झलकारीबाई
भाग १
झलकारीबाई (२२ नोव्हेंबर १८३० - १८५८) ही एक स्त्री लढवय्यी होती, जिने १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात एक महत्त्वाची भूमिका बजावली. तिने झाशीची राणी लक्ष्मीबाई हिच्या स्त्री लष्करात काम केले. हिचा जन्म कोळी समाजात झाला.[१] पुढे ती झाशीची राणी लक्ष्मीबाईची एक प्रमुख सल्लागार बनली.[२] झाशीच्या किल्ल्याचे युद्ध पेटलेले असताना, ती स्वतः राणी म्हणून गादीवर बसली आणि राणीच्या बाजूने आघाडीवर लढली, त्यामुळे राणीला किल्ल्यातून पळून जाणे शक्य झाले.[३]

झलकारीबाई संबंधातील कथा कित्येक शतके बुंदेलखंडातील लोकांच्या स्मरणात
आहेत. तिचे आयुष्य, खास करून राणीला वाचवण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या
सेनेशी लढतानाचं तिचे धैर्य, याची बुंदेली लोकसाहित्यात आजही स्तुती केली
जाते. तिचे शौर्य आणि तिची कोळी ही ओळख यामुळे उत्तर भारतातील शाक्यांमधे
स्वाभिमान आणि सांस्कृतिक ऐक्याची भावना निर्माण होण्यास मदत झाली
जीवन
झाशीजवळ असलेल्या भोजला गावामध्ये २२ नोव्हेंबर १८३० मध्ये सदोबा सिंग आणि जमूना देवी यांच्या पोटी झलकारीबाईंचा जन्म झाला.[५] एका खेडेगावातल्या मुलीच्या वाट्याला येतात ती सर्वच कामे झलकारी करत असे. तरी तीच्या लहानपणामध्येच तिने काही अचंबित करणाऱ्या बाबी करुन आपल्याकडे इतरांचे लक्ष वेधले होते. स्थानिक लोक गीतांमध्ये झलकारीच्या वीरतेविषयी अनेक उदाहरणे गायली जातात. झलकारीने कमी वयातच वाघाला कुऱ्हाडीने मारल्याची कथा रंगवून सांगितली जाते.[६] तसेच झलकारी गायी वळायला गेलेली असताना तिने एका चित्त्याला काठीने मारल्याची कथाही तेव्हढीच प्रसिद्ध आहे.[७] राणी लक्ष्मी बाईच्या सैन्यातील तोफखान्याचा काम करणाऱ्या पुरण सिंग नावाच्या सैनिकाशी तिचा विवाह झाला होता. ज्याने झलकारीची ओळख राणी लक्ष्मी बाईशी करुन दिली होती. झलकारी लक्ष्मीबाई सारखीच दिसायची आणि ह्यामुळे तीला लक्ष्मीबाईच्या स्त्रियांच्या पलटणीमधे सहभागी करुन घेतले गेले.

No comments:
Post a Comment