झलकारीबाई
भाग २
युद्धातील शौर्य
राणीच्या सैन्यात तिला वेगाने बढती मिळत गेली आणि लवकरच ती स्वत:च्या सैन्याच्या तुकडीचे नेतृत्व करु लागली.[८] १८५७ च्या बंडाच्या दरम्यान ह्युज रोज यांच्या नेतृत्वाखालील सैन्याने झाशीवर आक्रमण केले त्या दरम्यान राणी तिच्या किल्ल्यात स्वत:च्या ४००० सैनिकांसह दबा धरुन बसली होती. कल्पी या गावात छावनी टाकून बसलेल्या पेशव्यांचे सैन्य सोडवणूक करेल या अपेक्षेने लक्ष्मीबाई वाट पहात राहिली. परंतु पेशव्यांचे सैन्य येवू शकले नाही, कारण ते जनरल रोज कडून आधीच हारवले होते. दरम्यान झाशीच्या किल्ल्याच्या एका दरवाज्याची सुरक्षा पाहणारा "दुल्हा जू’ याने इंग्रजांशी हातमिळवणी केली आणि झाशीच्या किल्ल्याचा दरवाजा उघडला.जेव्हा ब्रिटीशांचे सैन्य किल्ल्यात शिरले, किल्ल्यात इंग्रजांचे सैन्य झाशीची सैन्य ह्यांमध्ये समोर-समोरचे युद्ध सुरू झाले. ह्या गोंधळाचा फायदा घेत आणि दरबारी व्यक्तिंना सल्ला ऐकत लक्ष्मीबाई मागच्या दरवाज्याने पळून गेली. लक्ष्मीबाईच्या जागेवर झलकारी आली, तिने लक्ष्मीबाईसारखाच पोशाख केलेला होता.[९] झलकारीने लक्ष्मीबाईशी असलेल्या तिच्या साधर्म्याचा फायदा घेत स्वत: राणी लक्ष्मीबाई असल्याचे भासवत पुर्ण दिवस लढाई चालू ठेवली

वारसा
गेल्या काही वर्षात झलकारीबाईच्या प्रतिमेने उत्तर भारतात महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. झलकारीबाईच्या कथेचे सामाजिक-राजकीय महत्त्व मान्य करण्यात आले आहे. झलकारीबाईचा मृत्यूदिन अनेक कोळी संघटना “शहीद दिवस” म्हणून साजरा करतात.[११] बुंदेलखंड या वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या चळवळी देखील झलकारीबाईची कथा बुंदेली अस्मितेच्या निर्मितीसाठी वापरत आहेत.[१२] भारत सरकारच्या डाक-तार विभागाने झलकारीबाईची प्रतिमा असलेले पोस्टाचे तिकिट काढले आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग पंच महल येथे झाशीच्या किल्ल्यात झलकारीबाईच्या स्मरणार्थ एक पाच मजली संग्रहालय बांधत आहे.[१३] बी. एल्. वर्मांच्या १९५१ मध्ये लिहिलेल्या “झांसी की रानी” या कादंबरीत झलकारीबाईचा उल्लेख आहे आणि त्यात तिच्यावर उपकथानक तयार केले आहे. त्यांनी झलकारीबाईचा उल्लेख कोळीण आणि लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक सामान्य सैनिक असा केला आहे. राम चंद्र हेरन यांची त्याच वर्षी प्रकाशित झालेली "माटी" ही बुंदेली कादंबरी तिला एक “लढवय्यी आणि शूर शहिद” असे चित्रित करते. झलकारीबाईचे पहिले चरित्र १९६४ मध्ये भवानी शंकर विशारद यांनी, वर्मांची कादंबरी आणि झाशीच्या आसपासच्या कोळी समाजाच्या मौखिक कथांवर संशोधन करून लिहिले.[१४]
झलकारीबाईची कथा सांगणाऱ्या कथालेखकांनी झलकारीबाईला लक्ष्मीबाईच्या पातळीवर आणून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.[१४] १९९० च्या दशकापासून झलकारीबाईच्या कथेने कोळी स्त्रीत्वाच्या उग्र स्वरूपाच्या आदर्श उभा करण्यास सुरुवात केली. ज्याला राजकीय परिमाण मिळाले आणि तिच्या प्रतिमेची सामाजिक परिस्थितीतून येणाऱ्या गरजेप्रमाणे पुनर्निर्मिती सुरू झाली.[१२] राष्ट्र्पती रामनाथ कोविंद यांनी १० नोव्हेंबर २०१७ रोजी भोपाळ मधील गुरू तेग बहादुर संकुलामध्ये झलकारीबाईच्या पुतळ्याचे अनावरण केले

No comments:
Post a Comment