छत्रपतींच्या वारसांची सातारा आणि कोल्हापूर गादी हि दोन स्वतंत्र राज्ये का निर्माण झाली – अधिक वाचा
शिवाजी महाराज (Image
राजेंनी विजापूरची आदिलशाही आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा साम्राज्याचे हिंदवी स्वराज स्थापन केले. इ.स. १६७४ रोजी किल्ले रायगडावर सार्वभौम राजसत्तेचा राज्याभिषेक करून घेतला.
छ.संभाजीराजे
छ.संभाजीराजे शिवाजीराजे भासले – शिवाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी सईबाई यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे पहिले युवराज तसेच दुसरे छत्रपती होते. इ.स. १६८९ ला संभाजीराजे कोकणात संगमेश्वर येथे असताना मुकर्रब खान याने राजेंना कैद केले. पुढे औरंजेबाने इ.स. १६ मार्च रोजी त्यांचे हालहाल करून हत्या केली.
छ. राजाराम
छ. राजाराम महाराज – छ. राजाराम महाराजांचा जन्म २४ फेब्रुवारी १६७० ला रायगडावर झाला. राजाराम हे राज्याचे तिसरे छत्रपती होते. संभाजीराजे यांच्या हत्येनंतर ते १ मार्च १६८९ ते १७०० अशा अल्प काळ सत्तेवर होते. त्यांचा मृत्यू हा पुण्याजवळील किल्ले सिंहगड येथे झाला.
ताराबाई
छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर संपूर्ण राज्य कारभाराची सूत्रे महाराणी ताराबाई यांनी आपल्या हाती घेतली. राज्याची सूत्रे हाती घेतल्यावर त्या शत्रूला धैर्यान सामोर्या गेल्या. त्यावेळी चोहीबाजूंनी मोगली फौजा ह्या राज्यावर हल्ले करत होते. मराठेशाहीतील मुत्स्यांना काळाचे गांभीर्य समजावून सांगून सगळ्यांच्या एकजुटीची मोट बांधली. ह्या सर्व कर्तबगार सरदारांच्या आणि स्वामिनिष्ठ सहकार्यांच्या बळावर महाराणी ताराबाई यांनी शत्रूला थोपवून धरले. या सर्व बाबींमुळे सैन्यात प्रचंड आत्मविश्वास वाढला. तुल्यबळ सैन्य उभारून लष्कराची पुनर्बांधणी केली. मोगलांना कर्दनकाळ वाटावा असे हिम्मतवान आणि तलवार उगारून मैदान गाजवणारे मोगलांचा कर्दनकाळ वाटावेत असे सरदार उभे केले.
सन १७०० साली छत्रपती राजाराम महाराजांचे निधन झाल्यावर मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी म्हणून छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे मराठा गादी जायला हवी होती. पण तेव्हा छत्रपती शाहूराजे वयाने लहान होते. नंतरच्या काळात ते स्वतः आणि मातोश्री येसूबाई हे मोगलांच्या कैदेत होते. पण छत्रपती शाहु महाराज सर्व प्रसंगांना मोठ्या धैर्याने सामोरे जात होते. अशा परीस्थित मराठ्यांच्या राजगादीला राजा म्हणून नेतृत्व हवे होते. त्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी यांनी आपला मुलगा शिवाजी याला गाडीवर बसवून राज्याभिषेक करवून घेतला. त्यावेळी रामचंद्रपंत अमात्य यांच्या सल्ल्याने महाराणी ताराबाई यांनी राज्याचा कारभार केला.
कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढीप्रमाणे केले आहे.
दिल्ली झाली दीनवाणी। दिल्लीशाचे गेले पाणी।
ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।
औरंगजेबाच्या मृत्युनंतर मोगलांनी छ. संभाजीराजेचे पुत्र छत्रपती शाहू
यांची सुटका केली. सुटका करण्यामागे मराठा साम्राज्यात दुही माजवण्यासाठीच
सुटका केली होती. छत्रपती शाहू हेच मराठा साम्राज्याचे उत्तराधिकारी होते.
त्यामुळे अनेक सरदार, सेनानी हे संभाजी पुत्र शाहूंच्या बाजूने सामील होऊ
लागले. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूने वारसा हक्कावरून संघर्ष सुरु झाला. या
काळात महाराणी ताराबाईच्या पक्षातले खंडो बल्लाळ, बालाजी विस्वनाथ, धनाजी
जाधव यांच्यासारखे मातब्बर सेनानी हे मुत्सद्दी छत्रपती शाहूंच्या बाजूने
आले. शाहू राजांनी ताराबाई पुत्र शिवाजी दुसरा यांच्याविरुद्ध युध्द
पुकारले. सन १७०७ साली खेड येथे झालेल्या ह्या युद्धात बालाजी विश्वनाथ
ह्या कुशल पेशव्याच्या नेतृत्वाखाली छत्रपती शाहू महाराजांची सरशी झाली.
त्यामुळे महाराणी ताराबाई यांनी माघार घेतली आणि कोल्हापूर येथे वेगळी नवीन
गादी स्थापन केली.ताराबाई रामराणी। भद्रकाली कोपली।।
रामराणी भद्रकाली। रणरंगी क्रुद्ध झाली।
प्रलयाची वेळ आली। मुगल हो सांभाळ।।
छत्रपतींची वंशावळ
सन १७१४ साली राजमहालात झालेल्या घडामोडीनंतर शिवाजीला पदच्युत करून राजे संभाजी ह्या राजारामाच्या दुसऱ्या मुलाला छत्रपती म्हणून नेमले. शेवटी वारणेच्या तहात दिलजमाई झाली आणि शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या गादीला संमती दिली.
अशा प्रकारे ऐतिहासिक घडामोडी घडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नंतर मराठा साम्राज्याची सातारा गादी आणि कोल्हापूर करवीर गादी अशी दोन स्वतंत्र राज्ये तयार झाली. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांचे सातारा गादीचे थेट तेरावे वंशज म्हणून छत्रपती उदयनराजे भोसले (खासदार) आणि कोल्हापूर गादीचे छत्रपती संभाजीराजे (खासदार) हे सध्या कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment