विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 1 March 2019

औरंगजेब बादशहाच्या सुभ्यांवर ताराबाई राणीसरकारांचा प्रहार भाग १

( औरंगजेब बादशहाच्या सुभ्यांवर ताराबाई राणीसरकारांचा प्रहार ) -
भाग १
अहमदनगरची बादशाही शेवटच्या घटका मोजत असता महाराष्ट्रात त्याच्या फौजांच्या मोहिमा चालू होत्या आणि शत्रूच्या मोहिमा चालू असल्या तरी ताराबाई कुठे कमकुवत झाल्या नाही.मराठा फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्याच पण त्यांनी महाराष्ट्रा बाहेरच्या सरहद्द ओलांडून बादशाही सुभे मातीत मिळवणं चालू ठेवलं. गुजरात, माळवा , तेलंगणा व कर्नाटक या प्रदेशांत आता मराठा फौजा घुसल्या आणि बादशहाचे व त्याच्या लष्करी धोरण , नितीधैर्य खचेल , शत्रूशी लढण्यासाठी उभारलेल्या प्रचंड फौजांचा खर्चही परस्पर निघेल ह्या हेतूने ताराबाईंनी आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीपासूनच मोगली मुलखात आपल्या फौजा पाठविण्याचे धोरण स्वीकारले ही खरी स्थिती कळायला हवी.
मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी बादशहा आता कुठे कुठे आपली फौज लावेल हे बादशहाला समजेना हे मूळ कारण. माळव्यात मराठे घुसलेत असे समजताच तिकडे बादशाही फौज रवाना केली की ती फौज तिकडे पोहोचेपर्यंत मराठ्यांनी गुजरात पर्यंत मजल मारली , आणि बादशाही फौजा जर गुजरात कडे वळाल्या तर मराठे दुसऱ्याच मार्गाने स्वराज्यात परत येत ह्याच कारण म्हणजे औरंगजेबच्या फौजेची अवस्था अगदी बिकट करून सोडली मराठ्यांनी.
Niccolao Manucci an Italian writer records in his book -
मनूचीने ह्याची दखल घेतली आपल्या ग्रंथात -
" मराठ्यांशी युद्ध सुरू करण्यात आपली चूक झाली , असे वाटून औरंगजेबास पश्चाताप होत आहे , कारण त्याच्या कल्पनेप्रमाणे त्याला या युद्धात यश आले नाही. दक्षिणेत जो काही थोडा प्रदेश जिंकला होता , तो त्याच्या हातात ठेवण्यासाठी त्याने दक्षिणेत राहणे आवश्यक झाले आहे. या वेळी तो अहमदनगरवर छावणी करून आहे. ही त्याची मोहीम पुढे चालू ठेवणार , असा त्याच्या पुत्रांत कोणी नाही.मराठ्यांच्या फौजा बादशाही साम्राज्यात सर्व दिशांना धुमाकूळ घालून लुटालूट करत अस्तात. मराठ्यांचे सामर्थ्य आणि ते जिथे गेले तिथे त्यांनी बादशाही छावण्या उध्वस्त केल्या. गोवळकोंडा पण लुटला अश्या प्रकारे प्रतिदिवशी ते आपल्या वाढत्या धाडसीपणाचे कार्य मोगली साम्राज्यात आणि त्यांच्या सुभ्यात नांदवत आहेत."

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...