोन शहरे जहागिरी म्ह्णून मागितली.
पण या दोघांच्या या मागणीला मोहम्मद अली यांनी नकार दिला. ज्यामुळे घोरपडे आणि दलवाई यांनी मोहम्मद अली सोबतच मराठा साम्राज्य विरुद्ध खलबतं करायला सुरुवात केली. यासाठी फ्रेंच राज्यकर्त्यांची मदत घेऊन नवाब मोहम्मद अली यांच्याविरुद्ध युद्ध पुकारलं. सोबतच त्यांनी छत्रपती प्रतापसिंह यांचे दिवान सखोजी नाईक याला आमिष दाखवून फितूर केले. आणि हे एवढ्यावरचं थांबले नाही, त्यांनी सरदार मानाजीराव जगताप यांना बडतर्फ करण्यास भाग पाडले.
यावेळी १७५३ ते १७५४ या दोन वर्षात नानासाहेब पेशवे यांनी कर्नाटकात तीन वेळा स्वारी केल्या. यामागे पेशवे राज्यकर्त्यांचा विचार होता कि, श्रीरंगपट्टणला शह दिला कि, घोरपडे आणि म्हैसूरकर हे जेरीस येतील आणि तंजावरचे संकट दूर होईल.
पण तंजावर भागाच्या मदतीस महाराष्ट्रातून मदत आली नाही. उलट गुत्तीकर मुरारराव घोरपडे, म्हैसूरकर, नंदराज दलवाई आणि फ्रेंच यांच्या मदतीने घोरपडे यांचा संयुक्त फौजा तंजावरवर चालून आल्या.
यावेळी चंदासाहेब यांच्याविरुद्द विजय मिळवून देणाऱ्या सरदार मानाजी जगताप यांची बडतर्फी रद्द करून पुन्हा मराठा सैन्याचे नेतृत्व प्रतापसिंह महाराज यांना दिले. या लढाईत मानाजीराव जगताप यांनी मुरारराव घोरपडे यांना पराभूत केले.
लढाईत मानाजीराव जगताप यांनी मुरारराव घोरपडे यांना पराभूत केले आणि तंजावर मधून हाकलून दिले. तंजावर येथे आपले वखार मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार फ्रेंच आणि म्हैसूरकर यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. हे सगळं झालं मानाजीराव जगताप यांच्यामुळे.
तंजावर येथे मराठा साम्राज्य कायम राखण्यात मानाजीराव जगताप यांनी मोठी भूमिका बजावली.
मात्र या लढाईनंतर प्रतापसिंह महाराजांना लगेचच बडतर्फ केले गेले. सोबतच मानाजीराव जगताप यांना सुद्धा बडतर्फ केले गेले. मात्र यामुळे तंजावर इथले मराठा साम्राज्य कोलमडून गेले. पुढे तंजावर हे संस्थान मराठा साम्राज्याच्या हातून गेले आणि इंग्रजांनी संस्थान पूर्णतः खालसा केले. आणि आज हे तामिळनाडू राज्यात आहे.
🚩 सरदार गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठान,सासवड महाराष्ट्र

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...