मराठेशाहीतील घोरपडे घराणी भाग 12
इचलकरंजी संस्थानाचा इतिहास --------9
कोल्हापूरकर जिजाबाईंनीं इचलकरंजीकरांचें सरदेशमुखीचें वतन जप्त केलें होतें तें सोडण्याबद्दल व तिकडे इचलकरंजीकर यांची गांवें, खेडीं, शेतें, कुरणें, बाग, मळे वगैरे आहेत त्यांस उपसर्ग न देण्याविषयीं श्रीमंतांनीं जिजाबाईस पत्रें लिहिलीं. म्हापण गांवास वाडीकर सावंत यांजकडून उपद्रव होत होता तो बंद करण्यांविषयींहि पेशव्यांनीं सावंतांस एक ताकीद पत्र पाठविलें. आपल्या दौलतीचा याप्रमाणें बंदोबस्त करून घेऊन अनुबाई, तात्या व दादा; परत इचलकरंजीस आलीं. पुढें तात्या ख्यालीखुशालींत व दुव्यसनांत मग्न होऊन इचलकरंजींत आयुष्याचे दिवस घालवू लागले. त्यामुळें (१७६९) धारवाडचा सुभा इचलकरंजीकरांकडून काढून पेशव्यांनीं नारो बाबाजी नगरकर यांस सांगितला.
सन १७७० व १७७१ सालीं हैदरअल्लीवर मोहीम सुरू होती. तींत इचलकरंजीकरांची पागा मात्र होती. यावेळीं तात्या बेहोष व व्यंकटराव दादा अल्पवयी असल्यामुळें इचलकरंजीचें पथक मोडल्यासारखेंच झालें होतें. याच सुमारास नारायणराव तात्या हे (१७७० च्या प्रारंभापासून) आजारी पडले होते. तें दुखणें वाढत जाऊन शेवटीं त्याच वर्षी (नोवेंबर १०) त्यांचें देहावसान झालें.
व्यंकटराव ना रा य ण रा व उ र्फ दा दा सा हे ब. - इचलकरंजीकरांकडून धारवाड सुभा काढून तो दुस-या मामलेदाराकडे पेशव्यांनीं दिला होता. सुमारें सोळा वर्षेपर्यंत तो सुभा त्यांजकडे होता. त्यां अवधींत मामलतीसंबंधीं तफावत रहातां रहातां आजपर्यंत सरकारची बाकी बरीच तुंबली होती. सरकारचा तगादा उठविण्यासाठीं अनूबाईंस पुण्यास जावें लागलें. व्यंकटरावदादा त्याजबरोबर या खेपेसहि गेले होते. तेथें गेल्यावर हिशेब होऊन मुत्सदी व पेशवे यांजवळ अनुबाईंनीं बहुत रदबदली केल्यावरून शेवटीं यांजवळ अनुबाईंनीं बहुत रदबदली केल्यावरून शेवटीं ७३००० रूपयांवर तोड झाली. पेशव्यांची स्वारी कर्नाटकच्या मोहिमेस निघाली तेव्हां व्यंकटरावांसह अनूबाई पुण्याहून निघून जेऊरच्या मुक्कामीं लष्करांत जाऊन पोंचल्या. तेथें चार दिवस रहावयाचा त्यांचा बेत होता, परंतु इचलकरंजीस तात्यांस देवाज्त्रा झाल्याचें वर्तमान कळतांच त्या व व्यंकटराव तेथून ताबडतोब निघून इचलकरंजीस आल्या. (डफ; ऐ.इ.ले. संग्रह; इचलकरंजी इतिहास).

No comments:
Post a Comment