विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 6 February 2019


 महादजी शिंदे :मराठ्यांचे एकुण उत्पन्न 




८ व्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांना भारतात जे एतद्देशीय स्पर्धक होते त्यात प्रामुख्याने मराठे होते, या शतकातील उत्तर व दक्षिण भारतातील मराठा वर्चस्वाचा पाया छत्रपती राजाराम, ताराराणी साहेब छत्रपती शाहू महाराज यांनी पुर्वार्धात घातला तर या अठराव्या शतकाचा उत्तरार्ध महादजी शिंदे यांनी गाजवला.***** असे म्हणतात इस १७४० मध्ये नादीरशहाने दिल्लीत निजामाकडे २० कोट रुपये मागितले तेव्हा एवढी मोठी रक्कम मुघल आमदानीत कोणी ऐकलीही नाही असे उत्तर निझामाने दिले, शाहजहानने खूप कमविले होते मात्र औरंगजेबाने ते दख्खनच्या लढाईत सारे गमाविले असून आता मुघल खजिन्यात सुमारे ५० लाख रक्कम असेल असे त्याने उत्तर दिले होते , एकूण त्या काळात १ कोट म्हणजे किती याचा यामुळे अंदाज येईल . ******** इस १७७० सुमारास मराठ्यांचे एकुण उत्पन्न १०कोटी असून त्यापैकी पेशव्यांचे तेव्हा उत्पन्न म्हणजे थोरल्या माधवराव अंत समयी २.८ कोटी होते, तर शतकाच्या अखेरीस ते ६ कोटी पर्यंत पोहोचले. तर महादजी शिंदे यांचे उत्पन्न यासमयीपुर्वीच इस१७९४ मध्ये ७।। साडेसात कोटी होते.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...