महाराणी ताराबाई यांनी 1705 ला पन्हाळा किल्ला जिंकला व मोठ्या जिद्दीने औरंगजेबाशी लढा देण्याचे ठरवले. त्यांनी मोठ्या हिकमतीने काही योजना आखल्या. गडा गडावर स्वतः जाऊन जातीने पाहणी केली. सरदारांना योग्य सल्ले व आदेश दिले. मराठ्यांचे गेलेले बहुतेक सर्व गड ताराराणींच्या सैन्याने मिळवले. सातारा, पन्हाळा, विशालगड, सिंहगड हे काही काळ औरंगजेबाकडे होते ते ताराराणी यांनी परत मिळवण्यात यश मिळवले.
मोगली सैन्याला महाराणी ताराराणी त्रस्त करुन सोडले. अनेक वर्षापासून मराठ्यांशी लढून मोगल सैन्याची हिंमत खचली होती. औरंगजेबाच्या हेकेखोरपणामुळे बळी ठरलेले मोगल सैन्य खचले होते. तीन छत्रपतींचा मृत्यु पाहणारा औरंगजेब मात्र एका स्त्री ला हरवू शकला नाही. औरंगजेब मरण पावला. त्याच्या मृत्यू मुळे ताराराणी विजयी झाल्या. खर्या अर्थाने राष्ट्राला जेव्हा आवश्यकता होती तेव्हा महाराणी ताराराणी यांनी राज्य चालवले. समर्थपणे सतत 7 वर्षे मोगलांशी झुंज देऊन लढा दिला व मराठेशाही जिवंत ठेवली.
औरंगजेब भिंगार ( अहमदनगर ) येथे मरण पावला ती तारीख होती - 20 फेब्रुवारी 1707
#maratha_empire #shivaji_maharaj
#shambhaji_maharaj #rajaram_maharaj
#tararani
#khub_ladhe_marhatte
#aurangjeb
फोटो 1. औरंगजेब
2. खुल्ताबाद औरंगाबाद येथील औरंगजेब याची कबर
पोस्ट साभार : रवि पार्वती शिवाजी मोरे
No comments:
Post a Comment