विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 1 March 2019

भरतवर्ष सम्राट हिंदनृपती थोरले शाहू छञपती

भरतवर्ष सम्राट हिंदनृपती थोरले शाहू छञपती हे भारताच्या मायभूमीवर पसरलेले यवनी राज्याविरूध्दचे अतिशय भक्कम कुशल आणि कर्तुत्वान शासक ठरले .
सतरा वर्षे मुसलमानी कौद भोगून शंभुपुञ शाहू महाराज यांनी 1708 ला स्वराज्याची घडी बसवली आणि आपल्या आजोबांच्या महत्वाकांक्षा उरी बाळगून या मायभूमीवरील मोगली सत्तेंचा पायबंद करण्यास सुरूवात केली .
अनेक मातब्बर पराक्रमी सरदार पेशवे यांच्या कर्तुत्वाने शाहू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हिंदुस्तानात मराठा साम्राज्याचा विस्तार करून घेतला . मध्ययुगीन कालखंडात हा एक सुवर्णक्षणच होता . सातारा येथे हिंदोस्थानचे केंद्रबिंदू स्थापून दिल्लीच्या ही ही गादिला हालवण्याची ताकद हा शंभुपुञाने बाळगली होती आणि ती घडी 1718 ला करूनच दाखवले की ज्या संभाजी महाराज यांना मोगलांनी हाल हाल करून मारले त्यांच्या मुलानेच मोगलांची हिंदोस्तानभरची सत्ता समुळ नष्ट करण्यास सुरुवात केली.
आपल्या बेचाळी वर्षांच्या कारकिर्दीत अलम हिंदोस्तानभर मराठ्यांनी अगदी स्वतंञपणे संचार केला आणि शाहूंच्या राज्याची भगवी पताका अजरामर केली .
हिंदोस्तानचा सुवर्णकाळच होता तो सन 1708 ते 1749 .
#भरतसम्राट
#क्षञियकुलवतंस
#शाहू_छञपती
पोस्ट साभार : गडप्रेमी बाळासाहेब पवार

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...