नारो त्र्यंबक हणमंते-
उर्फ नारायण त्रिमल. हा मूळ मलिकंबरच्या हाताखालीं तयार होऊन लुखजी जाधवाचे पदरी राहिला. जिजाबाईच्या लग्नानंतर नारोपंत यास लुखजीने तिच्या बरोबर भरंवशाचा माणूस म्हणून भोंसल्याकडे पाठविलें. शहाजीनें त्याला आपल्याबरोबर कर्नाटकांत नेले(१६३८). तेथें यानें पुष्कळ कामें केलीं. त्याचा भाऊ बाळकृष्ण म्हणून होता, त्यास पुढें शिवरायांनी मुजुमदार केलें. नारोपंत राजनिष्ठ व मुत्सद्दी होता; तसाच तो विद्वान असून पंडितहि होता. त्याच्यामुळें कर्नाटकांत शहाजीचा अंमल स्थिर झाला. याला रघुनाथ व जनार्दन असे दोन पुत्र होते. हा बंगलोर येथें १६५३ त वारला. [सप्तप्रकरणात्मक बखर; सभासद]
No comments:
Post a Comment