लेखन :विनोद कावळे पाटील
भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचे संरक्षण खऱ्या अर्थाने कुणी केले असेल तर ते क्षत्रियांनी.
त्यातही शिवछत्रपतींचे व भोसले घराण्याचे योगदान अमूल्य असे आहे हे कुणीही नाकारू शकत नाही.
शिवछत्रपतींच्याच
घराण्यातील तंजावरचे महाराज व्यंकोजी राजे भोसले यांचे वंशज सरफोजी
महाराज भोसले यांचे देखील भारताच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोठे योगदान आहे
यावर खूप कमी वाचायला मिळते. तामिळनाडूमध्ये आजही सरफोजी महाराज भोसले
दुसरे यांचे नाव मोठ्या आदराने आणि सन्मानाने घेतले जाते.
तंजावरचे
शेवटचे राजे असलेले सरफोजी महाराज भोसले हे कलासक्त साहित्यप्रेमी आणि
विद्येचा आदर करणारे होते त्यांच्या काळात तंजावरला विद्येच्या बाहेर घराचा
दर्जा प्राप्त झाला होता.
महाराज
स्वतः इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, लॅटिन या पाश्चिमात्य भाषांचे उत्तम
जाणकार होतेच पण त्याचबरोबर मराठी, तमिळ, तेलगू, हिंदी, उर्दू आणि पर्शियन
या आशियाई भाषा देखील त्यांना उत्तम अवगत होत्या.
महाराज इंग्रजी मध्ये उत्तम कविता करत असत.
तसेच ते चित्र आणि संगीत कलेचे उत्तम जाणकार होते.
ज्ञानाची
गंगा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सरफोजी राजांनी शिक्षणासाठी
त्यांच्या राज्यात विद्यालये स्थापन केली होती. सर्वसामान्यांना
उपचारासाठी रुग्णालये काढली आणि वैद्यकीय शिक्षण पीठ देखील स्थापन केलं.
हा
राजा इतका ग्रंथ वेडा होता की दरवर्षी प्रकाशित झालेली देशी-विदेशी
पुस्तके आणि हस्तलिखित शेकड्यांनी गोळा केली व पुस्तकांच्या छपाईसाठी
दगडाक्षरांचा वापर करून मुद्रणालय चालू केले.
आजही तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयामध्ये संस्कृत मराठी तमिळ तेलुगु भाषा मधील 40000 हस्तलिखीतांचा संग्रह आहे.
कवी परमानंद कृत शिवभारताला शिवचरित्रातील सर्वात महत्त्वाचे साधन मानले जाते त्याचे हस्तलिखित देखील याच संग्रहालयात उपलब्ध झाले.
असा कलाप्रेमी, शिक्षणप्रेमी, साहित्य प्रेमी विद्वान राजा हा मराठ्यांच्या इतिहासात झाला.
त्या काळातील एक किस्सा सांगितला जातो.
तिरूमलाई हे तामिळनाडूतील एक छोटसं गाव होतं. तिथून जवळच एका गावात अतिशय गरीब असा एक ब्राह्मण राहत होता.
पूर्वजांच्या
कृपेने त्याच्याकडे अतिशय अमूल्य आणि दुर्मिळ अशी ग्रंथसंपदा होती. याला
मात्र शिक्षणात फारशी रुची नव्हती किरकोळ भिक्षुकी करून आपली उपजीविका
कशीबशी तो भागवत होता.
पण
त्याच्या घरात बरेच असे ध्वजपत्रावर लिहिलेले प्राचीन असे शेकडो
वर्षांपूर्वीचे अनेक जुने आणि दुर्मिळ ग्रंथ पडलेले होते. अनेक वर्षांपासून
वेगवेगळ्या गाठोड्यांमध्ये ते ग्रंथ बांधून ठेवलेले होते.
आपल्या
गरिबीमुळे ते ग्रंथ कोणाला तरी विकून टाकावेत म्हणजे त्यातून काही पैसे
कमवून आपले दिवस ढकलावेत अशी त्याची इच्छा होती अगदी कुणी पाच 25 रुपये जरी
त्या बदल्यात दिले असते तरी तो ब्राह्मण आनंदाने तयार झाला असता.
