विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 20 January 2019

गोंड घराणे


गोंड घराणे
प्राचीन इतिहासात अनेक राजे, घराणे होऊन गेलेत पण विदर्भातील गोंड घराणे सर्वात जास्त दुर्लक्षित राहिले.
प्राचीन महाराष्ट्रामध्ये शेवटच्या काळात हुण व मुस्लिम आक्रमणामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली.या वेळी यादवांनी देवगिरी येथे आपली राज्य स्थापन केले:याच काळात चांदा (चंद्रपूर) येथे गोंड घराण्याने आपली सत्ता प्रस्थापित केले.
गोंड राजाणी 62 जवळपास अनेक शतके महाराष्ट्रामध्ये देवगड, नागपूर, चंद्रपूर या तेव्हाच्या प्रदेशावर राज्य केले.
*कोल भिल हा या घराण्याचा संस्थापक होय. त्याने विखुरलेल्या गोंड जमातीला एकत्र करण्याचे व नाग वंशीयाविरूद्ध लढा देण्याचे तंत्र शिकवण्याचे काम केलं. भिम बल्लाळ सिहांपासुन गोडांचा ईतिहास लिखीत स्वरुपात पाहावयास मिळतो. याने शिरपूर येथे राजधानी हलवली. केशरसिगांच्या काळात यांच्या विस्तार भिल्ल देशांपर्यत झाला. दिनकर सिंग हा एक शांतता प्रिय , कला , विद्या व साहित्याचा भोक्ता असलेला राजा होऊन गेला. अनेक कवी व विद्वानाना त्याच्या दरबारात आश्रय दिला.
सुर्जा बल्लाळ सिंग हा सर्वात महत्वपूर्ण राजा होऊन गेला. त्याने बनारस व लखनऊ येथे जाऊन युद्ध व संगीत या कलांचे शिक्षण घेतले.
खांडख्या बल्लाळ शाहने 1437-1462 पर्यंत राज्य केले. हा असाध्य रोगाने त्रासला होता. पत्नीच्या सल्याने शिरपूर येथुन राजधानी बल्लारपूर स्थलांतरित केली व तेथे किल्ला बांधुन राहु लागला. या राजाने प्रसिद्ध अचलेश्वराचे मंदिर बांधले. गादीवर आलेल्या हिरशाह याने मंदिराच्या तटबंदीचे काम पुर्ण केले. नीलकंठ शाहच्या काळात चांदा प्रांतावर रघुजी भोसलेचे आक्रमण झाले तो भोसल्याच्या कैदैत असतानाच त्याचा मृत्यू झाला. .
नागपूर च्या भोसलैच्या प्रदेशात हा भाग समाविष्ट करण्यात आला. ....
गोंड राज्यानी आदिवासी जमातातील लोकांना संघटीत केले लष्करी प्रशिक्षण दिले तस्सेच संघटीत करून त्यांचा विकास घडवून आणला. एकदंरीत आदिवासी समाजाला इतिहासात स्थान मिळवुन देण्याचे काम गोडांनी केले म्हणूनच त्यांच्या वैभवशाली कालखंडाची इतिहासात नोंद होणे आवश्यक ठरते. ...
संदर्भ -मध्ययुगीन भारत -सतीश चंद्र
#सातवाहन_ते_यादव
फोटो-संग्राहातील

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...