कसे पकडले गेले शंभूराजे, कोणता होता मोठा अडथळा
औरंगजेबाने त्याचे ३००० गुप्तहेर फक्त शंभूराजांची माहिती मिळवण्यासाठी ठेवले होते आणि औरंगजेबाला शंभुराजांना मारून स्वराज्य संपवायचे ध्येय होते यासाठीच तो लढत होता. त्या ३००० लोकांमध्ये अशी लोक होती जे दर्या खोऱ्यातील वाटा दाखवणारी, वेशभूषा करून माहिती मिळवणारी, सर्व बातम्या औरन्गजेबापर्यंत पोहचवणारी अशी ती लोक होती. यामुळे संगमेश्वराकडून रायगडावर जाण्याची बातमी शेख निजामाला म्हणजे मुकब्बर खानाला मिळाली आणि तो सकाळी सकाळी संगमेश्वर ला येऊन धडकला. हि बातमी देखील शंभूराजांच्या गुप्तहेराने त्यांना दिली.शंभुराजांना बातमी कळली सकाळ ची वेळ होती शेख निजाम एक तुकडी घेऊन येत होता पण त्यावेळी असे झाले कि महाराणी येसूबाई देखील त्यांच्या सोबत होत्या त्यांची सुरक्षा देखील गरजेची होती अचानक आलेले हे संकट आणि महाराणी येसूबाई यांची सुरक्षा म्हणून निम्मं सैन्य शंभूराजांनी येसूबाई सोबत पाठवलं आणि अर्ध सैन्य संभाजी राजांसोबत होत म्हणजे ५०० ते ६०० सैनिक शंभूराजांसोबत होत. शेख निजामाच्या आणखीन काही सैन्याच्या तुकड्या मार्गावर होत्या याच वेळी नावडी बंदरावर त्याच्या मुलाने तळ ठोकला आणि संभाजी महाराजांची कोंडी झाली. येसूबाई ला वाचवता यावे म्हणू अर्ध सैन्य आणि संताजी धनाजी सारखे शूर योद्धे त्यांनी येसूबाई च्या सुरक्षिततेसाठी पाठवले आणि सांगितले कि तातडीने येसूबाईना पालखीतून उतरावा आणि घोड्यावर बसूवून रायगडाला ताबड्तोब पोहचा.आता महाराणी येसूबाई यांची सुरक्षितता झाल्यानंतर ५०० ६०० सैनिक, कविराज आणि म्हाळोजी घोरपडे. म्हाळोजी घोरपडे देखील शेवट्पर्यंत लढले आणि शंभूराजांसाठी स्वराज्यासाठी आपले प्राण दिले. त्यावेळी महाराजांनी असा निर्णय घेतला कि इथे लढाई जिंकता येणार नाही म्हणून ते माघार घेऊन निघू लागले अश्यातच कविराज याना बाण लागल्याने कविराज ओरडले महाराज वाचवा म्हणून त्यांनी पुन्हा घोडा फिरवला यावेळी त्यांचा वेळ वाया गेला. तरी पुन्हा ते उठले आणि नवडी बंदरापर्यंत पोहचले जेणेकरून होडीने त्यांना पळता येईल पण तेथे देखील मुकब्बर खानाच्या मुलाने तळ ठोकला असल्याने इकलाज खान अश्या लोकांनी देखील वेढा टाकला होता. त्यामुळे संभाजी महाराज पकडले गेले.
No comments:
Post a Comment