विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 30 November 2024

भारताला इंडिया का म्हणतात?

 


भारताला इंडिया का म्हणतात?


सिंधू हि नदी भारताच्या प्राचीन इतिहासाचे एक फार मोठे सुवर्णस्थान आहे. जगातील सर्वात प्राचीन अशा तीन नागरी संस्कृतींपैकी एक "हरप्पा-मोहोन्द्जोरो" याच सिंधू नदीच्या खोर्यात विकसित झाली. त्यामुळे भारताला ओळख मिळाली ती या सिंधू नदी वरून.

आपल्या सोबत नांदत होती ग्रीक संस्कृती . ग्रीक लोकांनीच या सिंधू नदीच्या खोर्यात राहणाऱ्या लोकांचे नामकरण केले "इंडोई (इंडस नदीच्या खोर्यातील लोक)" आणि म्हणून या हरप्पा संस्कृतीला नाव पडले "इंडस सिव्हिलायझेशन".

त्यावरूनच भारताला नाव पडले "इंडिया". अर्थात सिंधू संस्कृतीच्या पलीकडील प्रदेशाला "इंडिया" असेच ओळखले जात असावे. कारण आजच्यासारखी सीमा आखणी तेंव्हा झाली नव्हती, आणि बांगलादेश, पाकिस्तान, भूतान हे अखंड भारताचा भाग होते.

पर्शियन लोकांनी याच सिंधू नदीच्या खोर्यातील लोकांना नाव दिले "हिंदू" . (पर्शियन भाषेतील हिंदू हे नामाभिधान "इंडिया"च्या अगोदरचे मानले जाते). यावरूनच येथील वैदिक धर्माला नाव मिळाले "हिंदू". याच इतिहासाचा आधार घेऊन स्वा. सावरकर 'सहा सोनेरी पाने' मध्ये म्हणतात, कि हिंदू या शब्दामध्ये केवळ धर्म प्रतीत होत नाही तर राष्ट्रीयत्व सुद्धा प्रतीत होते. संपूर्ण भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, जरी त्यामधील सर्व भारतीय हिंदू धर्माचेच असतील असे नाही.

इंडिया म्हणजे "इंडीपेंडंट नेशन डिक्लेर्ड इन ऑगस्ट" हा जो मेसेज वोट्स एप वर फिरत आहे, तो सर्वथैव चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे.

तेंव्हा तुम्हाला आता कळले कि भारताला "इंडिया" हे नाव प्राचीन इतिहासापासून सिंधू नदीवरून पडले आहे. आणि याच नावावरून "हिंदू" हेही नामाभिधान आहे, आणि भारताला हिंदुस्थान असे म्हटले गेले.

आपण भारतीय आपल्या प्रिय राष्ट्राला "भारत"असे म्हणतो. हे नाव "भरत" राजावरून पडले आहे (भरत हा राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा सुपुत्र- याचा उल्लेख महाभारताच्या आदि पर्वात आला आहे. महाकवी कालिदासाचे शाकुंतल हे नाटक याच भरताच्या जन्म कहाणीवर आधारित आहे. राजा भरताचे मूळ नाव "सर्वदमन" असे असून, महाभारतानेच त्याचे नाव भरत (तेजपुंज वा प्रभा असणारा, अंधाराचा विनाश करणारा, विद्यावान इ.) असे ठेवले. हा भरत राजा कुरु आणि पंडू वंशाचा पूर्वज आहे, म्हणूनच व्यासांनी या वंशांच्या इतिहासावर आधारित महाकाव्याला नाव दिले "महाभारत" ) . थोडक्यात "भारत" हे संस्कृत नाव आहे. (भा म्हणजे "ज्ञान वा प्रकाश किंवा ज्ञानाचा/विद्येचा प्रकाश आणि रत म्हणजे पसरवणारा/वाहून घेतलेला- म्हणजेच भारत म्हणजे "ज्ञानाचे प्रकाशाने अंधाराचा विनाश करणारा). इतरही अनेक भारतीय भाषांनी आणि आपल्या सन्माननीय संविधानाने सुद्धा "भारत" हे नाव स्वीकारले आहे.