त्याकाळी पाच पंचवीस रुपयांची सुद्धा फार मोठी किंमत होती तसेच त्याकाळी
पुस्तकांच्या हद्दीचाही धंदा वगैरे नव्हता नाहीतर त्या ब्राह्मणाने आपल्या
घरातील ही अडगळ दूर करण्यासाठी ती पुस्तके विकून काही पैसे कमावले असते.
एकदा त्या ब्राह्मणाला कोणीतरी सांगितलं तंजावरचे मराठा राजे सरफोजी राजे
भोसले यांना अशी जुनी ग्रंथसंपदा गोळा करण्याचा फार मोठा छंद आहे.
ते त्या बदल्यात चांगली रक्कमही लोकांना देतात.
हे ऐकल्यावर त्या ब्राह्मणाच्या मनात आशा पालवली.
आपण
जर हे सगळे गबाळ महाराजांना दिलं तर ते कदाचित खुश होऊन आपल्याला शंभर
रुपये सुद्धा देतील आणि मग त्यातून आपले पुढील दोन-तीन वर्षे आरामात जातील
असे त्याला वाटले.
तशीही
आपल्या या दरिद्री घरात आपल्या पूर्वजांच्या या ठेवीची फार आबाळ होत आहे.
महाराजांकडे त्यांच्या राजवाड्यामध्ये हे अगदी सुरक्षित राहतील असा विचार
करून मग त्या ब्राह्मणाने सगळ्या ग्रंथांची गाठोडी बांधली आपल्या मुला
बायकांच्या डोक्यावर आणि स्वतःच्या डोक्यावर ती भली मोठी गाठोडी घेऊन तो
पायपीट करीत तिरूमलाई वरून तंजावरला निघाला. लवकरच एका भर दुपारी
तंजावरच्या राजवाड्याजवळ पोहोचला तेव्हा राजवाड्यातील सेवकाने महाराजांना
वर्दी दिली की कुणीतरी व्यक्ती आपल्या बायका मुलांसह प्राचीन ग्रंथांचे
मोठे मोठे गाठोडे घेऊन इथे आलेला आहे. तेव्हा महाराजांनी त्या ब्राह्मणाला
सन्मानाने आत घेऊन यायला सांगितलं.
सर्वांच्या
स्नानाची आणि पंचपक्वानांच्या भोजनाची व्यवस्था करायला सांगितले आणि
जेवणानंतर त्यांची विश्रामगृहात आराम करण्याची सोय केली.
मग सायंकाळी विश्रामगृहात महाराज स्वतः त्या ब्राह्मणाला भेटायला आले.
महाराजांचे शरीर धिप्पाड होते त्यांच्या मिशा पिळदार आणि भरघोस होत्या अंगावर भरजरी शेला आणि गळ्यात हिऱ्या मोत्यांच्या माळा होत्या.
अत्यंत
आकर्षक आणि प्रसन्न असं महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. सस्मित आणि प्रसन्न
चेहरा, कपाळाला दुबोटी शिवगंध रेखलेले, अंगावर रूळलेला भरघोस काळाभोर
केशांभार व कानांमध्ये अत्यंत दुर्मिळ अशी गुलाबी मोत्यांची कुंडल डुलत
होती. महाराजांचे ते सुंदर रूप पाहून त्या ब्राह्मणाला असं वाटलं की जणू
काही स्वर्गातील देवता आपल्यासमोर अवतरली आहे. मग त्या ब्राह्मणाने
महाराजांसमोर लोटांगणच घातलं. पण महाराजांनी मोठ्या विनम्रपणे त्याला उठवलं
आणि थोडी विचारपूस करून त्यांनी त्या ब्राह्मणानं सोबत आणलेल्या एका एका
ग्रंथाचे अवलोकन करण्यास सुरुवात केली.
जुन्या तमिळ आणि जुन्या संस्कृत भाषेतील ते अति दुर्मिळ ग्रंथ होते. महाराज स्वतः संस्कृतचे आणि तमिळचे महापंडित होते.
त्याचबरोबर
त्यांना तेलुगु, कन्नड, मराठी, उर्दू, फ्रेंच, इंग्रजी, जर्मन, डॅनिश,
ग्रीक, डच आणि लॅटिन अशा विविध भाषा लिहिता वाचता आणि बोलता सुद्धा येत असत
हे आपण वर वाचलेलेच आहे.
