छत्रपती थोरले शाहू महाराज -
लेखक :रवि पार्वती शिवाजी मोरे
महाराष्ट्राच्या मराठा राज्याच्या पराक्रमी व्यक्तींची आत्माहुती पडल्यानंतर नेतृत्व नसलेल्या जहाजा सारखी महाराष्ट्राची स्थिती झाली होती. अशावेळी समर्थपणे या नेतृत्वहीन राज्याचे नेतृत्व शाहू महाराजांनी आपल्या हाती घेतले व त्याला योजकतेने मार्गाला लावले. रणांगणावरील हातघाईशी महाराजांचा संबंध जास्त आला नाही परंतु गरूडाच्या पारखी आणि धुर्त नजरेतुन त्यांनी राज्यवृद्धी साठी एक एक मोहरे पारखून मराठा राज्याच्या उत्कर्षाला चालना दिली. राज्य चालवायचे असेल तर त्याला एका दिशेची आवश्यकता असते. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या अधिकारक्षेत्रात एवढी जरब ठेवली होती की, ते कुणाचाही मुलाहिजा ठेवत नसत. त्यांचा शब्द अखेरचा असे. आपल्या शब्दाबाहेर जाणार्यांची ते गय करीत नसत आणि याच भावनेतून पुरंदर्यांनी वेळोवेळी पत्र पाठवून महाराजांशी संपर्क साधीत जा अशी बाजीरावांना सक्त ताकीद दिली होती. महाराजांच्या या करारी स्वभावामुळे प्रधानांना आपली मनमानी शेवटपर्यंत करता आली नाही.
थोरले शाहू महाराज यांचा मृत्यू झाला ती तारीख होती
15 डिसेंबर 1749.
#मराठा_साम्राज्य_विस्तारक
#थोरले_शाहू_महाराज
#maratha_empire
#shahu_marahaj
#swaraj
No comments:
Post a Comment