।।जय हिंद। वन्दे मातरं।।
- हर्षद माने। प्रबोधक सज्ञान महाराष्ट्र उपक्रम

तंजावर संस्थान

 तंजावर संस्थान

तंजावर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मद्रास इलाख्यातील पूर्वीचे एक संस्थान. सध्या हा प्रदेश तमिळनाडू राज्यात समाविष्ट झाला आहे. क्षेत्रफळ १२,२७२ चौ.किमी. व लोकसंख्या २५,६३,३७५ (१९४१). पूर्वेस बंगालचा उपसागर, उत्तरेस कावेरीची उपनदी, पश्चिमेस तिरुचिरापल्ली व पुदुकोट्टई, दक्षिणेस रामनाड यांनी सीमित झाले होते. दहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत हा प्रदेश चोलांच्या अंमलाखाली होता. तेराव्या शतकात येथे होयसळ राजांचा अंमल प्रस्थापित झाला आणि पुढे ते विजयानगरच्या आधिपत्याखाली गेले (१४००–१५६५). विजयानगरच्या अस्तानंतर मदुराईच्या नायकांप्रमाणे तंजावरचे नायकही स्वतंत्र झाले. शेवटच्या विजयराघव नायकाच्या वंशजाने विजापूरची मदत मागितली. ती मदुराईपासून स्वतंत्र झालेल्या अळगिरी नायकाविरुद्ध लढण्याकरिता होती. विजापूरतर्फे शहाजीराजे मदतीस आले. शहाजींनी प्रथम बाल नायकास गादीवर बसविले; परंतु पुढे आपणाकडे कारभार घेऊन तिथे हळूहळू मराठे घराण्याचे वर्चस्व स्थापन केले. पुढे शहाजींचा मुलगा व्यंकोजी याने तंजावरची गादी १६७६ मध्ये बळकाविली. शिवाजी महाराजांनी कर्नाटकच्या मोहिमेत व्यंकोजीस हे राज्य मागितले आणि सर्व मराठ्यांचे एक संघटित राज्य करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तंजावरचा मूळ शाखेशी संबंध जवळजवळ तुटला. तंजावरखेरीज व्यंकोजीच्या राज्यात अरणी, पोर्तोनोव्हो व बंगलोरची मोठी जहागीर होती. व्यंकोजीच्या मृत्यूनंतर (१६८४) त्याच्या शहाजी, सरफोजी व तुकोजी या तिन्ही मुलांनी राज्य केले : शहाजीने (१६८४–१७१२) तंजावरहून, सरफोजीने (१७११–२८) सक्कोटाईहून (कुंभकोणम्‌जवळ) व तुकोजीने (१७२८–३६) महादेवीपट्टणहून (मन्नारगुडीजवळ). या काळात मोगलांचा या प्रदेशातील सुभेदार जुल्फिकारखान आणि नंतर अर्काटचे नबाब यांनी तंजावरकडून खंडण्या वसूल केल्या, तर तंजावरने मदुराईकडून काही प्रदेश मिळविला. शहाजीच्या काळात म्हैसूरकडूनही तंजावरला उपद्रव पोहोचला. तुकोजीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बाबासाहेब याने वर्षभर आणि पत्नी सुजानबाई हिने दोन वर्षे संस्थानचे राज्य केले. खरी सत्ता तंजावरच्या सय्यद किल्लेदाराकडे होती. त्याने कोयाजी कट्टीगाई यास गादीवर बसविण्याचा घाट घातला; पण लोकप्रियतेमुळे तुकोजीचा दासीपुत्र–प्रतापसिंह (१७३९–६३) गादीवर आला. कोयाजीला साहाय्य देण्याच्या निमित्ताने फ्रेंचांनी कारिकल (१७३९) तर इंग्रजांनी देवीकोट्टई बळकाविली (१७४९). त्याला प्रतापसिंह विरोध करू शकला नाही. चंदासाहेब व मुहंमद अली यांच्या भांडणात तंजावर स्वाभाविकपणे युद्धक्षेत्र बनले. प्रतापसिंहाने इंग्रजांची बाजू घेतली. १७६२ मध्ये मुहंमद अलीने इंग्रजांच्या मध्यस्थीने तंजावरवर चार लाखंची खंडणी बसविली. प्रतापसिंहानंतर तुळाजी (१७६३–८७) गादीवर आला. त्यास पुत्र नसल्यामुळे दत्तकवारसाबद्दल तंटे होऊन ब्रिटिशांनी अमरसिंगास पाठिंबा दिला. १७६९ मध्ये हैदर अलीने तंजावरकडून चार लाख खंडणी वसूल केली.
