संभाजी महाराजांना पकडलं तेव्हा मराठे काय करत होते? एकदा वाचाच
मित्रानो सर्वाना माहित आहे कि शंभूराजे पकडले गेले पण त्यावेळी मराठे काय करत होते, का नाही त्यांनी शंभूराजांना सोडवले तर शंभूराजांसारख्या महान योध्याला पकडणे साध्या माणसाचे काम नव्हते त्यांना पकडण्यासाठी औरंगजेबाने किती मेहनत घेतली हे शब्दात सांगणे सोपे नाही म्हणजेच औरंगजेबाने जेव्हा कैद केले होते त्यावेळी मराठे त्यांना सोडवतील यासाठी कडेकोट बंदोबस्त केला होता. मराठ्यांचा राजाच पकडला गेला मग निर्णय कोण घेणार हा मोठा प्रश्न त्यात आपले सैनिक गनिमी कावा करणारे असल्याने आणि सपाट मैदानावर शंभूराजांची कैद असल्याने सोडवणे खूप कठीण होते.शंभुराजांना जिवंत पकडले आणि त्यांना औरंगजेबाकडे पोहचवणे याची भीती मुकब्बर खानाला होती म्हणून शिवरायांचे केस कापले मिश्या कापल्या ते शंभूराजे आहेत याची ओळख पटू नये म्हणून मुकब्बर खान घाबरत होता म्हणून शंभूराजे पकडले गेले याची बातमी त्याने बाहेर पडू दिली नाही जो पर्यंत तो औरंगजेबाकडे पोहचत नाही. मुकब्बर खानाने त्यांना झाकून, लपवून औरन्गजेबापर्यंत पोहचवण्यासाठी धडपडत होता कारण मध्ये काही होऊ नये याची त्याला भीती होती एकदा औरंगजेबाकडे पोहचलो कि मग भीती संपेल कारण औरंगजेब बहादूर गड येथे आपल्या ५ ७ लाख सैनिकांसोबत होता आणि तेथे पोहचल्यावर मराठे टिकाऊ धरू शकणार नव्हते. त्याचा डाव साध्य झाला आणि शंभूराजे कैद केले गेले. अश्यातच जर मराठ्यांचे हजारो सैनिक जरी तेथे आक्रमण करायला गेले असते तर औरंगजेबाच्या लाखो सैनिकांपुढे आणि सपाट जमिनीवर त्यांचा निभाव लागला नसता त्याचे परिणाम पानिपतच्या लढाईसारखे झाले असते आपले सगळेच मावळे मृत्युमुखी पडले असते तर स्वराज्य कसे टिकून राहिले असते आणि शिवरायांचा संदेश होता लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे स्वराज्य राहिले पाहिजे आणि जर धीर घेतला नास्ता सूडाचीच भावना ठेवली असती तर स्वराज्य संपले असते त्यावेळी मराठे शांत राहून सूडाचा बदल घेण्याचे ठरवत होते. दौंड मधील बहादूर हा भुईकोट किल्ला असल्याने तेथे ५० ६० हजारांचा सैन्य घेऊन सपाट मैदानावर युद्ध लढणं मराठ्यांना जिंकण्यासारखं नव्हत. पण बदल मात्र घ्यायचा होता त्यासाठी अनेक छोटे मोठे हल्ले रात्रीच्यावेळी संताजी घोरपडे धनाजी जाधव करत होते.अश्या ५० ६० मराठा योद्धानी औरंगजेबाला महाराष्ट्रभर पळवले, त्याची अन्नाची रसद तोडली, त्याला महाराष्ट्र्रा मधून बाहेर जाऊ दिले नाही संभाजी महाराजांचे जेवढे त्याने हाल केले त्याहून भयंकर हाल औरंगजेबाचे मराठ्यांनी केले. जेवण्याचे, खाण्याचे, रसदीचे, दाण्याचे, पाण्याचे, फिरण्याचे हाल केले. त्याला आग्र्याला जायचे होते पण त्याला जाऊ दिले नाही असे त्याचे हाल केले आणि औरंगजेबाला हताश अवस्थेमध्ये नगरजवळील भिंगार या गावी मरावं लागलं. त्यामुळे जर कोणी म्हणत असेल कि मराठे काय करत होते तर त्यांनी हे सर्व करून स्वराज्य कायम ठेवलं अन्यथा जर ते ५ ते ७ लाखाच्या सैन्यापुढे लढायला गेले असते तर स्वराज्य बुडाले असते आणि मुघल राज्य आले असते. कदाचित याचीच वाट देखील औरंगजेब पाहत असेल कि कधी हे मराठा सैन्य येत आणि आम्ही स्वराज्य संपवतो पण मराठे मराठे होते हे त्याला माहित नव्हतं.
No comments:
Post a Comment