महाराष्ट्रधर्माचे स्वातंत्र्ययुद्ध
शहाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे भूमीपूजन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करून त्यात रयतेला महत्व दिले. त्याचा फार मोठा दूरगामी परिणाम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर धर्मांध सुन्नी औरंगजेब राज्य - धर्म विस्ताराकरीता दांभीकपणाने जिहाद चा पुकारा करत दक्षिण काबीज करायला आला. छत्रपती संभाजी महाराजांशी नऊ वर्षे लढूनही औरंगजेबाला "पहाडी चुहा चे स्वराज्य" गिळता आले नाही. शाही फौजांच्या अमानुष सुलतानी अत्याचारही या रयतेने सहन केले. पण रयतेने स्वराज्याची साथ सोडली नाही. अखेर औरंगजेबाने स्वराज्य गिळायचे स्वप्न काही काळ बाजूला ठेवून इस्लामी अली अदिलशहा चे विजापूर व कुतुबशहाचे गोवळकोंडा यावर घाला घातला. सुन्नी औरंगजेबाचे जिहादी शाही सैन्य त्यांच्याच धर्माच्या पण शिया पंथीय बादशहांवर तुटून पडले. अल्पावधीतच विजापूर अदिलशाही व गोवळकोंड्याची कुतुबशाही औरंगजेबाने गिळली. कारण एकच होते राज्यविस्तार. धर्मांध सुन्नी औरंगजेबाच्या डोळ्यात शिया पंथीय मुसलमानी राज्ये इतकी खुपत होती तर हिंदवी स्वराज्य तर अक्षरशः मुसळासारखे खुपत असेल नाही?आणि या कारणाने व राज्य विस्तारात राहिलेले स्वराज्य गिळण्यासाठी पुन्हा एकदा त्याने लक्ष केंद्रीत केले. संभाजी महाराजांच्या निघृर्ण हत्येनंतर स्वराज्य सहज आपल्या हातात येईल ही कवी कल्पना मात्र स्वराज्याच्या महाराष्ट्रधर्मीय जनेतेच्या स्वातंत्र्ययुद्धातील सक्रिय सहभागागामुळे कवी कल्पनाच ठरली. छत्रपती राजाराममहाराजांना शिवाजीमहाराजांच्या तालमीत तयार झालेले रामचंद्र पंत, शंकराजी नारायण, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, खंड्डोबल्लाळ, केसोत्रिमल, नीळकंठ मोरेश्वर आदी येऊन मिळाले. राजा जिंजीत असताना यांनी प्रत्यक्ष महाराष्ट्रातील लढाऊ रयतेचे नेतृत्व करून स्वातंत्र्यलढा नेटाने चालविला. त्यातच पुढे परशुरामपंत प्रतिनिधी, माधव त्रिंबक, पंताजी शिवदेव, नेमाजी शिंदे, हणमंतराव निंबाळकर, कान्होजी आंग्रे, बहिर्जी घोरपडे, राणोजी घोरपडे, खंडेराव दाभाडे, परसोजी भोसले, रंभाजी निंबाळकर, विश्वासराव पवार, महादजी पुरंदरे, बाळाजी विश्वनाथ आदी सेनानी मंडळी सामील झाली. प्रत्येक सेनानींसोबत होती येथील "शिवाजी महाराजांच्या रयतेच्या स्वराज्याची रयत." या रयतेशी लढणे धर्मांध विस्तरावादी औरंगजेबाला शक्य झाले नाही. कारण या लढ्याला महाराष्ट्रधर्म मानणारी रयत विरूध्द धर्मांध शाही कुटुंब असे स्वरूप आले. शाही फौजेचे महाराष्ट्रातील सर्व महत्त्वपूर्ण आघाड्यांवरील नेतृत्व हे औरंगजेबाच्या कुटुंबातील व्यक्ती करत होत्या आणि त्यांना लढून रडवत होती येथील रयत.. शाही सैन्याने वेढे घातलेले किल्ले वर्ष- सहा महिने लढवायचे..रिकामे झाले की मोगलांकडून भरपूर पैसे घेऊन, कोणतीही हानी होऊ न देता किल्ला मोगलांच्या ताब्यात द्यायचा. किल्यावर मोगलांकडून धन, धान्य, दारूगोळा भरून झाला की अचानक हल्ला करून बेसावध मोगलांकडून किल्ला ताब्यात घ्यायचा.. हा लोकप्रिय उद्योग स्वराज्यात जागोजागी सुरू झाला होता. औरंगजेब या साऱ्या मुळे अक्षरशः त्रस्त झाला होता. अखेर महाराष्ट्रधर्माचा विजय झाला. धर्मांध औरंगजेब येथेच दख्खनात गाडला गेला. हिंदवी स्वराज्याच्या जनतेने एक मोठे स्वातंत्र्ययुध्द जिंकले. हे सर्व होऊ शकले ते केवळ आणि केवळ शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टिने.. स्वराज्य या महामंत्राने....रयतेच्या राज्याने... महाराष्ट्रधर्माने...
© श्री. पुष्कर रवींद्रकुमार पुराणिक.

No comments:
Post a Comment