कोण आहे हा महान योद्धा ज्याची आहे हि समाधी, स्वराज्यासाठी गमावले प्राण पण नाही इतिहासात जास्त उल्लेख
म्हाळोजी बाबा घोरपडे यांची आहे हि समाधी. यांनी लावला स्वराज्यासाठी मोठा हातभार पण नाही केला गेला या प्रमुख योध्याचा उल्लेख पहा कोण आहे हा महान योद्धा. मुकर्रबखानाची फौज संगमेश्वराच्या वेशीला भिडलेली असताना स्वराज्यासाठी लढणारे ५०० मावळे सज्ज झाले मुकर्रबखान च्या मोठ्या अफाट फौजेला लढा देण्यासाठी. कडाडला एल्गार हर हर महादेव ची आरोळी दुमदुमली आणि बघता बघता तलवारी खनाणु लागल्या…झाडा-पानांवरची पाखरं फडफड करत उडाली…अरे काळोख थरारला….रात्र थरारली. अाक्रोश-किंकाळ्यांनी परिसर दुमदुमुन गेला, शौर्याची लाट उसळली…अवघं तुफान तुफान झालं…अरे एकेक मावळा झुंजत होता…शर्थीनं लढत होता. बस्स्स. मोगलांची कापाकापी करत होता… जसे आपले शिवराय सांगायचे माझा एक मावळा १०० लोकांना भारी तशीच हि काही ५०० ची मराठा फौज स्वराज्य रक्षणासाठी लढत होती.अश्या लढाईत महाराजांचा १ १ मावळा मुकर्रब च्या ५०० लोकांना भारी पडू लागला त्यातच आपले मावळे त्यांच्या फौजेला खपाखप कापू लागले त्यातील आपले साठ वय असणारे म्हाळोजी म्हणाले आता बस्स आणि पडले तुटून रक्ताच्या चिळकांड्या उडवू लागले, प्रेतांचा थर साचू लागला, हर हर महादेव ची डरकाळी फोडत म्हाळोजी फिरत होते अशे शौर्य पाहत मुकर्रब उभा होता आणि ते पाहून म्हणाला इस बुढे को पहले लगाम डालो…फिर बाकी को देखो ! असं म्हणताच त्याची फौज म्हाळोजी ना विळखा घालू लागली अभिमन्यू सारखा आपला साठीचा म्हाळोजी अडकला.मुघल सेना म्हाळोजीवर तुटून पडली दोन्ही हातात तलवारी घेऊन लढणारे म्हाळोजी खाली पडले रक्ताच्या चिरकांड्या उडवीत पहिली फळी गारद झाली. असलं अफाट अफाट धैर्य, शौर्य मुकर्रबखान ने बघितलं आणि पाहिलं वाघ तो वाघच. असला ढाण्या वाघ पाहून मुकर्रब ने कमानमाराला बोलावले आणि म्हाळोजीवर निशाणा साधला. पहिला तिर उजव्या दंडात शिरला शमशेर खाली पडली दुसरा तिर कंठात घुसला दोन्ही समशेरी खाली पडल्या नि:शस्त्र झाला म्हाळोजी. मुंगीसारखं सैन्य म्हाळोजीवर तुटून पडलं अशी एक जागा शरीरावर नाही राहिली जिथे वार झाले नाही. रक्तबंबाळ झालेला म्हाळोजी मातीत पडला माती उडाली त्या धिप्पाड शरीराला पाहून. अश्या योध्याने मातीसाठी प्राण सोडले, अरे मातीच नाही स्वराज्यासाठी आपल्यासाठी त्याने अशी अभूतपूर्व कामगिरी आणि स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान दिले. या योध्याची गाथा ऐकून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही तुम्ही या योध्यासाठी एक शेअर करू शकता का माहिती आवडली असेल तर.
No comments:
Post a Comment