विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 17 January 2019

🙏🙏वीर_बाजी_पासलकर 🙏🙏

🙏🙏वीर_बाजी_पासलकर 🙏🙏
🙏🙏बाजी पासलकर हे मोसे मावळ खोर्याचे वतनदार या भागातील ७४ खेडी हि त्यांची वतनदारी होती . मोसे व तव गावचे ते देशमुख . शिवाजीराज्यांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेऊन सुरवात केली. सुभानमंगळ हा शिरवळ जवळील किल्ला प्रथम मावळ्यांनी घेतला . हा भुईकोट किल्ला नदीच्या कडेला होता आता फक्त एक बुरुज शिल्लक आहे.
नंतर तोरणा ,सिह्गड पुरंदर अशे एकामागूनक किल्ले घेत शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीसाठी एक एक मावळाही जमा करीत होते त्यात शिवाजी राज्यांनी येसाजी कंक ,बाजी पासलकर,तानाजी मालुसरे हे प्रमुख होते.
मराठ्याच्यामध्ये त्यावेळचे जेष्ठ आणि श्रेष्ठ पराक्रमी बहादूरांपैकी बाजी पासलकर एक . ते मूळचे पौड जवळील तव गावचे पण त्यांचा एक वाडा मोसे गावातही होता.
खरा दिलदार म्हणून त्यांची ख्याती होती . लोकांचे तंटे बखेडे सोडवणे आणि सलोखा घडवून आणावा यात तहाची खासियत होती गोरगरिबांना उदार हाताने मदत करावी लग्न कार्य पारपाडावीत निराधारांना आधार यामुळे मोसे खोऱ्यात त्यांची लोकप्रियता हाती .
बाजी पासलकर एक धिप्पाड बुलंद शरीरयष्टीचा माणूस. भरदार मिश्या आणि शरीर कमावलेले . त्यांनी १४ शूर राजपूत आणि १०० नोकरचाकर पदरी ठेवले होते . बाजी पासलकरांचा वाडा कायम लोकांनी भरलेला असे .
त्यांच्याकडे एक घोडी होती ती विजापूरच्या बादशहास नजर करण्याच्या हेतूने बाजीच्या जावयाने ५०० लोकांचा छापा घालून तिला पळवले. पण त्यांच्या चाकरीस असलेल्या यल्लाजी शंकर गोठे या इमानी सहकार्याने बऱ्याच लोकांना ठार मारले. खुद्द बाजींनीही स्वतःच्या जावयास धरणीवर पाडले.
बाजींनी आपल्या मुलीचे लग्न कान्होजी जेध्यांना मुलाला देऊन आपले जावई करवून घेतले होते . त्याचे नाव बाजी जेधे आणि मुलीचे नाव होतं सावित्री.
विजापूरच्या दरबारात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या बातम्या थडकल्यामुळे शिवाजी महाराजांच्या बंदोबस्तासाठी आदिलशहाने १६४८ मध्ये फत्तेखानास पाठवले . फत्तेखानाने जेजुरीजवळील बेलसर येथे तळ ठोकला . खानाच्या फौजांनी बाळाजी हैबतराववच्या सरदाराच्या नेतृत्वाखाली घेतलेला सुभानमंगळ किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी एक एक वीर निवडले त्यात गोदाजी जगताप,भिमाजी वाघ,संभाजी काटे,भिमाजी इंगळे भिकाजी चोर व त्याचा भाऊ बहिरीजी चोर ,कावजी मल्हार(कोंढाळकर ) खासनीस ,बाजी पासलकर.
खानाची छावणी #बेलसर येथे होती .महाराजांकडे फक्त १२०० चिवट मावळे महाराजांनी रात्री छापा टाकण्याचा डाव केला महाराजांच्या झेंड्याखाली जमलेल्या मावळ्यांनी छापा टाकला सैन्याची दाणादाण उडवून टाकली. महाराजांच निशाण होत बाजी पासलंकाराच्या जावई याच्या हातात बाजी जेधेंच्या हातात . बापास कान्होजी जेध्यांना न विचारता महाराजांच्या स्वराज्यात सामील आलेले यांनी महाराजांचे निशाण खानाच्या सैंन्याच्या गराड्यातून सही सलामत आणले.
खानाने पुरंदरवर चिडून आपली फौज चाल करण्यासाठी घेऊन आला त्यात होते मुसेखान,शेख निनाद,रतन बजाजी नाईक,माताजी घाडगे .राज्यांनी गडाचे दरवाजे उघडले .घनघोर युद्ध झाले
गोदाजीने मुसेखानास यमसदनिस पाठवले . खांद्यपासून पोटापर्यंत मुसेखानाची फाकळी उडाली . खान पडल्यावर खानाचे सैन्य सासवड कडे पळू लागले.
वीर बाजी पासलकर व कावजी म्हल्हार खासनीस यांनी सासवड पर्यंत पाठलाग केला. . सासवडमध्ये पुन्हा हातघाईची लढाई जुंपली खानाच्या सैन्याची डोकी उडाली पण बाजी पासलकर कामी आले .. खान घाबरून विजापुरास पळून गेला ..
या बळीरामाचे वाटृक्षसारखे छत्र गेल्याने महाराजांना खूप दुःख झाले या युद्धात बाजी पासलकरांचा खास विश्वासू य्येलाजी शंकर गोठे कमी आले असावेत कारण पासलकर यांचा समाधी पासून जवळच स्वातंत्र्यसेनानींच्या स्तंभा जवळ एक दगड (तांदळा )आहे, त्यास' मांगीर बाबा 'म्हणतात ते त्याचे स्मारक स्थळ आहे.
गावखुरीतील ओढ्यापासून ते धान्य बाजारपेठ ते जेजुरी नाका या ठिकाणी अनेक जण धारातीर्थी पडले. गावखुरीत सरदार_नंदाजी_जगताप धारातीर्थी पडले . जेजुरी_नाका_लांडगे अळी येथे जे पांढरे दगड दिसतात ते त्या ठिकाणी युद्धात मेलेल्या माणसांच्यासाठी स्मृती स्थाने म्हणून दगड रोवण्यात आले . बाजी पासलकरांचा समाधी सासवडच्या धान्य बाजारपेठेत आहे.
त्यास यशवंतराव यांची समाधी म्हणून ओळखली जाते . यशवंतराव" हा #किताब पिढ्यान पिढ्या मिळालेला होता बाजी पासलकरांना . बाजीचे वर्णन करताना सभासद बखरीमध्ये बखरकार म्हणतो बाजी पासलकर महायोद्धा, त्याच्या मिश्या दंडा एव्हड्या यास पीळ देऊन स्वारी केसांच्या आधारे दोन लिंबे ठेवीत होता .असा शूरमर्द ठेविला "त्यांच्या पवित्र स्मृतीस आमचे शतशः प्रणाम हि लढाई १६४८ च्या शेवटी आठवा १६४९ च्या सुरवातीस झाली असावी . 🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...