विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 22 January 2019

सरसेनापती संताजी घोरपडे

सरसेनापती संताजी घोरपडे म्हणजे एक मोठ्या मनाचे सेनानी -
जिकडे क्रांती घडावी तिकडे मग त्यांच्या तावडीतून शत्रूची सुटका नाही आणि जिकडे लोकांना सांभाळायचं असेल तिकडे मोठ्या मनाचे सरसेनापती आहेत.
शरीरप्रकृतीप्रमाणेच माणसाची स्वभावप्रकृती त्याच्या जीवितकार्यावर परिणाम घडवून आणते. संताजी घोरपडे ह्यांची प्रकृती ही राजकारण्याची अथवा मुत्सद्द्याची नाही तर ती आहे एक सच्चा सेनानीची प्रकृती. त्याच्या ठिकाणी छक्केपंजे नाहीत सगळा उघड मामला आहे. संताजी घोरपडे ह्यांच्या अंगी असणाऱ्या शौर्यपराक्रमापदी गुण आहेतच कारण स्वराज्याच्या अडचणीच्या काळात आणि निराशेच्या अंधकारातही स्वराज्याच्या परत उभारणीसाठी ते विचार करत राहिले होते.
२० ते २५ हजारांची जंगी फौज बाळगणारे हे सर सेनापती एक वेळ आपल्या राजा बरोबर रुसले असतील पण मोगलांना कधी जाऊन मिळाले नाही. सन १६९३ च्या दरम्यान जरी ते राजाराम महाराजांपासून दूर जरी असले तरी ते मोगलांशी लढत राहिले ही मोठी विस्मयजनक स्वराज्यनिष्ठा आहे. मराठा फौजा ह्यात शिस्त असावी हे संताजी घोरपड्यांनी शेवट पर्यंत पाळलेला आहे कारण तीच पुढच्या पिढीला प्रेरणा देणारी ठरते. संभाजी महाराजांच्या हत्येनंतर निर्माण झालेल्या अत्यंत अस्थिर राजकीय परिस्थितीत मराठे विश्वास ठेवून संताजी घोरपडे ह्यांच्या लष्करात राहून औरंगजेब विरुद्ध लढत होते हीच मोठी कौतुकाची गोष्ट आहे. आणि अश्याच स्थितीत लष्करात शिस्त नांदली पाहिजे हे सरळ स्वभावाच्या सरसेनापती संताजी घोरपडे ह्यांनी ओळखले होते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...