पण
तरीही महाराजांना आपण मूळचे मराठी असल्याचा प्रचंड अभिमान होता
महाराजांचा सगळा राज्यकारभार हा मराठीत मोडी लिपीत चालायचा. तसेच आपल्या
घरात ते शुद्ध मराठीतच बोलायचे.
तंजावरच्या
गादीवर महाराजांनी 1787 ते 1832 सालापर्यंत राज्य केलं होतं पण त्या
अगोदर तंजावरला वारसा हक्काचा वाद होता सरफोजी राजे हे त्यांच्या अगोदरचे
राजे तुळाजी राजे भोसले यांचे दत्तक पुत्र होते. त्यामुळे इंग्रजांनी या
गादीच्या वादाचा फायदा उठवला आणि दहा वर्षांच्या सरफोजी राजेंना तंजावरच्या
गादीवर बसवताना त्यांच्याशी करार केला. त्या अनुषंगाने सरफोजी राजेंना
दरवर्षी एक एक लक्ष रुपयांचा तनखा मिळायचा आणि त्यासोबत तंजावरच्या
महसुलाच्या एकूण 20 टक्के रक्कम त्यांना देण्यात यायची. त्याच्या बदल्यात
तंजावरचा सगळा राजकीय व्यवहार इंग्रज बघायचे तर तंजावरची प्रशासकीय
व्यवस्था महाराजांकडे होती.
राजकीय हालचालींवर इंग्रजांचे नियंत्रण असल्यामुळे महाराजांना फार बंधनं होती.
त्यामुळे महाराजांनी आपली संपूर्ण शक्ती संशैक्षणिक सांस्कृतिक आणि लोक कल्याणकारी प्रशासकीय कामांमध्येच झोकुन दिली होती.
त्यामुळे सरफोजी राजे भोसले नी त्या ब्राह्मणाने आणलेले ग्रंथ पाहिले तेव्हा महाराज फार खुश झाले.
या ग्रंथांमध्ये कितीतरी दुर्मिळ आणि अति दुर्मिळ संस्कृत व तामिळ ग्रंथ होते.
महाराज एक-एक ग्रंथ आनंदाने छातीशी कवटाळत होते आणि मोठ्या श्रद्धेने आपल्या मस्तकाजवळ नेत होते.
मग
महाराजांनी मोठ्या आनंदाने त्या ब्राह्मणाला मिठी मारली आणि ते म्हणाले
या सगळ्यांसाठी आम्ही तुला या ग्रंथसंपदेसाठी पाच हजार रुपये सुद्धा अगदी
हसत हसत देऊन टाकू. महाराजांचे ते बोलणं ऐकून तो ब्राह्मण आश्चर्यचकित
झाला. इतक्या मोठ्या रकमेचे त्याने अगदी स्वप्नातसुद्धा कल्पना केली
नव्हती.
महाराजांनी
अमात्य महाडिक राजे यांना आणि कारभारी असणाऱ्या नरसिंह भट्ट यांना ती
रक्कम आणायला सांगितलं पण हे दोघेही महाराजांना हे सांगायला परत आले की
महाराजांचीच परवानगी घेऊन ब्रिटिशांचा ट्रेझरी अधिकारी लेफ्टनंट ड्यूमा
शिकारीला काही दिवसांसाठी तंजावरच्या बाहेर गेला आहे काही दिवसांनी तो
तंजावर मध्ये येईल तोपर्यंत आपल्याकडे तीन-चार हजार रुपये वर खर्चासाठी
आहेत आपण त्या ब्राह्मणाला थांबायला सांगून आठवड्याने परत बोलवूया.
पण
महाराज म्हणाले नाही. आम्ही असं या अमूल्य ठेव्याबद्दल कोणाचीही उधारी
ठेवू इच्छित नाही आणि महाराजांनी चक्क गळ्यातली रत्नमाला काढून त्या
ब्राह्मणाच्या हातात ठेवली. अमात्य महाडिक महाराज आणि कारभारी नृसिंह भट्ट
आश्चर्याने पाहतच राहिले कारण महाराजांच्या काळातील त्या रत्नमालेची किंमत
कमीत कमी एक लाख रुपये होती त्यांची ती अवस्था पाहून महाराज हसले आणि ते
म्हणाले अमात्य कारभारी आमच्या भारताच्या या अमूल्य वारशाची किंमत फार
मोठी आहे ही लाख रुपयांची रत्नमाला ही कवडी मोलाची आहे. रत्नमाला म्हणजे
नुसते किमती दगड आहेत पण अस्सल खजिना म्हणजे ही ग्रंथसंपदाच आहे.
