विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 1 March 2019

शिवाजीमहाराजांनी मिळवलेले विजय हे उच्च संस्कृतीने असंस्कृतीवर मिळवलेले विजय आहेत.


———————————
छत्रपती शिवाजीमहाराज एका उच्च संस्कृतीचे प्रतिनिधी आहेत. यामुळे त्यांच्या कृतींना संस्कृतीची बंधने आहेत. ती त्यांच्या शत्रूंना नाहीत. शिवाजी महाराजांचे शत्रू पहा- भर दरबारात आपल्याच वजिराचा खुन करणारा आदिलशहा; आपल्याच सख्ख्या भावाला ठार करणारा, बापाला कैदेत टाकणारा, हिंदूंवर जिझीया कर लादणारा औरंगजेब; भूपाळगड येथे किल्लेकर्यांचे हात कलम करणारा दिलेरखान; अतोनात धर्मच्छल करून हिंदूंची मंदिरे उध्वस्त करणारे पोर्तुगीज; नुसत्या संशयावरून एखाद्याला पोत्यात घालून समुद्रात बुडवणारा जंजिर्याचा सिद्दी. अशा वातावरणात शिवाजीमहाराज धिरोदत्तपणे एकटे उभे आहेत. शत्रूच्या इलाख्यात आक्रमण करत असताना सामान्य रयतेला तोशीस न पडण्याची काळजी घेतात. कोणत्याही मोहीमेत स्त्रियांना धक्का न लावण्याविषयी काळजी घेतात. अफजलवध किंवा उंबरखिंड प्रसंगी शत्रूसैन्य पुर्ण ताब्यात असतानाही शत्रूसैनिकांची बेछुट कत्तल करत नाहीत. अफजल खानाला मारल्यावर त्याची कबर बांधून त्या कबरीची कायमची व्यवस्था लावून देतात. शत्रूपक्षावर आक्रमण करताना तिथल्या निरापराध लोकांना क्लेष होणार याकडे लक्ष देतात.
शिवरायांनी औरंगजेबाला लिहीलेल्या पत्रातील काही वाक्ये पहा-
“कोणाच्या धर्माला दोष दिल्यास जे इश्वरानेच सांगितले आहे ते नाकारण्यासारखे आहे. लोकांवर जुलूम झाल्यास लोक हाय हाय करतील, दु:खाने धुर काढतील. या धुराने आपले शासन जितके लवकर जळेल तितके साक्षात अग्नीनेही जळणार नाही. गरीब माणसे अत्यंत ताकदहीन असतात. त्यांना उपद्रव देण्यात काहीही मोठेपणा नाही.”
औरंगजेबाने हिंदूंवर जिझीया कर लादल्यावर त्याला लिहीलेले हे पत्र आहे(१६६९). शिवाजीमहाराजांशिवाय हिंदूस्तानातील किंवा सरदाराचे औरंगजेबाला अत्यंत प्रखर भाषेत सुनावण्याचे धारिष्ट्य होते?
शिवाजीमहाराजांनी मिळवलेले विजय हे उच्च संस्कृतीने असंस्कृतीवर मिळवलेले विजय आहेत. आणि असे विजय दुर्मिळ असतात.

शिवाजीमहाराजांनी मिळवलेले विजय हे उच्च संस्कृतीने असंस्कृतीवर मिळवलेले विजय आहेत.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...