विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 5 February 2019

#पाटील_बाबा #महादजी_शिंदे

 #पाटील_बाबा
#महादजी_शिंदे
लेखक :
-शेखर शिंदे सरकार


युरोपियनांच्या प्रशिक्षित फौजेचे महत्त्व सर्वप्रथम ओळखणाऱ्या महादजी शिंदेंनी १७८४ मध्ये डी बॉयन या फ्रेंच लष्करी तज्ज्ञाला आपल्या पदरी ठेवून १७८४ - ९२ या काळात डी बॉयनेच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनानुसार युरोपियनांच्या तोडीस तोड पाश्चात्त्य पद्धतीच्या प्रशिक्षणाने सज्ज झालेल्या आपल्या तीन पलटणी उभारल्या.
आग्रा आणि अलीगड या ठिकाणी महादजींनी दारूगोळ्याचे कारखाने काढले आणि पाश्चात्त्य धर्तीवर शस्त्रास्त्रांची निर्मिती व तोफा ओतण्याचा धुमधडाका सुरू केला . पाहता पाहता महादजींनी आपला प्रभावी तोफखाना व शिस्तबद्ध लष्करी फौज उभारून उगवत्या ब्रिटिश सत्तेस जबरदस्त आव्हान दिले.!
याच सुमारास दिल्लीतील ब्रिटिश वकील मेजर ब्रॉऊन याने मुघल बादशहा शहाआलमवर आपले वर्चस्व प्रस्थापित करावयास ही सुवर्णसंधी असल्याचे मत वॉरन हेस्टिंग्जला कळविले. ब्रिटिशांच्या मदतीने बादशहाविरुद्ध कारस्थान रचण्यासाठी शहजादा मिझ जवानबख्त लखनौस ब्रिटिशांच्या आश्रयास गेला . दिल्लीच्या पादशाही राजकारणात होऊ घातलेला महादजी शिंदेंचा उत्कर्ष ब्रिटिश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जला सहन होत नव्हता ; परंतु त्याचबरोबर दिल्लीच्या राजकारणात हस्तक्षेप करून वा दिल्लीत ब्रिटिश फौज ठेवून महादजीशी वैर विकत घ्यावयासही तो तयार नव्हता.
मिझ जवानबख्तला ब्रिटिशांनी दिलेल्या चिथावणीमुळे संतप्त झालेल्या महादजींनी वॉरन हेस्टिंग्जला ब्रिटिशांच्या या मित्रद्रोहाचा जाब विचारला.अखेरीस आम्ही दिल्लीच्या राजकारणात पडणार नाही,असे सालबाईच्या तहानंतर पुन्हा एकदा महादजींला आश्वासन देणे वॉरन हेस्टिंग्जला भाग पडले.
#पाटील_बाबा
#महादजी_शिंदे
#उत्तर_हिंदुस्थान

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...