परशुरामभाऊ पटवर्धन- ---------------------------5
या सुमारास पटवर्धन घराण्यांत गृहकलहास प्रारंभ झाला (जून). गंगाधरराव मिरजकर व चिंतामणराव सांगलीकर यांचें भांडण जोरांत सुरू झालें. भाऊनीं केलेली मध्यस्थी गंगाधररावानें मान्य केली नाहीं, म्हणून चिंतामणरावानें आपलें पथक घेऊन भाऊंचा गोट सोडला (जुलै) व तो मिरजकरांचीं ठाणीं घेत चालला. कुरुंदवाडकर व मिरजकर हे आंतून करवीरकरांशीं सामील झाले होते. त्यामुळें त्यांनीं कोणीहि भाऊंस मदत केली नाहीं. यावेळीं भाऊंच्या फौजेची फार हलाखी झाली होती; सार्या दोन तोफा त्यांच्याबरोबर होत्या. खुद्द भाऊंची प्रकृतीहि बरी नव्हती व सैन्याच्या हालचाली बहुधां त्यांचा मुलगाच करी. त्याला अद्यापि लष्करी धोरण चांगलेसें समजलें नव्हतें. शेवटीं पट्टणकुडी येथें भाऊंचा मुक्काम पडला असतां त्यांच्यावर कोल्हापूरकर एकदम चालून आले. भाऊनीं त्यांनां अंगावर घेऊन मग हल्ला करण्याचें ठरविलें, परंतु पुढें गोंधळ उडाला. रामचंद्र आप्पा यानें लढाईंत आघाडीवर चांगला पराक्रम गाजविला. पण तो जखमी झाल्यानें फौज फुटली. तेव्हां कोल्हापुरकरांनीं तिचा पाठलाग केला. त्यावेळीं भाऊ आजारी असताहि त्यानीं शत्रूस अडथळा केला. त्यांत त्यानां तीन जखमा होऊन ते एकाएकी घोडयाखाली आले व शत्रूच्या हाती लागले. अशा वेळीं त्यांच्या सोबतीचे सर्व लोक पळून गेले होते. आसन्नमरणावस्थेंत भाऊनां कोल्हापूरच्या महाराजांपुढें नेलें असतां, त्यानीं भाऊंस ठार मारण्यास सांगितलें व त्याप्रमाणें भाऊंचा शेवट झाला. खरेशास्त्री म्हणतात ''भाऊ जखमांनीं घायाळ होऊन आपोआपच मृत्युपंथास लागले होते, असें असतां महाराजानीं त्यांस मुद्दाम मारवून दुष्कीर्ति संपादन केली'' (१७ सप्टेंबर, १७९९). [खरे-ऐ.ले. संग्रह, भा.७-११; हरिवंशबखर; सवाई माधवरावांची रोजनिशी; डफ; पेशव्यांची बखर; नाना फडणविसांचें चरित्र.]

No comments:
Post a Comment