रघूजी भोसले (प्रथम)
रघूजीराजे भोसले
|
|
|
|
राजधानी
|
|
जन्म
|
|
मृत्यू
|
|
उत्तराधिकारी
|
|
संतती
|
जानोजी, मुधोजी
|
राजघराणे
|
भोसले
|
भोसले राजवंशाचे रघूजीराजे
भोसले (१६९५ - १४ फेब्रुवारी १७५५) हे मराठा साम्राज्याचे नावाजलेले सरदार
होते. ते रघूजी भोसले प्रथम, राघोजी भोसले या
नावांनीही ओळखले जातात. त्यांनी छत्रपती शाहूंच्या कारकीर्दीत पूर्व-मध्य भारतात
नागपूर साम्राज्यावर कब्जा केला.[१] १८५३ मध्ये इंग्रजांनी ताबा
घेण्यापर्यंत त्यांच्या वारसांनी नागपुरात राज्य केले.
मूळ
भोसले कुटुंब हे मूलतः देवर किंवा देवूर (सध्या सातारा
जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात) गावचे
प्रमुख होते. रघुजींचे आजोबा आणि त्यांचे दोन बंधू शिवाजी महाराजांच्या सैन्यांत लढले होते आणि त्यांच्यातील सर्वात
प्रतिष्ठित लोकांना सैन्यात उच्च लष्करी पदे आणि
बेरारमधील चौथांचा संग्रह बहाल करण्यात आला होता.
नागपूर साम्राज्य
नागपूर
त्यावेळी गोंडवाना साम्राज्याची
राजधानी होती जिथे
देवगडच्या गोंड घराण्याचे राज्य होते. छिंदवाडा जिल्ह्यातील देवगडचा गोंड राजा बख्त बुलंद शहा याने १७०२
साली नाग नदीच्या तीरावर नागपूर शहराची स्थापना केली. बख्त
बुलंद शहानंतर त्याचा मुलगा राजा चांद सुलतान देवगडच्या गादीवर आला. त्याने १७०६ साली त्याची राजधानी नागपुरास हलवली.
रघुजींनी काम
केलेल्या नगरधन किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, नागपूर शहर
दमलेचररीची लढाई
दोस्त अली खानने चंदासाहेबांना तिरसव्यपुरम राजाच्या विरोधात
मोर्चा काढायला सांगितलं. तेव्हा तिरसव्यपुरमच्या राजाने
मराठा साम्राज्याची मदत मागितली. लवकरच मुघल सेना आणि मराठा सरदार रघुजींच्या कमानीत मराठा सेना दमलेचररी येथे भिडल्या. हि मुघल आणि मराठा शैब्यातली एक मुख्य लढाई
म्हणून प्रसिद्ध आहे. या लढाईत रघुजींनी दोस्त अली खानाचा
पाडाव करून कर्नाटकेत तीन वर्षांपर्यंत कब्जा मिळवला.
बंगालमधील मोहिमा
कर्नाटकातील त्रिचनापोलीच्या लढाईतील यशस्वी मोहिमेनंतर मराठा
साम्राज्याने बंगालमधील मोहीम हाती घेतली.
रघुजींना या मोहिमेचे नेते बनवण्यात आले. १७२७ मध्ये मुर्शीद कुली खानच्या मृत्यूनंतर त्या भागात अंदाधुंदीच्या
परिस्थितीचा यशस्वीपणे वापर करून राघूंईंनी
रघुजींनीओरिसा आणि बंगालच्या काही भागावर कायमचा कब्जा केला.[२] बंगालच्या नवाबाने
मराठ्यांना सुवर्णरेखा नदीपर्यंतचा प्रदेश आणि बंगालची २० लाख रुपये (पश्चिम बंगाल आणि बांगलादेश दोन्हीसह) आणि
बिहार (झारखंडसह) साठी १२ लाख कर मान्य केला. अशा प्रकारे
बंगाल मराठा साम्राज्यात सामील झाले.[३]
व्यक्तिमत्व
रघुजी अत्यंत धाडसी आणि शीघ्र निर्णयी असे मराठा सरदार होते.
त्यांनी शेजारील राज्यातील राजकारणिक समस्यांचा फायदा
उचलत आपले धोरण आखले आणि आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण केल्या. त्यांच्या सैन्याने दोनदा बंगालवर आक्रमण केले आणि कटकवर सुद्धा आपला अंमल स्थापित केला. सन १७४५ ते १७५५ दरम्यान त्यांनी चांदा, छत्तीसगड, आणि संबलपूर आपल्या अखत्यारीत आणले.
मृत्यू आणि उत्तराधिकारी
१४ फेब्रुवारी
१७५५ रोजी रघुजींचे निधन झाले. निधनानंतर जानोजी नागपूरच्या गादीवर उत्तराधिकारी
म्हणून आले.
२६ जानेवारी १७७४
रोजी रघुजींचे दोन पुत्र जानोजी आणि मुधोजी ह्यांच्यात सत्तेवरून पाचगांव येते लढाई झाली. या लढाईत मुधोजींनी जानोजींचा वध केला आणि आपला मुलगा रघुजी द्वितीय ह्याला
गादीवर बसवले. [४]
संदर्भ
· · SNHM. Vol. II, pp. 209, 224.
· · Fall Of The Mughal Empire- Volume 1 (4Th
Edn.), J.N.Sarka
· "पांचगांव के मैदान में भोसले राजपरिवार के संस्थापक रघुजी भोंसले के
पुत्रों की सेनाएं आपस में भीड़ी थी". २७ जानेवारी २०१६. २१
एप्रिल २०१८ रोजी पाहिले.
No comments:
Post a Comment