विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 9 April 2019

सरदार कृृष्णराव खटावकर

सरदार कृृष्णराव खटावकर याच्या समाधी स्थळ भेट व दर्शन
येरळा नदीच्या आश्रयाने वसलेले खटाव हे गाव आणि या भागाची जहागीर कृष्णराव खटावकर यांना मिळाली होती. खटावकरांचे मूळ घराणे कर्नाटकातील बारेहळ्ळी, कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आणि तिरुपतीचा व्यंकटेश. त्यांच्याच घराण्यातील नारो माधव यांनी जेजुरी गडावर खंडोबाचे मंदिर बांधले. शहाजहान बादशहाच्या कारकिर्दीत हा बारा-पंधरा हजार स्वारांचा मनसबदार होता. त्याचाच एक वंशज हणमंत हा संन्यासी झाला. त्याने १८६९ मध्ये समाधी घेतली. आज ती समाधी येरळा नदीच्या तीरावर पाहावयास मिळते.
इ.स. १३९६-१४०७ या कालखंडात दुर्गादेवीच्या पहिल्या दुष्काळात खटावचा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. रामोशांचा बंदोबस्त करण्यासाठी १४२९ मध्ये बहामनी सुलतानाने दौलताबादचा सुभेदार मलिक उत् तुजार याला खटावच्या बंदोबस्तासाठी पाठविले. त्याने तेथे शांतता प्रस्थापित केली. त्यानंतर हा प्रदेश अदिलशाही अमलाखाली आला. सन १६६५ च्या पुरंदरच्या तहानंतर नेताजी पालकराने हा प्रदेश अदिलशाहाकडून मोगलांना मिळवून दिला. आदिलशहाने खटाव परत जिंकले. सन १६८८-८९ मध्ये मोगलांकडे हा प्रदेश कृष्णराव खटावकर देशमुखाने मिळवून दिला.
कृष्णराव खटावकर हा विद्वान ब्राह्मण होता. संस्कृत भाषेवर त्याचे प्रभुत्व होते. विष्णुसहस्त्रनामावर त्याने द्वैत मताची टीका लिहिली. छत्रपती संभाजीराजांच्या हौतात्म्यानंतर औरंगजेबाने कृष्णरावांना खटावची जहागीर दिली. त्याने कोट बांधला. कोटात दत्ताची स्थापना केली. संस्कृत ग्रंथांचा संग्रह बाळगणारा कृष्णराव हा शूर होताच, पण त्याला धार्मिक, अध्यात्मिक गोष्टींत अधिक रस होता. संस्कृत ग्रंथ उतरवून घेण्यासाठी अनेक लोक त्याने बाळगले होते. त्याला बादशहाने ’राजा’ हा किताब दिला होता.
शाहू महाराज १७०८ मध्ये सातार्‍यास आल्यावर खटावकर स्वतःस मोगलांचाच चाकर समजत असत. चंद्रसेन जाधव ताराबाईंच्या पक्षाकडे गेल्यावर त्यांनी शाहूंशी संघर्ष सुरू केला. त्या वेळी खटावकारांना कोणाकडे जावे हे समजेना. शाहूराजांच्या सैन्याने बाळाजी विश्वनाथाच्या नेतृत्वाखाली खटाववर चाल केली व कृष्णराव आणि त्याचा मुलगा यांना ठार केले. त्याचे दोन लहान पुत्र शरण आले. शाहूराजांनी त्यांना अभय देऊन त्यांचे वतन पुढे चालू ठेवले.

 सरदार कृृष्णराव खटावकर याच्या समाधी स्थळ भेट व दर्शन








राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ इतिहास परिषद महाराष्ट्र राज्य संतोष झिपरे 9049760888

No comments:

Post a Comment

राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे

  राजश्री शहाजीराजे भोसले आणि त्यांचे विश्वासू, सरदार मलोजी बिन तुकोजी रणनवरे : सरदार मलोजी रणनवरे हे जिंती तालुका फलटण येथील पुरातन वतनदार....