विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 April 2019

संताजीचे शौर्यगाथा

संताजीचे शौर्यगाथा
छत्रपती राजाराम महाराज 1690 ले पन्हाळागडवर असताना रायगडच्या वेढयात मोगलाच्या फौजवर छाप घालून जेर करण्याची कामगिरी रामचंद्रपंतानी संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांच्या वर सोपविली . छत्रपती संभाजी राजे यांना पकडणारा शेख निजाम ऊर्फ मुर्खरबखान हाच छत्रपती राजाराममहाराजाना पकडण्याच्या प्रतिक्षेने पन्हाळगडवर चालून आले .त्याचा उच्छेद करण्यासाठी संताजी व धनाजी सैन्याचा गायीने प्रयत्न केला .छत्रपती राजाराम महाराजांचे चरित्र लिहिण्या केशव पंडिताने संताजी घोरपडे यांच्या त्यावेळच्या कामगिरीची अतिशय बहारीचे वर्णन केले आहे .
" निजामविजयार्थ यान् संतघोरपडादिकान.
प्रथमं प्राहिणोत्तर्हि निजाम :परिलुठित!!
गजाश्वादि धनं तस्य बह्यानीतं तदा रणात्!!
भूधरोपत्यकाया तु जीवमात्रावशेषित :!!
अर्थ :- संताजी घोरपडे वगैरे ज्यांना पुर्वी निजधामाला जिकंण्यास रामचंद्रांपंतानी पाठविले त्यांनी निजधामाला साफ लुटले आणि त्याचे हत्ती घोडे व इतर फार मोठी संपत्ती हरणार केली .तेव्हा निजाम शेख पन्हाळ्याच्या माचीवर केवळ जीव बचावून बसला .
संताजी व धनाजी यांच्या शौर्यामुलचे शेख निजाम छत्रपती राजाराम महाराजांना पकडून शकला नाही हे इतिहास तील ही अतिशय महत्वापूर्ण घटना आहे .कारण शेख निजाम यांना छत्रपती संभाजी महाराजांनी पकडून औरंगजेबाशी दिले होते.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य
सेवेशी ठाई व लेखन ...संतोष झिपरे 9049760888
संदर्भ :- करवीर रियासत .. (करवीर छत्रपती घराण्याचा इतिहास) .. पान .114 वर पहा .
जय शहाजी राजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय छत्रपती शाहू थोरला

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....