विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 21 March 2019

राणोजी घोरपडे

राणोजी घोरपडे यांनी विशाळगड हून निघालेल्या औरंगजेबाच्या सैन्याच्या पिछाडीवर जोरदार हल्ला चढवला होता. वडिलांच्या म्रुत्यु नंतर त्यांनी कासेगाव, गोपाळपूर ( पंढरपूर ) पर्यंतचा मोगली प्रदेश जाळून टाकला होता. वडिलांच्या प्रमाणेच तेही शुर होते. औरंगजेबाला त्यांनी सुद्धा नाकीनऊ करून सोडले होते. राणोजी घोरपडे यांनी वाकिणखेडा तालुक्यात बेडरांचा प्रदेश, भीमा काठ, सुरपुर तालुका, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक चंदनगढीला वेडा घातला होता . वाकिनखेडा येथे बेडरांशी त्याचे युध्द झाले त्यात त्यांना बंदुकाची गोळी लागुन ते मरण पावले.
त्यांच्या मृत्यु ची तारीख होती -21 मार्च 1702 .
पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा...🙏
फोटो - काल्पनिक मावळा
#maratha_empire
#santaji_ghorpade #ranoji_ghorpade

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...