महाराजांचा जयजयकार करत ते ब्राह्मणाचं कुटुंब तिथून निघून गेले.
या घटनेनंतर तो ब्राह्मण व्यक्ती त्याच्या जिल्ह्यातील सर्वात श्रीमंत माणूस बनला होता.
ज्या
भारतात सोन्याचा धूर निघत होता त्यावेळी संपूर्ण जगाच्या ज्ञानाचे मुख्य
केंद्रच होता खरं सांगायचं झालं भारतात ज्ञानाची पूजा होत होती म्हणूनच
भारतात समृद्धी होती.
त्यावेळी व्यापारासाठी जगातले सगळे लोक भारताकडेच धाव घ्यायचे.
नालंदा तक्षशिला वाराणसी अशी विद्यापीठे भारतात होती.
ज्ञानाची पूजा होत होती.
ज्ञान
व्यापार कला साहित्य संस्कृती या सर्वांचे जगातलं माहेरघर भारतच होतं.
ज्या संस्कृतीत ज्ञानाची पूजा होते ती संस्कृती जगात पुढे जाते आणि जो समाज
स्वतः चा इतिहास आणि स्वतःची संस्कृती विसरतो त्या समाजाला स्वतःची
अस्मिता आणि स्वाभिमान उरत नाही आणि असा स्वाभिमान आणि अस्मिताहीन समाज
अगदी सहजपणे दुसऱ्यांचा गुलाम होतो दुसऱ्यांच्या पोशाखांचा दुसऱ्यांच्या
संस्कृतीचं दुसऱ्यांच्या वागण्या बोलण्याचं तो कौतुक करू लागतो अंधानुकरण
करू लागतो स्वतःच्या इतिहासाला आणि स्वतःच्या संस्कृतीला कमी समजू लागतो.
एखाद्या
संपूर्ण समाजाला लुळपांगळं आणि तेजहीन बनवायचं असेल त्याची तर त्याची
संस्कृती आणि इतिहास मिटवून टाकला की काम सोपं होतं. म्हणूनच भारतावर
येणाऱ्या ब्रिटिश याबाबत चाणाक्ष होते सगळ्यांपेक्षाही वरचढ होते ब्रिटिश
इतिहासकारांनी आपल्या ढोंगी इतिहासकारांना पुढे करून भारताचा इतिहासच बदलला
स्वतःच्या हिशेबान लिहून घेतला त्यांनी इंग्लंडला विजेता जमात तर
भारतीयांना गुलाम जमात ठरवलं भारतीय समाज हा कोणाची ना कोणाची गुलामी
करायलाच जन्माला आला आहे असं त्यांनी सांगितलं तर ब्रिटिश समाज हा
सगळ्यांवर राज्य करायलाच जन्माला आला आहे असं त्यांनी शिकवलं.
भारतात
येऊन थोबाडावर आपटलेल्या सिकंदरला म्हणजे अलेक्झांडर द ग्रेट ला
विश्वविजेता म्हणून त्यांनी खोटेपणानं गौरवलं भुरट्या मुघलांना डोक्यावर
घेऊन ब्रिटिश नाचले तर छत्रपती शिवाजी महाराज लुटारू होते मराठी युद्धे
म्हणजे लुटारू आणि आणि पेंढारी होते असा संपूर्ण चुकीचा इतिहास
भारतीयांच्या कित्येक पिढ्यांना शिकवला त्यामुळेच भारत ब्रिटिशांनी
मुघलांच्या नव्हे तर मराठ्यांच्या ताब्यातून स्वतःकडे घेतला होता हे सत्य
आपल्या मराठी माणसांनाच माहिती नाही तर इतर भारतीयांची गोष्ट सोडा.
आणि आज जे काही भारतीय इतिहासाचे खरं संशोधन झालं आहे त्या संशोधनाचा मुख्य आधार तो सरफोजी राजे भोसले यांच्या कामाचा आहे.