तंजावरचा राजा, हैदर अली व मराठे यांच्याबरोबर काही मसलत करीत आहे, या सबबीवर इंग्रजांनी तंजावर १७७३ मध्ये आपल्या ताब्यात घेतले; परंतु १७७६ च्या तहाप्रमाणे पुन्हा ते त्यांना परत द्यावे लागले. १७९९ मध्ये सरफोजी राजाने आपला सर्व मुलूख कंपनीच्या हवाली करून राजसंन्यास घेतला. दरम्यानच्या काळात तंजावरचा कारभार मुहंमद अलीचा मुलगा अमीरुल हा पहात असे. सरफोजीला सालीना एक लाख रु. व महसुलाच्या पाचव्या हिश्श्याची नेमणूक देऊन कंपनीने तंजावर खालसा केले. मात्र राजाचा अधिकार फक्त तंजावरचा किल्ला व त्याचा परिसर एवढ्यापुरता मर्यादित ठेवला होता. दुसऱ्या सरफोजीचा गादीवर आलेला पुत्र शिवाजी (१८३३–५५) निपुत्रिक वारल्याने तोही अधिकार पुढे संपुष्टात आला व इंग्रजांनी संस्थान पूर्णत: खालसा केले.
तंजावरचे सर्वच मराठे राजे विद्या-कलांना आश्रय देणारे, संस्कृत-तेलुगू-तमिळ-मराठीतून ग्रंथरचना करून घेणारे, बहुभाषिक, व्युत्पन्न असे होते. व्यंकोजीने तेलुगूत द्विपद रामायण लिहिले, तुकोजीने संगीत सारामृत हा दाक्षिणात्य संगीतावरील ग्रंथ लिहिला. शहाजीच्या काळात अनेक तमिळ नाटके लिहिली गेली. त्याने शहाजीपुरम् नावाचे गाव वसविले. त्याला आणि तुळाजीला अद्वैत तत्त्वज्ञानात विशेष रस होता. शहाजीने सरस्वती महाल येथे हस्तलिखितांचा अमूल्य संग्रह केला. तर दुसऱ्या सरफोजीने त्यात भर घातली. या दोघांना स्थापत्यातही रस होता. मनोरा ही आठ मजली इमारत दुसऱ्या सरफोजीने बांधविली. त्याचप्रमाणे दोघांनीही वैद्यकात रस घेतला व त्यावरील ग्रंथरचना करून घेतली. शहाजीने रुग्णालयासाठी दूरच्या प्रदेशांतून वैद्यक–हकीम आणविले, तर सरफोजीने धन्वंतरी महाल या संस्थेतर्फे १८ खंडात्मक एक वैद्यकीय संशोधनावर संशोधनपर ग्रंथ लिहून घेतला. मराठ्यांच्या काळात तंजावरमध्ये धर्मशाळा, अन्नछत्रे होती. सर्व राजे परर्धमसहिष्णू होते. शहाजीने पोर्तुगीजांच्या अन्याय्य धर्मप्रसारास आळा घाताला खरा; पण प्रतापसिंहाने नागौरला मशीद बांधली. दुसऱ्या सरफोजीस पाश्चात्य वाङ्‌मयात गोडी होती. त्याने काही इंग्रजी ग्रंथ जमविले. त्याला चित्रकला आणि शास्त्रीय ग्रंथांचा छंद होता. त्याने देवनागरी खिळ्यांचा छापखाना काढला होता. एकंदरीत संस्थान ईस्ट इंडिया कंपनीत विलीन होईपर्यंत संस्थानने अनेक सांस्कृतिक क्षेत्रांत स्पृहणीय प्रगती केली होती.
संदर्भ : १. पारसनीस, द. ब. तंजावरचे राजघराणे, मुंबई, १९१२.
२. वाकसकर, वि. स. तंजावरचे मराठे राजे, बडोदे, १९३३.
इन्साईट आणि अ‍ॅड पहा
सर्व प्रतिक्रिया:
Narendra Chaudhari, Dnyaneshwar Ghatekar Patil आणि अन्य ४८
१६ शेअर
लाईक
टिप्‍पणी
पाठवा
सामायिक करा

भारताला इंडिया का म्हणतात?

  भारताला इंडिया का म्हणतात? सिंधू हि नदी भारताच्या प्राचीन इतिहासाचे एक फार मोठे सुवर्णस्थान आहे. जगातील सर्वात प्राचीन अशा तीन नागरी संस्क...