“आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे.” – मराठा योद्धा नरवीर तानाजी मालुसरे
मराठा योध्दा तानाजी मालुसरे यांचे बालपण सातारा जिल्ह्यातील जवळी तालुक्यातील गोडोली या गावात झाला.
स्वराज्यावर अफजल खानाचे संकट आले होते. छत्रपती शिवाजी महाराज एक एक पाऊल उचलताना सर्व बाजूंनी विअचार करून उचलत होते. अफजल खानच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी निवडक सरदाराना हजार मावळ्यांचे सैन्य सोबत दिले होते. त्यावेळी तानाजी मालुसरे हे खानाच्या सैन्यावर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.
शिवाजी महाराजांनी कोंकण स्वारीत संगमेश्वर काबीज केले होते. तेथील व्यवस्था मार्गी लावण्यासाठी तानाजी आणि पिलाजी यांना तिथेच तैनात केले होते. तेव्हा सुर्व्यांनी अचानकपणे संगमेश्वरावर रात्री हल्ला केला. पिलाजींना तो हल्ला पेलला नाही त्यामुळे ते पळत सुटले होते. परुंतु दुसर्या आघाडीवर तानाजी मालुसरे यांनी शौर्याने हल्ला परतवून लावला. स्वराज्यातील रायगडाच्या परिसरात आणि कोंकण पट्यात स्थानिक दंगलखोर माजले होते. त्यांचा बंदोबस्त करण्याची जबबदारी तानाजीवर सोपवली होती. त्यामुळे तानाजी हे उमरठे या गावात राहायला आले होते. गावात एकोप्याने राहून त्यांनी त्या भागातील तरुणांना स्वराज्यातील फौजेत सहभागी करून घेतले.
स्वराज्यात मोगलांनी उच्छाद मांडला होता. तो जिजामाता उघड्या डोळ्यांनी पाहत होत्या. हि सल मनात होती त्यामुळे स्वराज्यासाठी आणि जिजामाता यांच्या इच्छेखातर श्री.कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी आपले जवळचे मित्र सरदार तानाजी मालुसरे यांना दिली होती. तानाजीला रायबा नावाचा मुलगा होता. त्याच्या लग्नाची तयारी चालू होती त्यातच तानाजींना हि नवी जबाबदारी समजली. त्यांनी लग्नाची तयारी अर्धवट सोडून किल्ले कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या सैनिकांच्या तुकडीला घेऊन निघाले. स्वराज्याचे काम प्रथम प्राधान्याने घेऊन जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला शिवाय उद्यभानासारखा पराक्रमी किल्लेदार असलेला किल्ले कोंढाणा स्वराज्यात सामील करायचा विडा उचलला. विडा घेऊन ते कोंढाणा जिंकण्यासाठी आपल्या तुकडी बरोबर निघाले.
तेव्हा स्वराज्य हितासाठी बोललेले ते वाक्य होते.
“आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे.”
त्यांचे शब्द इतिहासात प्रसिध्द झाले.
किल्ले कोंढाणावर किल्लेदार उदयभान राठोड हा एक शूर आणि लढवय्या माणूस
होता. त्याच्या हाताखाली सुमारे १५०० हशमांची खडी फौज तैनात होती. ४
फेब्रुवारी १६७० च्या रात्री सरदार तानाजी मालुसरे यांच्या नेतृत्वाखाली
राजगडावरून सैन्य निघाले होते. तेव्हा स्वराज्याची राजगड हि राजधानी होती.
मराठा सैन्य रात्रीच गुंजवणी नदी पार करून सिंहगडाच्या पायथ्याला येऊन
पोहोचले. तेव्हा टी भयाण काळरात्र होती. किल्ले कोंढान्यावर जाण्यासाठी
शत्रूच्या मनात सुद्धा येणार नाही असा द्रोनागीरीचा कडा. अंधाऱ्या रात्री
केवळ पाचशे सैनिकांबरोबर तो कडा चढून त्यांनी किल्ले कोंढाणावर हल्ला केला
होता. किल्ल्यावर असणार्या शत्रूला पुसटशी कल्पना न येवू देता. तानाजी
मालुसरे यांनी गडाच्या मागच्या बाजूने त्यांची आवडती आणि पाळलेली घोरपाडीला
गडावर पाठविले. त्या घोरपडीचे नाव यशवंती होते तिच्या शेपटीला दोर बंदला
होता. मावले त्या दोराच्या सहाय्याने गड चढून वर गेले. रात्री अचानक हल्ला
करून शत्रूला कात्रीत पकडले.अंगात प्राण असेपर्यंत अखेरच्या स्वासापर्यंत लढाई करून त्यांनी किल्ला जिंकायचा प्रयत्न केले. बेभान होऊन शत्रूशी लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावर डाव्या हातावर वरचे घाव घेत उद्याभानाला निपचित पडूनच स्वताचे प्राण सोडले. त्यांच्या मागून त्यांचे बंधू आणि शेलारमामा यांनी मराठा फौजेचे नेतृत्व करून उदयभानाला संपवूनच उर्वरित यश संपादन केले आणि किल्ला काबीज केला.
गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला आहे, असा इशारा राजांना राजगडावर दिला गेला होता. हि घटना इ.स. ४ फेब्रुवारी १६७० रोजी घडली. ह्या किल्ले कोंढाणाच्या लढाईत तानाजींना आपले प्राण गमवावे लागले होते. किल्ला जिंकला आहे हे समजल्यावर छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्या दिवशी गडावर पोहोचले तेव्हा त्यांना हि दुखद घटना समजली. तेव्हा महाराज म्हणाले “ गड आला पण सिंह गेला.” अत्यंत दु:खी झालेल्या शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांचे शव हे त्यांच्या उमरठे या गावी पाठविले. ज्या मार्गाने तानाजी मालुसरे यांची प्रेतयात्रा गेली तो आता मढेघाट या नावाने ओळखला जातो. तानाजी गले त्या जागी त्यांची विरगळ स्थापन केली आहे.
सरदार तानाजी मालुसरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ किल्ले कोंढाणा गडाचे हे नाव बदलून किल्ले सिंहगड ठेवण्यात आले. आणि सिंहगडावर नरवीर तानाजी मालुसरे यांचे स्मारक असून तेथे एक अर्ध पुतळा उभारण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment