"बचेंगे तो और भी लढेंगे" बोलणारे दत्ताजी शिंदे...
उत्तरेत शिंद्यांचे सैन्य दिल्ली राखण्यसाठी आले होते. शिंद्यांच्या सैन्याचे नेतृत्व दत्ताजी शिंदे करीत होते. बुराडी घाटा जवळ शिंद्यांच्या फौजेचा तळ पडला होता. अवघ्या काही कोसांवर शत्रूची फौज येऊन ठाकली होती, याची जाणीव दत्ताजी आणि जानकोजी शिंदे या दोघांना होती.
१० जानेवारी १७६०, दिवशी पहाटे बेसावध मराठी फौजेवर नजीबच्या फौजेने हल्ला चढविला. उत्तरेतल्या कडाक्याच्या थंडीत गारठलेल्या आघाडीवरच्या मराठ्यांना हत्यारे उचलण्याची उसंतच मिळाली नव्हती, कित्येक जण झोपेतच मारले गेले. हल्ल्याची बातमी शिंद्यांच्या तळावर येऊन थडकली तसे दत्ताजी बेफाम होऊन शत्रूवर चाल करून गेले.
मराठे आता त्वेषाने लढू लागले, रोहील्यानंची कत्तल होत आहे असे दिसताच नजीबने आपली फौज पुढे घातली. शिंद्याच्या एका तुकडीला फार नुकसान झाले आणि दुसरीकडे जानकोजीच्या फौजेवर, अफघाण तोफांचा मारा करू लागले. मराठे भाजून निघाले. जानकोजीच्या हाताला गोळी लागली आणि तो घोड्यावरून खाली कोसळला. त्याला सुखरूप मागे नेण्यात आले पण जानकोजी पडल्याची बातमी दत्ताजींना कळताच, ते त्वेषाने समोरच्या रोहिल्यांवर तुटून पडले.
इतक्यात दत्ताजीला जामबुर्याचा गोळा लागला आणि तो खाली पडला. दत्ताजी पडताच शिंद्यांची फौज सैरावैरा पळू लागली. कुतुबशहाने दत्ताजीला विचारले, "क्यू पाटील और लढोगे?". तसे दत्ताजीने आपला जीव एकवटून त्यांस उत्तर दिले "बचेंगे तो और भी लढेंगे". हे उत्तर ऐकताच कुतुबशहाने, दत्ताजीच्या छातीत सुरा खुपसला आणि त्याचे शीर तोडून भाल्याच्या पात्यात अडकवून युद्धभूमीवर नाचू लागला.
#खूब_लढें_मरहट्टे
#बचेंगे_तो_और_भी_लढेंगे

No comments:
Post a Comment