विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 25 September 2024

#अभियंता_दिवस

 


#अभियंता_दिवस
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजधानी आणली...🚩

“किल्ले रायगडाचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हा हिरोजी इंदुलकर मोठ्या आनंदाने छत्रपती शिवाजी महाराजांना रायगड दाखवीत होते...”
“Engineering is the art of directing the great sources of power in nature for the betterment of mankind....”

हिरोजी इंदलकरांसारखा कुशल कलाविष्कार बांधकाम बांधणीचे काम महाराजांनी गडावरच्या तटाकोटाबुरुजांसाठी आणि अन्य बांधकामांसाठी नामजाद केला.. हिरोजी कामाला लागले रायगडाच्या अंगाखांद्यावर श्रावणातल्या गोकुळासारखं बांधकाम सुरू झालं गडाचे कडे आणखी अवघड करण्यासाठी सुरुंगांच्या बत्त्या शिलगावल्या जाऊ लागल्या.. सुरुंगांचे पडसाद दाही दिशांस घुमू लागले...
महादरवाजा, चित्ता दरवाजा, नाणेदरवाजा, वाघ दरवाजा आणि अवघड सांदीसापटीत बांधलेला चोरदरवाजाही अंग धरू लागला.. तीन मनोरे रूप घेऊ लागले.. नगारखाना, सातमाडी महाल, पालखी दरवाजा, मेणा दरवाजा, शिरकाई भवानीचं देऊळ, कुशावर्त तलाव, गंगासागर कोळंब तलाव पाण्याने भरू लागले.. कमीजास्त चाळीस बेचाळीस दुकानांची दोरी लावून सरळ रांग उभी राहिली.. मधे रस्ता, समोर दुसरी रांग... जगदिश्वराचं भव्य मंदिर उभं राहिलं..असा रायगड पगडीवरच्या कलगीतुऱ्यांनी आणि नऊ रत्नांच्या फुलदार जेगो चौकड्यांनी सजवावा तसा हिरोजींने इंदलकरांनी सजवला...

केवळ राजधानीचा किल्ला म्हणून तो सुंदर सजवावा एवढीच कल्पना रायगडच्या बांधणीबाबतीत नव्हती तर एक अजिंक्य लढाऊ किल्ला म्हणून गडाचं लष्करी महत्त्व महाराजांनी आणि हिरोजींने दक्षतापूर्वक लक्षात घेतलं आहे गडावरच राजघराण्याचं वास्तव्य राहणार असल्यामुळे राजस्त्रियांची राहण्याची व्यवस्था हिरोजींने खानदानी पडदा सांभाळून केली या विभागाला बादशाही भाषेत म्हणत असत.., झनानखाना किंवा दरुणीमहाल किंवा हरमखाना पण रायगडावर या कौटुंबिक राजवाड्याला म्हणत असत.. ‘राणीवसा’ या राजकुटुंबाच्या विभागात प्रवेश करण्याकरिता स्त्रियांसाठी दक्षिणेच्या बाजूस एक खास दरवाजा बांधला त्याचं नाव ‘मेणादरवाजा’.. बारद्वारी आणि बाराकोनी उंच झरोक्याचे दोन मनोरे गडावर बांधले या मनोऱ्यात प्रत्येक मजल्यावर मध्यभागी कारंजी केली भिंतींशी लोडतक्के ठेवून सहज पंधरा-सोळा आसामींनी महाराजांशी गोष्टी बोलण्याकरता व राजकीय चर्चा करण्याकरता बसावं अशी जागा मनोऱ्याच्या दोन्ही मजल्यांवर ठेवली आहे...

( ✒️ @sachinpokharkar_ )

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...