शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा मूळ पुरुष-
बाजीराव घोरपडे व शिवाजीराजे भोसले हे मूळ एकाच कुळातले भाउबंद व अस्सल राजपूत. भोसले व घोरपडे यांचे मूळ चित्तोड़चे राजघराने. चित्तोडच्या रावलसिंहाच्या तिन मुलांपैकी एक वंश म्हणजे शिसोदेकर. अजयसिंह राज्य करत असता एका बंडवाल्यावर त्याने सज्जनसिंह व क्षेमसिंह या दोन मुलांस पाठवले. पण त्यांच्या हातून बंदोबस्त झाला नाही तो बंदोबस्त लक्ष्मणसिंहाचा नातू हमीर याने केला म्हणून अजयसिंहाने त्यालाच गादी देण्याचे ठरविले तेव्हा नाखुश होऊन सज्जनसिंह व क्षेमसिंह हे स्वदेश सोडून दक्षिणेत आले. सज्जनसिंह हाच भोसले व घोरपडे घरान्याचा मूळ पुरुष होय. अल्लाउद्दीन हसन नावाचा मनसबदार दिल्लीहुन पाठवन्यात आला. त्यानेच स्वतः बंड करून स्वतन्त्र बहामनी राज्याची स्थापना केली. हसनला सज्जनसिंहाने चांगले सहाय्य केले म्हणून हसनने सज्जनसिंह व त्याचा मुलगा दिलीपसिंह याना देवगिरीच्या आसपासचे मेरठ प्रांतातिल 10 गांव जहांगीर दिले व ख़ासखेलचे सरदार बनविले. सज्जनसिंह सन 1355 मधे वयाच्या 65व्या वर्षी मेला. त्याचा मुलगा दिलीपसिंह हा त्यावेळी 29 वर्षाचा होता. 1360 ते 1362 च्या तेलंगनाच्या स्वाऱ्यात व 1366 सालच्या विजयनगरच्या स्वारीत विशेष पराक्रम केल्यामुळे दिलिपसिंहाचा गौरव वाढत गेला. त्याचा मुलगा व नातू सिद्धजी व भैरवजी यांनीही 1397 सालापर्यन्त अनेक स्वाऱ्या शिकारी व मर्दुमकीच्या लढाया केल्या. मुधोळची जहांगीर भैरवास 1398 त मिळाली. भैरवजीस भोसाजी म्हणत त्यावरून भोसले नांव रूढ झाले असावे. 1460 पर्यन्त या भोसले कुळातले कर्णसिंह व शुभकृष्ण हे भाऊ एकत्र होते पण पुढे ते फुटून कर्णसिंह आपल्या भीमसिंह नामक मुलास घेऊन निजामशहाकड़े गेला व शुभकृष्ण देवगिरिकडे राहिला. हा शुभकृष्ण म्हणजेच शिवाजीमहाराजांच्या भोसले घरान्याचा मूळ पुरुष. 1469 च्या सुमारास कर्णसिंह व भीमसिंह यानी कोकणातील एक असाध्य पहाड़ी किल्ला घोरपड लावण्याची युक्ति लढवून जिंकला व त्यांच्या वंशजांचे आड़नावच घोरपडे पडले. शुभकृष्णचे वंशज भोसलेच राहिले.

संदर्भ- चित्रमय शिवाजी
य न केळकर
य न केळकर
No comments:
Post a Comment