संभाजी राजेंच्या हत्येनंतर काय घडले, त्यामुळे त्यांचे पुत्र शाहुंना गादीवर का बसवले नाही.
२५ मार्च १६८९ रोजी मोगलांनी श्री दुर्ग रायगडास वेढा घातला होता. तेव्हा त्या छत्रपती राजाराम महाराजांसह रायगडावरून निसटून गेल्या. छत्रपती राजाराम महाराज पुढे जिंजीला गेल्या नंतर ताराबाई, राजसबाई आणि अंबिकाबाई ह्या किल्ले विशालगड येथे राहिल्या. त्यांनी लष्करी आणि मुलकी शिक्षण हे रामचंद्र पंत यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन त्या सन १६९४ साली त्या जिंजीला पोहोचल्या. पुढे ९ जून १६९४ साली त्यांना एक पुत्र झाला त्याचे नाव शिवाजी असे ठेवले.
ताराबाईवास्तविक पाहता वारसा हक्काने सन १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांचे निधन झाल्यावर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी म्हणून छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे जायला हवे होते. पण तेव्हा छ.शाहूराजे वयाने लहान होते. नंतरच्या काळात ते स्वतः आणि मातोश्री येसूबाई हे मोगलांच्या कैदेत होते. कैदेत असताना त्यांना तहह्यात खूप यातना सहन कराव्या लागल्या. प्रसंगी धर्मांतर करावे म्हणून अनेकवेळा दबाव आणले गेले. पण छत्रपती शाहु महाराज सर्व प्रसंगांना मोठ्या धैर्याने सामोरे जात होते.
अशा परीस्थित मराठ्यांच्या राजगादीला राजा म्हणून नेतृत्व हवे होते. तर छत्रपती संभाजीराजे यांच्या वधानंतर त्यांचे पुत्र मोगलांच्या कैदेत होते. त्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी अर्थात हंबीरराव मोहिते यांच्या कन्या यांनी आपला मुलगा शिवाजी याला गाडीवर बसवून राज्याभिषेक करवून घेतला. त्यावेळी रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाने आणि सल्ल्याने महाराणी ताराबाई यांनी राज्याचा कारभार पाहायला सुरुवात केली.बालाजी विस्वनाथ
पुढे औरंगजेबाच्या मृत्युनंतर मोगलांनी छ. संभाजीराजेचे पुत्र छत्रपती शाहू यांची सुटका केली. सुटका करण्यामागे मराठा साम्राज्यात दुही माजवण्यासाठीच सुटका केली होती. छत्रपती शाहू हेच मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी होते. त्यामुळे अनेक सरदार, सेनानी हे शाहूंच्या बाजूने सामील होऊ लागले. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूने वारसा हक्कावरून संघर्ष सुरु झाला.
या काळात महाराणी ताराबाईच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बालाजी विस्वनाथ, धनाजी जाधव यांच्यासारखे मातब्बर सेनानी हे मुत्सद्दी छत्रपती शाहूंच्या बाजूने आले. शाहू राजांनी ताराबाई पुत्र शिवाजी दुसरा यांच्याविरुद्ध युध्द पुकारले. सन १७०७ साली खेद येथे झालेल्या ह्या युद्धात बालाजी विश्वनाथ ह्या कुशल पेशव्याच्या नेतृत्वाखाली चात्राप्यी शाहू महार्जांची सरशी झाली. त्यामुळे महाराणी ताराबाई यांनी माघार घेतली आणि कोल्हापूर येथे वेगळी नवीन गाडी स्थापन केली.
शंभूपुत्र छत्रपती शाहू महाराज
सन १७१४ साली राजमहालात झालेल्या घडामोडीनंतर शिवाजीला पदच्युत करून राजे संभाजी ह्या राजारामाच्या दुसऱ्या मुलाला छत्रपती म्हणून नेमले. शेवटी वारणेच्या तहात दिलजमाई झाली आणि शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली.
No comments:
Post a Comment