सरफोजी
राजे भोसले यांनी त्यांच्या तौजावरच्या सरस्वती महाल लायब्ररीत
जोपासलेल्या अस्सल भारतीय अति आणि अति दुर्मिळ अशा ग्रंथसंपदेमुळे
भारतीयांना त्यांचा खरा इतिहास आणि त्यांची संस्कृती समजण्यात फार मोठी मदत
झाली आहे.
तसं
या सरस्वती महाल ग्रंथालयाचा मूळ पाया विजयनगर साम्राज्याचे एक मांडलीक
तंजावर नाईक यांनी पंधराव्या शतकात मांडला होता पण त्याला आजच हे
दैदिप्यमान स्वरूप सरपोजीराजे भोसले यांनीच दिलं. महाराष्ट्राचा जो इतिहास
आपल्याला ठाऊक आहे त्याचाही खूप सारा आधार याच तंजावरच्या सरस्वती महाल
ग्रंथालयाने पुरवला आहे शिवभारत या पंडित परमानंद नेवासकरांच्या ग्रंथाची
मूळ प्रत याच तंजावरच्या ग्रंथालयात आहे आणि याच ग्रंथामुळे शिवरायांच्या
जन्मदिवसाच्या आणि आणि शिवचरित्राच्या अनेक कोळी सुटायला फार मोठी मदत झाली
आहे.
महाराष्ट्राचा इतिहास मराठी इतिहासकारांना समजण्यासाठी तामिळनाडूच्या तंजावरच्या या सरस्वती महाल लायब्ररीने फार मोठा आधार दिला आहे.
सरफोजी
राजे भोसले यांचे कार्य फार महान आणि विविधांगी होते. त्यांनी जवळपास 50
हजार वेगवेगळे अति दुर्मिळ ग्रंथ भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात
शोधून शोधून इथं ठेवले होते.
एवढेच
नव्हे तर सरफोजीराजेंनी आपल्या तमिळ संस्कृत आणि अनेक भाषांचे तज्ञ
जाणकार लोक ठेवले होते खराब पुस्तकांचं त्यांनी पुनर्लेखन करून घेतलं आणि
अनेक दुर्मिळ पुस्तकांचं जतन केलं. अनेक महान पंडित सरफोजीराजेंनी आपल्या
पदरी बाळगले होते.
भारतातील सर्वात समृद्ध आणि संस्कृती जतन करणारे ग्रंथालय असं वर्णन एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका ने सरस्वती ग्रंथालयाचं केले आहे.
महाराज
सरफोजीराजे भोसले यांनी करोडो रुपयांची आपली खाजगी संपत्ती या कामासाठी
खर्च केली होती आपलं सगळं जीवनच या कामासाठी बहाल केलं होतं या लायब्ररीतलं
प्रत्येक पुस्तक महाराजांनी स्वतः वाचलेलं आहे असे म्हणतात. तसेच
प्रत्येक पुस्तकावर त्यांची स्वतःची सही देखील त्यांनी केली आहे.
सरफोजी
राजे भोसले यांचे कार्य फक्त ग्रंथालयांपुरतच मर्यादित नव्हतं त्यांनी
जनतेच्या कल्याणासाठी अनेक तलावांची, रस्त्यांची, रुग्णालयांची,
विद्यालयांची निर्मिती केली. तंजावर शहराच्या अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टमचे
ते रचनाकार आणि अभियंता सुद्धा होते. औषधी शास्त्रात देखील महाराजांचं
फार मोठं कार्य होतं धन्वंतरी महाल हा पारंपरिक आयुर्वेदिक भारतीय औषधी
संशोधनाचा आणि भारतीय औषध निर्मितीचा कारखाना त्यांनी तंजावरला काढला होता.
प्राचीन ग्रंथावर आधारित आणि माणसांच्या अनेक आजारावरच्या अनेक गुणकारी
औषधांची निर्मिती या धन्वंतरी महालातून केली जात होती तेवढेच नव्हे सरफोजी
राजे भोसले यांना भारतातले पहिले नेत्र शल्य चिकित्सक हा दर्जा त्यांच्या
ज्ञान आणि कार्यामुळे मिळाला आहे. सरफोजी राजे भोसले यांना शस्त्रक्रियेची
देखील विद्या अवगत होती असे म्हणतात.
