विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 6 February 2019

श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे

श्रीमंत सुभेदार राणोजीराव शिंदे
लेखक :शेखर शिंदे सरकार

राणोजी शिंदे यांचा कार्यकाळ १७२७ - २८ पासून खऱ्या अर्थाने सुरु होतो,छत्रपती शाहू महाराज यांनी माळवा प्रांतातून चौथ व सरदेशमुखी वसूल करण्यासाठी पेशवा बाजीराव, प्रधान हेतूनरुप मल्हारराव होळकर यांच्या बरोबरच राणोजीराव शिंदे याचीही नेमणूक केली होती.या कामगिरीतील महत्वाचा टप्पा म्हणजे
२९ नोव्हे १७२८ रोजी माळवा प्रांतातील आमझेरा या ठिकाणी, चिमाजी आप्पा याने माळवा प्रांताचा मोगल सुभेदार गिरीधर बहाद्दर याचा निर्णायक पराभव केला. या संग्रामात मल्हारराव होळकर, उदाजी पवार यांच्या प्रमाणेच राणोजी शिंदे ही आपल्या पथकासह उपस्थित होते
इतकेच नव्हे तर माळवा प्रांतातील वसुलाची वाटणी पेशवा बाजीराव यानी २० डिसेंबर १७३१ या महिन्यात केली . त्यातही राणोजी शिंदे यांचा हिस्सा मल्हारराव होळकरच्या बरोबरीचा होता,
१७१८ पासून सतत मराठेशाही साठी तलवार गाजविणाऱ्या राणोजी शिंद्याला शाहू महाराज यांनी मल्हारराव होळकराच्याच बरोबरीने माळवा प्रांताच्या वसुलीत वाटा दिला,आणि १७३५ पासूनच राणोजी शिंद्याने आपले लष्करी मुख्यालय उज्जैन येथेच ठेवले . १७३५ते १७४५ च्या काळात राणोजीने पेशवा पहिला बाजीराव आणि नाना साहेब पेशवा या दोघांच्या ही समावेत मराठेशाहित प्रशंसनीय भूमिका पार पाडली. उज्जैनच्या विशेष संदर्भात या ठिकाणी नमूद करावेसे वाटते,
१७३६ च्या जून महिन्यात ८ तारखे पासून २४ जुलै पर्यत राणोजीचा मुक्काम उज्जैन शहरा नजीक होता, त्यावर मोगलांच्या वतीने साहेबराव हा किल्लेदार होता. त्याचवेळी बाजीराव पेशव्याने दिल्लीचा मोगल बादशहा महमदशाह यांच्याकडे,महादेव भट्ट हिंगणेयास माळवा प्रांताचा सनद आणण्यासाठी पाठिवले होते,पण बादशहाला सनद द्यावयाची नव्हती म्हणून मराठा मोगल मैत्रीचा भंग करून, राणोजीने उज्जैनचा किल्ला जिंकला असे सांगून बादशहा सनद देण्यास टाळाटाळ करु लागला.
महादेव भट्ट हिंगणे याने या संदर्भात राणोजी शिंदे यांला विचारपूस केली. आपल्या पत्रात राणोजीला उपदेशाचे डोस ही पाजले हे राणोजी शिद्यांस मुळीच सहन झाले नाही . त्याने तत्काळ एक खरमरीत पत्र ‘ महादेव भट्ट हिंगण्यास ' पाठविले
मराठमोळ्या संस्कृतिच्या संस्कारातून विकसित झालेले राणोजी शिंद्यांचे स्वराज्य निष्ठा साहसी आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व त्या पत्रातील प्रत्येक अक्षराच्या वळणा वळणातून मोठ्या बहाद्दरपणे खुलून दिसते, राणोजी शिंदे लिहतात......
"तुमचे पत्र पावले सनदा पत्रे खर्चवेच तयार झाला होता . तो उज्जैनचा किल्ला दगम करुन तुम्ही घेतला यास्तव मकूब ( तहकूब ) जाले तरी उजेनीमध्ये त्यांचा नायब साहेब राऊ किल्लेदार आहे.आमचा गोरखोजी ही आझून आम्हा जवळीच आहे,आम्ही मवास मध्ये छयावनी केली आहे,परभारे स्वार पाठवून खबर घेणे वर्तमान लबाड आहे,पातशाही आंधेर ज्याच्या चित्तास येईल त्याने मनमाने ते ल्याहावे नबाबानी खरे मानिले असेल त्यास सांगणे की आजी दोन वर्षे मेहनत तुम्हासी येश द्यावयासी करीत आहात,आमचा ईश्वर आम्हासी देऊन राहिला आहे,सलूख जाहलियानेच आम्हासी फिकीर पडते,बद सलूखे आम्हांस बहुत संतोष आहे,बेईमानी आम्हा कडोन नाही,त्यांचे आंगी पुरती लावून. निरोप घेऊन स्वार होऊन येणे '
या पत्रावरुन राणोजी शिंदे यांचा स्वाभिमान असल्याची चिड मनगटाच्या सामर्थ्यावर विश्वास आणि परमेश्वरावरील अविचल श्रध्दा या गुणाचे मनोहर दर्शन घडते,असे हे राणोजी शिंदे माळव्यात मराठ्यांचे बस्तान बसविण्याच्या कामगिरीत १७३५ पासून१७४५ पर्यंत सतत आघाडीवर राहिले.!

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...