विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 4 February 2019

स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या वधानंतर औरंगजेबास पराभूत करणारी महाराणी

स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या वधानंतर औरंगजेबास पराभूत करणारी महाराणी


                                                               
महाराणी ताराबाई ( १६७५ – १७६१ ) छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या होत्या. तसेच त्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी सुद्धा होत्या. घोदेस्वरीमध्ये निपुण असलेल्या महाराणी ताराबाई ह्या अत्यंत बुद्धिमान, तडफदार होत्या. त्यांना युध्द कौशल्य आणि राजकारणाच्या उलाढालीचे तंत्र अवगत होते.
छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली तळबीड येथे झाला. सरसेनापती हंबीरराव मोहिते हे महाराणी सोयराबाई यांचे सक्के भाऊ होते. त्यामुळे ते छत्रपती राजाराम महाराजांचे ते मामा होत. छत्रपती राजाराम महाराजांच्या त्या मामाची मुलगी होत्या. ताराबाईचे लग्न हे छत्रपती राजाराम महाराजांशी १६८३ – १६८४ च्या दरम्यान झाले.
         २५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी श्री दुर्ग रायगडास वेढा घातला होता. तेव्हा त्या छत्रपती राजाराम महाराजांसह रायगडावरून निसटून गेल्या.छत्रपती राजाराम महाराज पुढे जिंजीला गेल्या नंतर ताराबाई, राजसबाई,आणि अंबिकाबाई ह्या किल्ले विशालगड येथे राहिल्या. त्यांनी लष्करी आणि मुलकी शिक्षण हे रामचंद्र पंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन त्या सन १६९४ साली त्या जिंजीला पोहोचल्या. पुढे ९ जून १६९४ साली त्यांना एक पुत्र झाला त्याचे नाव शिवाजी असे ठेवले.


                                                  छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य कारभाराची सूत्रे त्यांनी आपल्या हाती घेतली. राज्याची सूत्रे हाती घेतल्यावर कठीण प्रसंग आणि अडचणींना सामोरे जात धैर्यान उभ्या राहिल्या. त्यावेळी चोहीबाजूंनी मोगली फौजा ह्या राज्यावर हल्ले करत होते. मोगली फौजांचा आक्रमकपणे सामना केला. मराठेशाहीतील मुत्स्यांना काळाचे गांभीर्य समजावून सांगून सगळ्यांच्या एकजुटीची मोट बांधली. ह्या सर्व कर्तबगार सरदारांच्या आणि स्वामिनिष्ठ सहकार्यांच्या बळावर महाराणी ताराबाई यांनी शत्रूला थोपवून धरले. त्यामुळे सैन्याची जमवाजमव करून खडे सैन्य उभारले. या सर्व बाबींमुळे सैन्यात प्रचंड आत्मविश्वास वाढला.
तुल्यबळ सैन्य उभारून लष्कराची पुनर्बांधणी केली. धावता घोडा फेकणारे तलवारबाजी आणि भालाफेक करून दुश्मन सैन्याला नामोहरण करणारे तरुण सैन्यात भारती केले. मोगलांना कर्दनकाळ वाटावा असे हिम्मतवान आणि तलवार उगारून मैदान गाजवणारे मोगलांचा कर्दनकाळ वाटावेत असे सरदार उभे केले.

The flag of the Maratha Empire
इ.स. १७०० ते १७०७ या काळात शिवाजी महाराजांच्या या सुनेच्या तडफदार धोरणामुळे आणि मुत्सद्देगिरी मुळे औरंगजेबाला स्वराज्याशी झुंज देत निरंतर सात वर्षे दक्षिणेतच मुक्काम ठोकावा लागला. आणि या कार्यकाळात त्याला कधीच यश आले नाही. अखेरीस त्याला आपला देह ह्याच मातीत गाडून घ्यावा लागला. औरंगजेब हा स्वराज्याचा घास घ्यायला आला होता. पण नियतीने त्याचाच घास घेतला आणि त्याने शेवटचा स्वास  ३ मार्च इ.स. १७०७ मध्ये औरंगाबाद येथे मृत्यू झाला.

                                                                  Image Credit: wikipedia
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर कैद असलेले धर्मवीर संभाजीराजांचे पुत्र शाहू महाराज यांना मुघलांनी सोडून दिले. कारण त्यामुळे वाढत्या मराठा साम्राज्यात फुट पडेल हा कयास होता. ताराबाईचा पराक्रमी सेनापती बालाजी विश्वनाथ यांनी ताराबीची साथ सोडून छत्रपती शाहू राजांच्या बाजूला सामील झाले. या सर्व घडामोडी मुळे ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यात खेद येथे तुंबळ लढाईट महाराणी ताराबाईचा प्रभाव झाला. छत्रपती शाहू महाराजांनी पन्हाळा किल्ला जिंकला होता. पण काही दिवसांनी तो पुन्हा ताराबाई यांनी जिंकला.

                                                           
छत्रपती शाहू महाराज सातारा गाडी यांना पुत्र नसल्याने आपला पुत्र राजाराम यास शाहू महाराजांना दत्तक दिले.  या काळात ताराबाई आणि दुसरा शिवाजी (कोल्हापूर) यांचा मुक्काम अधिक तर पन्हाळ्यावरच असे. 

                                                             
                                 ताराबाई यांनी करवीर राज्याची कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली. ताराबाई ह्या मराठ्यांच्या इतिहासातील धाडसी आणि कर्तबगार राजस्त्री होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर त्यांनी राज्याची धुरा कणखरपणे सांभाळली. नामवंत धाडसी संताजी आणि धनाजी ह्या मातब्बर सरदाराना बरोबर घेऊन त्यांनी मोगलांना सालो कि पालो करून सोडनारी रणरागिणी म्हणजे महाराष्ट्रातल्या कर्तुत्वान स्त्रियांमधील एक मनाचे पान. नंतर पानिपतच्या युद्धात मराठ्याचा पराभव झाला. त्यातील हानी पाहून महाराणी ताराबाई हताश झाल्या आणि त्यातच त्यांचा १७६१ साली मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...