त्यांच्याजवळ
डोळ्यांवर सर्जरी करण्याचं कीट असायचे आणि मोतीबिंदू चा रुग्ण मिळाला ते
त्याच्यावर तिथल्या तिथे लगेच शस्त्रक्रिया करायचे.
त्यांनी
शेकडो लोकांना स्वतः मोतीबिंदूंपासून मुक्ती देऊन नवीन दृष्टीची देणगी
बहाल केली होती. सरफोजी राजे भोसले यांच्या दरबारातील एका वकिलानं
महाराजांच्या या मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या कौशल्याबद्दल अगदी भरभरून लिहिलं
आहे. महाराज ऑपरेशन शास्त्रीय पद्धतीने करायचे याचं त्यानं त्याच्या
लिखाणात वर्णन केलं आहे.
महाराज
प्राणी प्रेमी होते त्यांना प्राण्यांची फार आवड होती म्हणून त्यांनी
तामिळनाडू पहिलं प्राणी संग्रहालय आपल्या तामिळनाडूच्या तंजावर च्या
आवारातच उभारलं होतं. महाराजांची दूरदृष्टी फार होती व्यापाराला त्यांनी
चालना देण्यासाठी अनेक योजना राबवल्या होत्या महाराजांनी जहाज बांधण्याचा
कारखाना तंजावर पासून 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मनोरा या बंदरावर
उभारला होता तसेच महाराजांनी तंजावरच्या भागात बंदुका तयार करण्याचा
कारखाना देखील उभारला होता.
महाराज स्वतः एक उत्तम चित्रकार सुद्धा होते तसेच महाराज बहुतेक वेळा स्वतः कुदळ फावडं हातात घेऊन बांधकाम सुद्धा करायचे.
फुलांची आणि झाडांची निगा राखायचे.
त्यांना
विविध प्रकारची नाणी जमवण्याचा देखील छंद होता. महाराज स्वतः कुस्तीपटू
होते ते स्वतः कुस्ती खेळायचे महाराजांना घोड्यांच्या बैलांच्या शर्यतीचा
म्हणजे प्राण्यांच्या शर्यतीचा आणि झुंजीचा देखील छंद होता.
जेलीकट्टू या तामिळनाडूच्या पारंपारिक बैलाच्या खेळाला लोकप्रिय करण्यामध्ये महाराजांचा फार मोठा सहभाग होता.
त्याचबरोबर त्यांना नृत्य, गायन आणि संगीताचा देखील छंद होता महाराज स्वतः एक उत्तम संगीत तज्ञ देखील होते.
महाराजांनी स्वतः संगीतावरचे कुमार सांबव टिका, मुद्रारक्षा चर्या, स्मृति ईश्वरग्रह, गजशास्त्र प्रधानम असे ग्रंथ लिहिले होते.
स्वतः महाराज उत्कृष्ट व्हॅलेलियम वादक आणि सनई वादक देखील होते.
महाराजांनी
तंजावर चित्रकला म्हणून तंजावरची एक वेगळी शैली तंजावर मध्ये प्रस्थापित
केली. इतकंच नव्हे तर महाराज वास्तु तज्ञ देखील होते त्यांनी पाच मजली
तंजावर महालाची योजना स्वतः आखली होती विजेपासून महालाचा संरक्षण व्हावं
म्हणून त्यांनी महालावर धातूचे वीजरोधक खांब देखील उभारले होते.
भोसले
घराण्याचा त्यांना फार अभिमान होता आपल्या भोसले घराण्याचा संपूर्ण
इतिहास शिलालेखाच्या स्वरूपात भिंतीवर त्यांनी करून ठेवलेला आहे आणि
जगातील सर्वात मोठा शिलालेख अशी या शिलालेखाची ख्याती आहे.
सरफोजी महाराज भोसले यांनी काशी यात्रा 1821 साली केली होती.
त्यांनी
त्यांच्यासोबत तीन हजार लोक घेतले होते तंजावर ते काशी या संपूर्ण
प्रवासात त्यांनी कोट्यावधी रुपयांचा दानधर्म केला होता काशीला गेल्यावर
अनेक घाटांची डागडुजी केली. घाटांवर सुंदर चित्रे काढून त्यांचे सुशोभीकरण
केले एवढंच नव्हे तर ते जाताना एका रस्त्याने गेले होते तर येताना
वेगळ्याच रस्त्याने आले त्यामुळे जाताना व येताना त्यांना जिथे जिथे भग्न
मंदिरे दिसली त्या सर्व वस्तूंचं जीर्णोद्धार करण्याचं पुण्य कर्म ही
त्यांनी केलं होतं.
