विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 1 March 2019

औरंगजेब बादशहाच्या सुभ्यांवर ताराबाई राणीसरकारांचा प्रहार - भाग २



औरंगजेब बादशहाच्या सुभ्यांवर ताराबाई राणीसरकारांचा प्रहार - भाग २
मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धात मराठे दिल्लीपर्यंत मजल मारून आपले वर्चस्व गाजवले हे खरे परंतु बादशाही सुभ्यांवर काढायच्या मोहिमा तहकूब करावयाची गरज ताराबाईंना वाटत नव्हती उलट शत्रूचे नितीधिर्य खचले असता दुप्पट जोमाने शत्रूवर हल्ला करणे आणि तो यशस्वी करून त्यात शत्रूस नेस्तेनामुद करणे ह्यात ताराबाई राणीसरकारांची कर्तृत्वाची बात होती. ताराबाईंनी ह्या वेळी मोगली मुलखावर प्रचंड संखेत आपल्या मराठा लष्करी मोहीमा पाठवल्या आणी हेच की मराठ्यांनी मोगल साम्राज्यात राजरोजपणे धुमाकूळ घालत असल्याचे हे दिवस बादशहाला पहावे लागले.
मनूचीने ह्यात एका महत्त्वाच्या मराठ्यांच्या लष्कराची नोंद दिली आहे - बंगालच्या सुभ्यातील ओरिसाच्या प्रदेशात मराठ्यांचे लष्कर पोहोचले , आणि त्यांनी आणखी पुढे कूच करून डाका , राजमहाल इत्यादी शहरे लुटली असती यात काही शंका नाही , पण एका हिंदू सरदाराने त्यांचे जंगलातून व डोंगरातून जाणारे मार्ग रोखून धरल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही म्हणून ते बिकट प्रदेशात सर्वनाश न पत्करता परत फिरले आणि बरीच लूट स्वदेशी आणली ही घटना खरी आहे. माघार घेत असता त्यांना कोणी प्रतिकार केला नाही आणि त्या प्रदेशात मराठ्यांनी मोहीम काढण्याची ही तिसरी वेळ होती.
मनूचीने सविस्तर हकीकत दिलेली नाही पण त्याच्या नोंदणीमधून एक गोष्ट स्पष्ट होते " मराठे उत्तर हिंदुस्तानाच्या रोखाने, डाक्याच्या रोखाने मोहिमा काढू लागले होते. दुसऱ्या एका ठिकाणी मनूची म्हणतो , मराठ्यांनी दिल्लीपर्यंत फौजा घुसवल्या , कदाचित मराठे दिल्लीपर्यंत गेलेही नसतील किंवा असतील ही ,परंतु नर्मदा ओलांडून उत्तर हिंदुस्थानात प्रवेश करणारे मराठे , आपण दिल्लीवर स्वारी करणार आहोत ,अशीही हूल उठवीत असावेत आणि कोणी सांगावे , माळव्यात धुमाकूळ घालणारी एखादी मराठा फौज अत्यंत चपळ हालचाली करून दिल्लीच्या प्रदेशात जाऊन आली असणार.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...