संताजी घोरपड्यांची कर्नाटकात कर्तृत्वाची विजयदशमी ----
सन १६९५ सालच्या विजयदशमीची मोहीम सर्वात जास्त गाजली गेली.ह्या विजयदशमीच्या मुहूर्तावर विशाळगडावर रामचंद्रपंत अमात्य ह्यांनी मराठा सरदारांना एकत्र बोलवले आणि दक्षिणेत मोगलांविरुद्ध एका भव्य मोहिमेची आखणी केली तेव्हा संताजी घोरपडे ह्यांनी कर्नाटकात आपले कर्तृत्व वळवले आणि जिंजीच्या दिशेने पोहोचू लागले. आता मराठा फौजा मोगलांवर एवढ्या भारी पडतील हे औरंगजेब बादशहाला माहीत नव्हतं , ही खबर आलमगीर औरंगजेबाला कळताच त्याने कर्नाटकचा सुभेदार कासीमखान यास संताजीस अडवून नेस्तनाबुद करण्यासाठी हुकूम सोडला ह्याऊन उलट तर आपल्या छावणीतील खास सैन्य देऊन खानजादखान , सफाशिकनखान , सय्यद असालतखान व महंमद मुरादखान या चार भल्या मोठया सरदारांना पण कासीमखानाच्या मदतीसाठी पाठवले.
ह्या सगळ्या मोगल सरदारांनी संताजीस गाठण्यापूर्वी संताजी घोरपड्यांनीच
त्यांना चित्रदुर्गच्या पूर्वेस दुड्डेरी येथे गनिमी काव्याने पेचात आणले.
मोगल सैन्याचा पराभव होऊन ते सर्व खान मजूर दुड्डेरीच्या किल्ल्यात लपले
तरीही त्यांच्यात कासीमखानाने अप्रतिष्ठा आपल्या बादशहाला दाखवून आत्महत्या
केली आणि आता राहिले चार खान तर त्यांनी संताजी घोरपडेकडे जीवनदानाची
याचना ही केली कारण त्यांना हे करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हताच. ७
लाखांची खंडणी व साठ लाखांची मालमत्ता संताजी घोरपडे ह्यांनी घेतली तेव्हाच
ते मोगल सरदार मृत्यूच्या प्रसंगातून मुक्त झाले. ही विजयदशमी मराठ्यांना
तर अधिक लाभदायक झाली.
No comments:
Post a Comment