महाराज
सरफोजी राजे भोसले घराण्याच्या परंपरे प्रमाणे इतर धर्मांचा सुद्धा खूप
आदर करायचे. अनेक ख्रिश्चन चर्च आणि मिशनरींच्या शाळांना त्यांनी भरभरून
मदत केली होती. तंजावरच्या बडे हुसेन दर्गा या मुस्लिम उत्सवाचे ते प्रमुख
आयोजक आणि प्रमुख पाहुणे सुद्धा असायचे.
महाराजांनी
शिक्षणाच्या कार्यातही भरीव कार्य केलं होतं त्यांनी नवविद्या कलानिधी
शाळा अशा नावाची अनोख्या प्रकारची शाळा सुरू केली होती.
ज्या
शाळेमध्ये विज्ञान गणित भाषा सोबतच वेद आणि शास्त्र सुद्धा शिकवले जायचे
तसंच राज्यातील मुलांनी नोकरी व्यवसायात अग्रेसर राहावे म्हणून कला
व्यावसायिक कौशल्य देखील या शाळेत शिकवले जायचे.
युरोपीय लोकांचे विज्ञान आणि भारतीय लोकांचे कला शास्त्र यांचा अत्यंत उत्तम संयोग या शाळेचा अभ्यासक्रमात त्यांनी केला होता.
महाराजांनी
हातांनी चालवायचा महाराजांची ख्याती ऐकून लंडनचा प्रख्यात शिल्पकार
फ्लेक्समन 1807 साली तंजावर ला आला होता त्यांनी महाराजांचा एक संगम वरी
पुतळा उभा करण्याचा महाराजांकडे परवानगी मागितली महाराजांनी ती दिली
फ्लेक्समनने रात्रंदिवस खपवून रात्रंदिवस खपवून महाराजांचा संगमवरी अतिशय
देखणा सुंदर पुतळा तयार केला.
महाराजांच्या कारभाऱ्यांनी महाराजांना आश्चर्यचकित करण्यासाठी तो पुतळा सरस्वती महाल ग्रंथालयाच्या प्रारंगणात बसवला.
महाराजांनी
तो पुतळा अगोदर पाहिला नव्हता तो महाराजांचा अश्वारूढ आणि हातात तलवार
घेतलेला वीरमुद्रेतला पुतळा होता. महाराज तो पुतळा पाहून फारसे खुश झाले
नाही.
शिल्पकाराने महाराजांची ती नाराजी तात्काळ ओळखली आणि त्याने महाराजांना विचारलं तुम्हाला पुतळा का आवडला नाही?
तेव्हा महाराज म्हणाले "हा सरस्वती मातेचा दरबार आहे.. इथं तलवारीचे घोड्याचं आणि वीर मुद्रेचे काय काम आहे?"
तिथं तर नम्रता पाहिजे.
दासाची भूमिका पाहिजे.
मग
फ्लेक्समनने महाराजांचे हे विचार ओळखले आणि रात्रंदिवस मेहनत करून परत
महाराजांचा अतिशय देखणा संगमवरी सरस्वती मातेसमोर विनम्रतेने हात जोडलेला
दास भावातला दुसरा एक संगमोरी पुतळा उभारला.
त्या पुतळ्याला पाहून मात्र सरफोजी राजे भयंकर खुश झाले. सरफोजी राजे एक अत्यंत विनम्र स्वभावाचे राजे होते.
आजही
तो महाराजांचा अश्वारूढ पुतळा सरस्वती महाल ग्रंथालयाच्या प्रारंगणात
आहे. अतिशय दयाळू कलावंत आणि जनतेच्या कल्याणासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या
राजावर त्यांची जनता अगदी जिवापाड प्रेम करायची.
7
मार्च 1832 रोजी वयाच्या अगदी 56 व्या वर्षी या महान राजाचं निधन झालं
तेव्हा त्यांच्या अंत्ययात्रेला एक लाखांपेक्षाही जास्त लोक सहभागी झाले
होते असे म्हणतात.
अफाट जनसागर आपल्या राजाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी लोटला होता.