विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 26 April 2019

अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव.भाग 2

हिंदुस्तानातील मराठे आणि त्यांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्य याचा शोध
भाग 2650
अपरिचित वीर योद्धा सरदार पिलाजीराव जाधवराव.
लेखन – विजयश भोसले
पोस्ट सांभार :इन्फो मराठी
भाग 2
त्यांनी जंजिऱ्याच्या मोहिमेत चांगली कामगिरी बजावली. वसईच्या मोहिमेत पोर्तुगिजांशी सामना केला. गढामंडलाच्या मोहिमेत छत्रसालाच्या मुलाने बाजीरावाबरोबर पिलाजीरावांचाही सत्कार केला होता. पिलाजीराव बंगालच्या स्वारीतही सहभागी होते. त्यांनी व्यंकटराव घोरपडे व कोल्हापूरकर छत्रपती संभाजी यांचा तंटा मिटवला. कान्होजी आंग्रे यांना इंग्रज आणि पोर्तुगीज यांच्या विरोधात मदत केली. पिलाजीरावांनी सासवड, दिवा, वाघोली, जाधववाडी या व्यापारी पेठा वसवल्या.
त्यासंबंधी शाहूमहाराज एका पत्रात म्हणतात : ‘राज्याभिषेक शके ३४ सर्वधारी नाम संवत्सरे शाहू छत्रपती महाराज यांनी पिलाजी बिन (वडिल) चांगोजी यास मौजे दिवे येथे पेठ वसवण्यास सोयीचे गाव आहे, तरी पेठ वसवावी. तिचे नाव शाहूपुरी असे ठेवावे. त्यास तुम्हास पेठेचे सेटेपण इनाम वंशपरंपरेने इतर ठिकाणचे वाणी उदमी आणावे, वतन वंशपरंपरेने खावे.’दिवेघाटातील मस्तानी तलाव म्हणून ओळखला जाणारा तलाव पिलाजीराव यांनी बांधला.
सन १७०८ साली शाहू महाराजांना दक्षिणेत आणण्याकरता काही सरदार मंडळी गेली. त्यांबरॊबर पिलाजी जाधवराव हेही हॊते. बादशहाशी ना -ना प्रकारच्या वाटाघाटी करून हे सरदार शाहूंना दक्षिणेत घेऊन आले. या कामात पिलाजींचे राजकारण कौशल्य, हुशारी व कर्तबगारी पाहून शाहूंनी येताक्षणीच पिलाजींना पुणे येथे दिवे घाटाजवळ एक चाहूर जमीन इनाम म्हणून दिली तेव्हापासून पिलाजी जाधवराव तहहयात शाहूंचे आधारवड बनून राहिले.
छत्रपती शाहूंच्या प्रारंभीच्या काळात सत्ता स्थिरस्थावर करण्यात पिलाजी जाधवराव व बाळाजी विश्वनाथ यांनी एकविचाराने, कर्तृत्वाने, पराक्रमाने राजकारणे चालविलेली दिसतात. सन १७११ मध्ये एका मॊहिमे दरम्यान बाळाजी विश्वनाथ व शाहूंचे सेनापती चंद्रसेन जाधव ( धनाजी जाधवांचे पुत्र ) यांच्यात किरकॊळ कारणाने वाद झाले.

No comments:

Post a Comment

“कोरलाईचा किल्ला”.

  १३ सप्टेंबर १५९४.... कोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे या दोन्ही तालुक्यांमध्...